कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे || Dams in Kolhapur District

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे || Dams in Kolhapur District 

कोल्हापूर हा धरणाच्या बाबतीत खूपच समृद्ध जिल्हा म्हणायला काही हरकत नाही. जवळपास 41 धरण या तालुक्यात आहेत. त्यापैकी 11 महत्वाची धरणे आहेत. याच 11 धरणांची सविस्तर आणि इतर 30 धरणांविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

Dams list and information from kolhapur district

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणे-

1) वारणा धरण / चांदोली धरण-

शाहूवाडी तालुक्यातील चांदोली गावाजवळ हे धरण आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर हे धरण आहे. शाहूवाडी शहरापासून 42 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. सांगली शहरपासून 94 किलोमीटर तर कोल्हापूर शहरापासून 76 किलोमीटर अंतरावर वारणा धरण आहे. वारणा या नदीवर या धरणाचे बांधकाम 2000 मध्ये झाले. 

धरणाची उंची 88.80 मीटर तर लांबी 1580 मीटर आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 34.40 टीएमसी आहे. या धरणाला 4 दरवाजे आहेत.


2) दूधगंगा धरण / काळम्मावाडी धरण-

राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी गावाजवळ हे धरण आहे. राधानगरी शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर हे धरण आहेत तर कोल्हापूर शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर आहे. दुधगंगा या नदीवर या धरणाचे बांधकाम 1983 मध्ये झाले. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणाच्या यादीमध्ये 11 व्या क्रमांकाचे हे धरण आहे.

धरणाची उंची 73 मीटर तर लांबी 1280 मीटर आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 28 टीएमसी आहे. या धरणाला 5 दरवाजे आहेत.


3) राधानगरी धरण-

राधानगरी तालुक्यातील राधानगरी गावाजवळ हे धरण आहे. राधानगरी शहरापासून हे धरण 5 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून 53 किलोमीटर अंतरावर आहे. भोगावती या नदीवर या धरणाचे बांधकाम 1908- 1954 मध्ये झाले. 

धरणाची उंची 38.41 मीटर तर लांबी 1036 मीटर आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 8.36 टीएमसी आहे. या धरणाला स्वयंचलित असे 7 दरवाजे आहेत.


4) तिल्लारी धरण-

कोल्हापूर जिल्ह्यात तिल्लारी प्रकल्पात असणारे हे एक धरण आहे. चंदगड तालुक्यात असणाऱ्या तिल्लारी गावाजवळ हे धरण आहे. चंदगड शहरापासून हे धरण 33 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून 141 किलोमीटर अंतरावर तिल्लारी धरण आहे. तिल्लारी या नदीवर या धरणाचे बांधकाम 1986 साली पूर्ण झाले. 

धरणाची उंची 38.05 मीटर तर लांबी 485 मीटर आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 3.77 टीएमसी आहे. या धरणाला 3 दरवाजे आहेत.


5) पाटगाव धरण-

भुदरगड तालुक्यातील पाटगाव गावाजवळ हे धरण आहे. भुदरगड गारगोटी शहरापासून हे धरण 35 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून हे धरण 88 किलोमीटर अंतरावर आहे. वैनगंगा या नदीवर या धरणाचे बांधकाम 1990 साली पूर्ण झाले. 

धरणाची उंची 39.19 मीटर तर लांबी 1101.5 मीटर आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 3.72 टीएमसी आहे. 


6) तुळशी धरण-

राधानगरी तालुक्यातील धामोड गावाजवळ हे धरण आहे. राधानगरी शहरापासून 19 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. कोल्हापूर शहरापासून हे धरण 40 किलोमीटर अंतरावर आहे. तुळशी या नदीवर या धरणाचे बांधकाम 1978 साली पूर्ण झाले. 

धरणाची उंची 48.68 मीटर तर लांबी 1512 मीटर आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 3.47 टीएमसी आहे. तुळशी धरणाला 3 दरवाजे आहेत.


7) कासारी अर्थात गेळवडे धरण-

शाहूवाडी तालुक्यातील गेळवडे गावाजवळ हे धरण आहे. शाहूवाडी शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. कोल्हापूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. कासारी या नदीवर या धरणाचे बांधकाम 1990 साली पूर्ण झाले. 

धरणाची उंची 44.24 मीटर तर लांबी 297 मीटर आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 2.77 टीएमसी आहे. 


8) कुंभी धरण-

गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा गावाजवळ हे धरण आहे. गगनबावडा शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. कोल्हापूर शहरापासून 57 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. कुंभी या नदीवर या धरणाचे बांधकाम 2007 साली पूर्ण झाले. 

धरणाची उंची 42.58 मीटर तर लांबी 906 मीटर आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 2.75 टीएमसी आहे. या धरणाला 3 दरवाजे आहेत. धरणाच्या जलाशयाला गगनबावडा जलाशय किंवा गगनबावडा लेक असे म्हणतात. 


9) कडवी धरण-

शाहूवाडी तालुक्यातील परले निनाई गावाजवळ आहे. शाहूवाडी शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून हे धरण 64 किलोमीटर अंतरावर आहे. कडवी या नदीवर या धरणाचे बांधकाम 2000 साली पूर्ण झाले. 

धरणाची उंची 35.05 मीटर तर लांबी 1519 मीटर आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 2.52 टीएमसी आहे. 


10) चिकोत्रा धरण-

आजरा तालुक्यातील झुलपेवाडी गावाजवळ हे धरण आहे. आजरा शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. कोल्हापूर शहरापासून हे धरण 65 किलोमीटर अंतरावर आहे. चिकोत्रा या नदीवर या धरणाचे बांधकाम 2007 साली पूर्ण झाले. 

धरणाची उंची 64.8 मीटर तर लांबी 983 मीटर आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 1.52 टीएमसी आहे. 


11) जंगम हट्टी धरण-

चंदगड तालुक्यातील जंगम हट्टी गावाजवळ हे धरण आहे. चंदगड शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. कोल्हापूर शहरापासून 115 किलोमीटर अंतरावर आहे. जंगम हट्टी या नदीवर या धरणाचे बांधकाम 1995 साली पूर्ण झाले. 

धरणाची उंची 28.9 मीटर तर लांबी 960 मीटर आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 1.21 टीएमसी आहे. 


12) कानसा धरण

13) मनोली धरण
14) कसरदे धरण
15) पालेश्वर धरण
16) कुंभवडे धरण
17) पडसळी धरण
18) कोडे बुद्रुक धरण
19) अधुरं धरण
20) कल्जवादे / पॉम्ब्रे धरण
21) वेसराफ धरण
22) हंसाने धरण
23) कोंदोशी धरण
24) फाटकवाडी धरण
25) झांबरे धरण
26) आंबेवाडी धरण
27) पाटणे धरण
28) काळसगाडे 1 धरण
29) काळसगाडे 2 धरण
30) करंजगाव धरण
31) सुंडी धरण
32) लकीकट्टे धरण
33) तिरमाळ धरण/ लेक
34) चितरी धरण
35) रंकाळा तलाव
36) कळंबा तलाव
37) कांदलगाव लेक
38) कणेरी लेक
39) जयसिंगराव तलाव
40) चंदोली धरण शाहूवाडी
41) कोलोशी धरण

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने