कुंभी धरण, गगनबावडा कोल्हापूर || Kumbhi Dharan Kolhapur Information in Marathi

कुंभी धरण, गगनबावडा कोल्हापूर || Kumbhi Dharan Kolhapur Information in Marathi


धरणाचे नाव - कुंभी धरण / लखमापूर डॅम (Kumbhi Dam)

नदीचे नाव- कुंभी नदी / काही ठिकाणी कुंभा असा उल्लेख

गाव- गगनबावडा

तालुका- गगनबावडा

जिल्हा- कोल्हापूर

Kumbhi dharan marathi mahiti

Kumbhi Dam information in Marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात असणाऱ्या गगनबावडा गावाच्या जवळच कुंभी धरण आहे. कुंभी धरण हे गगनबावडा शहरापासून 5 किमी अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून धरणाचे अंतर हे 57 किमी आहे. धरणाचे बांधकाम हे कुंभी नदीवर केले गेले असून कुंभी नदीविषयी सांगायचे झाले तर ती पंचगंगेची उपनदी असून पंचगंगा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. 

कुंभी धरणाचे बांधकाम हे 2007 साली पूर्ण झाले. धरणाची उंची ही 42.58 मीटर म्हणजेच एकूण 139 फूट इतकी आहे. कुंभी धरणाची लांबी ही 906 मीटर म्हणजेच 2972 फूट इतकी आहे. 

कुंभी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 2.75 टीएमसी म्हणजेच 2750 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला एकूण 3 दरवाजे आहेत. धरणाच्या जलाशयाला गगनबावडा जलाशय किंवा गगनबावडा लेक असे म्हणतात. 

धरणाला भेट द्यायला कसे पोहोचाल?

गगनबावडा मधून तुम्हाला एका छोट्या हमरस्त्याने कुंभी धरणाकडे जाता येईल. साधारण गगनबावडा ते कुंभी धरण हे अंतर 5 किमी इतके आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने