नाशिक जिल्ह्याची माहिती || Nashik District Information in Marathi
संपूर्ण जगभरात जर द्राक्ष हा विषय निघत असेल तर नाशिक जिल्ह्याचे नाव कोण विसरेल? नाशिक जिल्हा म्हणजे तिर्थक्षेत्रांचे माहेरचं! पंचवटी सारखे तीर्थक्षेत्र त्यासोबत त्र्यंबकेश्वर ची मांदियाळी या जिल्ह्याला लाभलेली आहे. आपण या लेखाच्या माध्यमातून याच नाशिक जिल्ह्याविषयी जाणून घेणार आहोत.
नाशिक जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Geographical Information about Nashik District
नाशिक हा जिल्हा समुद्र सपाटीपासून 565 मीटर उंचीवर आहे. महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम भागामध्ये स्थित आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे.येथील लोकसंख्या सुमारे 61 लाख इतकी आहे.15 हजार 582 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आहे.उत्तरेला धुळे जिल्हा आहे तसेच पूर्वेस जळगाव जिल्हा आहे. दक्षिण पूर्व औरंगाबाद जिल्हा ,दक्षिणेकडे अहमदनगर जिल्हा आहे. नैऋत्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेला गुजरात नवसारी जिल्हे आणि उत्तर पश्चिमेला एक जिल्हा आहे.नाशिक किंवा नासिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील एक महत्त्वाचे शहर मानले जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
नाशिक जिल्ह्याला महान पौराणिक पार्श्वभूमी आहे. भगवान राम आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे वास्तव्य करीत होते. त्याशिवाय अगस्ती ऋषी देखील तपश्चर्या साठी नाशिक मध्ये राहिले. महाराष्ट्राची गंगा म्हणजे गोदावरी नदी. या नदी नाशिक त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते.त्रंबकेश्वर मंदिर त्रिंबक या गावी स्थित आहे. ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
त्र्यंबकेश्वर येथे हिंदू वंशावळची नोंदणी केली जाते.नाशिकला अनेक प्रसिद्ध व्यक्ती असल्याचे श्रेय मिळाले आहे. वीर सावरकर ,अनंत कान्हेरे ,दादासाहेब पोतनीस ,बाबुभाई राठी, V. बी शिरवाडकर आणि वसंत कानेटकर हे फक्त काही नावे आहेत.
नाशिक मधील काही महत्त्वाचे ठिकाणे - Places to Visit in Nashik District
तोफखाना केंद्र : नाशिक शहरातील नाशिक रोड या ठिकाणी आहे.
नाणे संग्रहालय : अंजनेरी नाशिक शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर नाशिक ते त्रंबकेश्वर रोडवर नाणे संग्रहालय आहे.
गारगोटी संग्रहालय : हे सिन्नर येथील मालेगाव एम आय डी सी क्षेत्रामध्ये नाशिक पासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे.
बुद्ध विहार आणि दादासाहेब फाळके संग्रहालय : हे नाशिक शहराजवळ नाशिक मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर आहे.नाशिक बस स्टँड पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे.
नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे- Tourist Place in Nashik District
दूध सागर धबधबा : नाशिक पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरील सोमेश्वर येथे आहे.
दुगारवाडी धबधबा : त्रंबकेश्वर जवळ रोडवर त्रंबकेश्वर पासून 10 किलोमीटर अंतरावर दुगारवाडी धबधबा आहे.
नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळे - Temples in Nashik District
नाशिक मधील महत्वाच्या ठिकाणांबरोबरच येथील धार्मिक स्थळ सुद्धा पर्यटकांना आकृष्ट करत आहे.
कुशावर्त तीर्थ : त्रंबकेश्वर शहराच्या मध्यभागी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून अंदाजे 300 मीटर अंतरावर स्थित आहे.
काळाराम मंदिर : सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले.प्रभू रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले ,त्या ठिकाणी हे मंदिर होते.
पंचवटी : नाशिक शहरात पंचवटी परिसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे. काळाराम मंदिराजवळ वृक्षांचा समूह असून हा समूह पाच वर्षे वृक्षापासून तयार झाला असल्याने या परिसरात "पंचवटी "असे म्हटले जाते.
धम्मगिरी : गोयंका द्वारा स्थापित धम्मगिरी एक ध्यान केंद्र आहे.
रामकुंड : रामकुंड नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात आहे. ते मध्यवर्ती बसस्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे.
श्री सोमेश्वर मंदिर : हे मंदिर नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून 8 किलोमीटर अंतरावर गंगापूर रस्त्यावर आहे.
श्री सप्तशृंगी गड : सप्तशृंगी गड नाशिक पासून 60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे. देवीचे मंदिर सात शिखरांनी वेढलेले असून समुद्रसपाटीपासून 4 659 फूट उंचीवर आहे.
श्री त्रंबकेश्वर शिव ज्योतिर्लिंग मंदिर : त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक पासून 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.
पांडवलेणी : नाशिक नवीन बस स्थानकापासून 5 किलोमीटर व महामार्ग बस स्थानकापासून 4किलोमीटर अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत.
मांगीतुंगी मंदिर : मांगीतुंगी मंदिर नाशिक पासून 125 किलोमीटर अंतरावर सटाणा तालुक्यात आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र ,दिंडोरी : हे नाशिक पासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर आहे.
नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरत्न बौद्ध लेणे आहे.
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन निर्मितीसाठी नाशिक प्रसिद्ध होत आहे. सर्वात पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक मधील गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे सुद्धा नाशिक मध्येच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर "सिटी अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन " म्हणजेच 'सिडको 'या नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुणे प्रमाणेच नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले शहर आहे.