कोल्हापूर जिल्ह्याची माहिती || Kolhapur District Information in Marathi

कोल्हापूर जिल्ह्याची माहिती || Kolhapur District Information in Marathi

पुणे शहरापासून 232 किलोमीटर अंतरावर असणारे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर म्हणजे कोल्हापूर शहर . कोल्हापूर शहराचे नाव घेतले की दोन गोष्टी प्रामुख्याने नजरेसमोर येतात.त्यापैकी एक महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाई आणि दुसरे छत्रपती राजश्री शाहू महाराज भोसले. याच कोल्हापूर जिल्ह्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. 

Kolhapur Jilha Marathi Mahiti

कोल्हापूर जिल्ह्याची माहिती || Kolhapur District Information in Marathi

कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Geographical Information about Kolhapur District 

समुद्रसपाटीपासून या शहराची उंची 569 मीटर म्हणजेच 1567 फूट इतकी आहे.कोल्हापूर सह्याद्रीच्या पश्चिम घाट माथ्यावर आहे.येथील हवामान संमिश्र असून ,मुख्यतः हवामान दमट असते. येथील उन्हाळ्यात तापमान  33 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअस इतके असते .तर पावसाळा 20 इंच ते 240 इंच इतका पडतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या व धरणे - Kolhapur District Rivers and Dams

पंचगंगा नदी हे या शहराचे मुख्य नदी आहे . या नदीचा उगम पश्चिम घाटातून होतो .या नदीला भोगावती ,कुंभी, कासारी, तुळशी ,अशा पाच उपनद्या येऊन मिळतात. कोल्हापूर शहराची जुनी ओळख म्हणजे या शहराला तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. कारण फिरंगाई ,कपिलतीर्थ ,लक्षतीर्थ, कुंभारतळे ,महारतळे, सिद्धाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर इत्यादी तलाव या शहरात होते. शहराच्या वाढीबरोबर आणि काळाच्या ओघात बरेच तलाव नष्ट झाले . प्रसिद्ध रंकाळा तलाव प्रामुख्याने कोल्हापूर शहरात पाहायला मिळतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे-

पाटगाव धरण  , तिल्लारी धरण , राधानगरी धरण , तुळशी धरण , वारणा धरण/ चांदोली धरण , कडवी धरण , कासारी धरण/ गेळवडे धरण , कुंभी धरण 

कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरे - Temples in Kolhapur District

कोल्हापूरच्या अंबाबाई चे मंदिर :

इतिहास इसवी सन 600 ते 700 मध्ये चालुक्य राजाच्या राजवटीत या मंदिराची उभारणी झाली आहे,असे काही इतिहास तज्ञ सांगतात.हे मंदिर  काळ्या पाषाणात असून ,हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलेले आहे.वर्षभर मंदिरात वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात.त्यात प्रामुख्याने शारदीय नवरात्र हा प्रमुख उत्सव असतो .मंदिराचा परिसर अतिशय विस्तीर्ण आहे. तसेच परिसरात इतर देवतांचीही मंदिरे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे - Tourist Places in Kolhapur District

कोल्हापूर शहरात इतर प्रेक्षणीय स्थळे आहेत .यामध्ये रंकाळा तलाव ,रंकाळा चौपाटी आणि खवय्यांसाठी मिसळ पाव इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. तसेच तांबडा आणि पांढरा रस्सा साठी कोल्हापूर शहरातील हॉटेल्स प्रसिद्ध आहेत.

कोल्हापूर मध्ये फार पूर्वीपासून एक गोष्ट पाहायला मिळते. ती म्हणजे" गवळी तुमच्या घरी घेऊन येतो आणि तुमच्यासमोर दूध काढून देतो".ही प्रथा आज सुद्धा कोल्हापूर मध्ये पहायला मिळते.

शाहू महाराजांचा पहिला राजवाडा :

त्यात लाकूड आणि दगड यांचा सुरेख मिलाफ करून हा राजवाडा बांधण्यात आला आहे.छत्रपती शाहू महाराजांचे देवघर ,त्यांनी शिकार केलेले प्राणी ,त्यांच्या वापरातील काही वस्तू ठेवण्यात आले आहेत .

न्यू पॅलेस येथे छत्रपती शहाजी वस्तुसंग्रहालय आहे .तिथे प्राणी-पक्षी, शस्त्रे ,मौल्यवान वस्तू अशा कितीतरी वस्तू पाहायला मिळतात .कोल्हापुरी चप्पल हे या शहराचे खास वैशिष्ट्य आहे.जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या सर्व वयोगटातील कोल्हापूरी चपला ,विशिष्ट रंग, विविध आकार आणि करकर वाजणार या कोल्हापुरी चपला . 

कोल्हापूर शहरात आणि सभोवतीचे काही पर्यटन स्थळे :

कोल्हापूर शहरात प्रवेश करायच्या आधी पुणे-कोल्हापूर महामार्गावरील दर्शन होते चिन्मय मिशनच्या कोल्हापूर आश्रमातील 80 फूट उंच असलेल्या चिन्मय गणपतीचे .चिन्मय गणपती कोल्हापूर पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे.कोल्हापूर शहरापासून खिद्रापूर मंदिर 58 किलोमीटर अंतरावर आहे.कोल्हापूर पासून नरसोबाची वाडी 49 किलोमीटर अंतरावर आहे .कोल्हापूर पासून पन्हाळगड 22 किलोमीटर अंतरावर आहे.कोल्हापूर पासून राधानगरी धरण आणि धरण परिसर 55 किलोमीटर अंतरावर आहे.कोल्हापूरची चित्रनगरी 8.9 किलोमीटर अंतरावर आहे. 

भालजी पेंढारकर यांनी उभारलेला जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे .या स्टुडिओमध्ये भालजी पेंढारकरांनी अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली.सिद्धगिरी आश्रम कोल्हापूर पासून 13 किलोमीटर अंतरावर आहे.सिद्धगिरी आश्रमात सामान्य माणसाचे जनजीवन आणि त्याच्या व्यवहारातील अनेक प्रसंग शिल्प समूहाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे .

कोल्हापूर शहर आणि कलावंत - Artists from Kolhapur District

कोल्हापूर शहराने पेंढारकर ,चंद्रकांत ,सूर्यकांत ,राजशेखर ,भालचंद्र कुलकर्णी, जगदीश खेबुडकर ,अनंत माने, लीला गांधी ,हंसा वाडकर, व्ही .शांताराम, तमाशा प्रधान चित्रपटात नाच्याची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते गणपत पाटील असे दिग्गज कलावंत दिले.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने