राधानगरी धरण || Radhanagari Dam Information in Marathi

राधानगरी धरण || Radhanagari Dam Information in Marathi

धरणाचे नाव- राधानगरी धरण (Radhanagari Dam)

नदीचे नाव- भोगावती नदी

ठिकाण- राधानगरी

जिल्हा- कोल्हापूर

Radhanagari Dam information in Marathi

Radhanagari Dharan Marathi mahiti

कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाच्या धरणाच्या यादीत येणारे आणि ऐतिहासिक दृष्ट्या देखिल महत्व प्राप्त झालेले राधानगरी धरण विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा कोल्हापूरच्या विकासात अगदी मोलाचा वाटा आहे. त्यांनी घडविलेल्या गोष्टींमध्ये राधानगरी धरणाचा समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात राधानगरी गावाजवळ हे धरण आहे. 

पंचगंगा नदीची उपनदी असणाऱ्या भोगावती नदीवर राधानगरी धरणाचे बांधकाम केले गेले आहे. लक्ष्मी तलाव हाच पुढे राधानगरी धरण बनला. पुढे पंचगंगा नदी कृष्णा नदीला जाऊन मिळते. धरणाचे बांधकाम हे 1908 ते 1957 दरम्यान पूर्ण झाले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी या धरणाची संकल्पना मांडली होती. शाहू महाराजांनीच या धरणाची पायाभरणी केली. 

राधानगरी धरणाची उंची 38.41 मीटर म्हणजे 126 फूट तर धरणाची लांबी 1036 मीटर म्हणजे 3398 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 8.36 टीएमसी म्हणजे 8360 दशलक्ष घनफुट इतकी आहे. राधानगरी धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे जेवहा धरण 100% भरते तेव्हा ते आपोआप उघडतात. दरवाजे उघडत असताना ते एक एक करून आपोआप उघडतात.  धरण जेव्हा पूर्ण क्षमतेने भरते तेव्हा त्याच्या स्वयंचलित दरवाजांवर आतील बाजूने दबाव पडतो आणि त्यामुळे एक एक दरवाजा आपोआप उघडला जातो. दाब जसा वाढतो तसे आपोआप दरवाजे उघडतात आणि दाब कमी झाला की आपोआप बंद होतात. 

धरणाच्या मुख्य भिंतीत 5 दरवाजे आहेत. 

राधानगरी धरणावर 10 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प आहे.परंतु काही कारणास्तव हा प्रकल्प आता बंदच असतो.  पर्यटनाच्या दृष्टिकोनातून धरण परिसरात दाजीपूर अभयारण्य आहे. 

राधानगरी धरणाला कसे पोहोचाल?

राधानगरी शहरापासून हे धरण अगदी 5 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून हे धरण 53 किलोमीटर अंतरावर आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने