Top 5 Best Laptops Under 40K ।। 40 हजारांच्या आतील 5 बेस्ट लॅपटॉप्स
Best Budget Laptops For Students and Work from Home Purpose
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षण या गोष्टी फार वाढल्या आहेत आणि त्याच्याच सोबतीला लॅपटॉप च्या किमती देखील खूप जास्त वाढलेल्या आहेत. त्यामुळे आता लॅपटॉप ची डिमांड जास्त आहे परंतु त्यांच्या किमती इतक्या वाढल्याने आपल्याला एखादया स्पेसिफिक किंमतीत चांगला लॅपटॉप कसा मिळू शकेल हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा असतो. त्यासाठीच आज 40 हजार म्हणजे सर्वांना परवडेल अशा किंमतीत येणारे चांगले 5 लॅपटॉप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.
सूचना- हे लॅपटॉप लिस्ट करत असताना आम्ही अनेक प्रकारचे लॅपटॉप्स बघून मग त्यातुन चांगले आणि जे काही फीचर्स आहेत ना ते बघून सिलेक्ट करत असतो. यामध्ये कोणत्याही कंपनीकडून आम्हाला पैसे मिळतील ही आशा नसते.
40 हजारात आपल्याला काय मिळाले पाहिजे? || Criteria for Choosing Laptops Under 40K
40 हजाराच्या आतमध्ये लॅपटॉप निवडत असताना तुम्हाला खालील गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आपल्याला लॅपटॉप मध्ये i3 प्रोसेसर हा 10th किंवा 11th जनरेशन चा हवा. याशिवाय कमीत कमी 8 GB ची रॅम देखील ही असायलाच हवी. लॅपटॉप हा 14 इंच किंवा 15 इंच काहीही असेल तरी चालेल परंतु FHD असला पाहिजे. हार्ड डिस्क असेल तर ती 1 TB असायला हवी आणि जर SSD असेल तर ती 256 किंवा 512 GB असायला हवी.
लॅपटॉप मध्ये विंडोस 10 होम असायला हवी आणि जर नसेल तर तुम्ही dos घेऊन 2 ते 3 हजार रुपये कमी किमतीत लॅपटॉप घेऊ शकता. तुम्हाला आता मीटिंग असल्याने वेबकॅम देखील HD असायला हवा.
1) Acer Aspire 5
तुम्हाला एक कॉम्पॅक्ट लॅपटॉप हवा असेल तर हा बेस्ट आहे. यात तुम्हाला 14 इंचाची FHD स्क्रीन बघायला मिळते. 8 GB रॅम, 1 TB हार्ड डिस्क आणि इंटेल चा लेटेस्ट i3 11th Generation प्रोसेसर तुम्हाला या लॅपटॉप मध्ये बघायला मिळेल. 11 तासांचा बॅटरी बॅकअप आणि Type C पोर्ट या काही खास गोष्टी या लॅपटॉप मध्ये आहेत.
किंमत- ₹39,490
2) Dell Vostro
Dell कडून येणार हा लॅपटॉप 14 इंचांच्या FHD स्क्रीन सोबत मिळतो. स्क्रीन छोटी असली तरी देखील i3 11th जनरेशन प्रोसेसर तुम्हाला या लॅपटॉप मध्ये बघायला मिळतो. 8 GB ची रॅम आणि 1TB हार्डडिस्क तुम्हाला या लॅपटॉप मध्ये मिळते. यामध्ये तुम्हाला एक कमतरता आहे की यात USB TYPE C बघायला मिळत नाही.
किंमत- ₹40,620
3)HP 15s
हा HP कडून येणारा 15 इंच FHD डिस्प्ले वाला लॅपटॉप आहे. यामध्ये तुम्हाला SSD जरी मिळत नसली तरी देखील यात तुम्हाला 1TB ची मोठी हार्डडिस्क मिळत आहे. इंटेल चा i3 11th generation processor तुम्हाला या लॅपटॉप मध्ये बघायला मिळेल.
किंमत- ₹39,990
4) Asus X515
या लॅपटॉप मध्ये तुम्हाला मोठी 15.6 इंचाची स्क्रीन बघायला मिळते ती देखील फगड स्क्रीन आहे. या लॅपटॉप मध्ये तुम्हाला 8 GB रॅम आणि 512 GB SSD मिळते. या लॅपटॉप मध्ये तुम्हाला जो प्रोसेसर मिळतो तो इंटेल i3 असून त्याची जनरेशन ही 10th आहे. Asus X515 मध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर देखील भेटते. Usb Type C देखील तुम्हाला या लॅपटॉप मध्ये बघायला मिळेल.
किंमत- ₹38,990
5) HP 14s
14 s म्हणजेच यात तुम्हाला 14 इंच डिस्प्ले मिळत असतो. हा FHD डिस्प्ले असून यात तुम्हाला इंटेल i3 11th Generation चा प्रोसेसर देखील बघायला मिळतो. आम्ही जो criteria ठेवला आहे तो यात पूर्णपणे आपल्याला बघायला मिळेल. 8 जीबी रॅम, 256 जीबी SSD तुम्हाला या लॅपटॉप मध्ये 40 हजारांच्या आत बघायला मिळते. Hp 14s तुम्हाला 12 तासांचा बॅटरी बॅकअप देतो आणि सोबतीला type c सपोर्ट देखील आहे.
किंमत- 40,999