पाटगाव धरण || Patgaon Dam Information in Marathi

पाटगाव धरण || Patgaon Dam Information in Marathi

धरणाचे नाव- पाटगाव धरण (Patgaon Dam)

नदीचे नाव- वैनगंगा नदी

ठिकाण- पाटगाव, भुदरगड

जिल्हा- कोल्हापूर

Patgaon dam information in marathi

Patgao Dharan Marathi Mahiti

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या पाटगाव जवळ हे पाटगाव धरण आहे. वैनगंगा या नदीवर हे धरण बांधलेले आहे. वैनगंगा नदी ही दुधगंगा नदीची आणि पुढे जाऊन दुधगंगा नदी कृष्णामाईची उपनदी आहे.  1990 मध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. 

पाटगाव धरणाची उंची 39.19 मीटर म्हणजे 128 फूट आहे. धरणाची लांबी ही 1101 मीटर म्हणचे जवळपास 3613 फूट आहे. पाटगाव धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 3.72 टीएमसी म्हणजे 3720 दशलक्ष घनफुट इतकी आहे. 

पाटगाव धरणावर 2.5 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प देखील आहे.

पाटगाव धरणाला कसे पोहोचाल?

पाटगाव हे धरण पाटगाव गारगोटी शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून हे धरण 88 किलोमीटर अंतरावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने