कडवी धरण, कोल्हापूर || Kadavi Dam information in Marathi
धरणाचे नाव- कडवी धरण (Kadavi Dam)
नदीचे नाव- कडवी नदी
ठिकाण- परलेनिनाई, शाहूवाडी
जिल्हा- कोल्हापूर
Kadavi Dharan Marathi Mahiti
कडवी हे धरण कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात असलेल्या परले निनाई गावाच्या जवळ आहे. कडवी नदीवर हे धरण बांधलेले असून धरणाचे नाव हे त्याच्या नदीच्या नावावरून पडले आहे. कोल्हापूर भागातील सर्व नद्या या जवळपास कृष्णा माईच्या उपनद्या आहेत आणि कडवी ही नदी वारणा नदीची उपनदी असून पुढे ती देखील कृष्णा माईला भेटते.
कडवी धरणाचे बांधकाम हे 2000 साली पूर्ण झाले. कडवी धरणाची एकूण उंची ही 36.05 मीटर म्हणजे 118 फूट इतकी आहे. या धरणाची लांबी ही 1519 मीटर म्हणजेच 4983 फूट इतकी आहे.
कडवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 2.52 टीएमसी म्हणजेच 2520 दशलक्ष घनफुट इतकी आहे.
कडवी धरणाला भेट द्यायला कसे पोहोचाल?
कडवी हे धरण शाहूवाडी शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून हे धरण 64 किलोमीटर अंतरावर आहे.