तिल्लारी धरण || Tillari Dam Information in Marathi
धरणाचे नाव- तिल्लारी धरण (Tillari Dam)
नदीचे नाव- तिल्लारी नदी
ठिकाण- तिल्लारी, चंदगड
जिल्हा- कोल्हापूर
Tillari Dharan Marathi Mahiti
तिल्लारी हा एक प्रकल्प असून यात एकूण 3 धरणे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात यातील एक धरण येत असून त्याला तिल्लारी धरण याच नावाने ओळखले जाते. या प्रकल्पातील दुसरे धरण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
तिल्लारी हे धरण चंदगड तालुक्यात असलेल्या तिल्लारी गावाजवळ आहे. तिल्लारी नदीवर या धरणाचे बांधकाम केले गेलेले आहे. 1986 साली तिल्लारी धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
तिल्लारी धरणाची उंची 38.5 मीटर म्हणजे 124 फूट तर लांबी 485 मीटर म्हणजे 1591 फूट आहे. तिल्लारी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 3.77 टीएमसी म्हणजे 3770 दशलक्ष घनफुट इतकी आहे. तिल्लारी धरणाला एकूण 3 दरवाजे आहेत.
तिल्लारी धरणाला कसे पोहोचाल?
चंदगड या तालुक्याच्या ठिकाणापासून हे धरण 33 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून जवळपास 140 किलोमीटर अंतरावर हे तिल्लारी धरण आहे.