कासारी धरण / गेळवडे धरण कोल्हापूर || Kasari Dam / Gelawade Dam Information in Marathi
धरणाचे नाव- कासारी धरण / गेळवडे धरण (Kasari Dharan / Gelawade Dam)
नदीचे नाव- कासारी धरण
ठिकाण- गेळवडे, शाहूवाडी
जिल्हा- कोल्हापूर
Kasari Dharan / Gelawade Dharan Marathi Mahiti
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात वसलेल्या गेळवडे गावाच्या शेजारी वसलेले कासारी धरण अर्थात गेळवडे धरणाच्या विषयी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. शाहूवाडी शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर वसलेले हे कासारी धरण कोल्हापूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे.
कासारी धरण हे कासारी नदीवर बांधलेले असून कासारी ही नदी पंचगंगेची उपनदी आहे. पंचगंगा नदी देखील पुढे जाऊन कृष्णा माईला भेटते. धरणाचे बांधकाम 1990 साली पूर्ण झाले. धरणाची उंची ही 44.24 मीटर म्हणजे जवळपास 145 फूट इतकी आहे. धरणाची लांबी ही 297 मीटर म्हणजेच 974 फूट इतकी आहे. कासारी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 2.77 टीएमसी म्हणजे 2770 दशलक्ष घनफुट इतकी आहे.
आंबा घाटामधून आपल्याला गेळवडे धरणाचा जलाशय दृष्टीक्षेपात येतो. गेळवडे धरण म्हणजेच कासारी धरणाचा बॅक वॉटर हा मान्सून काळात पर्यटकांना आकर्षित करत असतो. इथे तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य आणि नौकानयनाचा (बोटिंगचा) आनंद देखील घेता येतो.
धरणाच्या परिसरात आपल्याला विशालगड देखील बघायला मिळतो.
कासारी धरणाला कसे पोहोचाल?
तुम्हाला मांजरे गेळवडे या रस्त्याने धरणाकडे जाता येईल. काही डांबरी रस्ता आणि काही कच्च्या रस्त्याने तुम्हाला धरणाच्या बॅक वॉटर कडे जाता येते.