तुळशी धरण || Tulashi Dam Information In Marathi
धरणाचे नाव- तुळशी धरण (Tuslhi Dam)
नदीचे नाव- तुळशी नदी
ठिकाण- धामोड, राधानगरी
जिल्हा- कोल्हापूर
Tulashi Dharan Marathi Mahiti
तुळशी धरण हे राधानगरी तालुक्यातील धामोड गावाजवळ आहे. धरणाचे बांधकाम हे तुळशी नदीवर केले गेले आहे. तुळशी नदीविषयी सांगायचे झाले तर ही नदी पंचगंगेची उपनदी असून पंचगंगा ही नदी कृष्णा माईची उपनदी आहे. धरणाचे बांधकाम हे 1978 साली पूर्ण झाले.
तुळशी धरणाची उंची ही 48.68 मीटर म्हणजे 159 फूट इतकी आहे. धरणाची लांबी ही 1512 मीटर म्हणजेच 4960 फूट इतकी आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 3.47 टीएमसी म्हणजेच एकूण 3470 दशलक्ष घनफुट इतकी आहे. तुळशी धरणाला एकूण 3 दरवाजे आहेत.
धरणाच्या पाण्याचा वापर हा मुख्यतः पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी केला जातो. पर्यटकांच्या दृष्टीने इथला जलाशय आणि ओव्हरफ्लो झालेले पाणी आकर्षणाचा विषय आहेत. काही मुख्य उत्सवांच्या प्रसंगी या धरणाच्या दरवाजांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते, ती देखील एक बघण्यासारखी गोष्ट असते.
तुळशी धरणाला कसे पोहोचाल?
राधानगरी शहरापासून 19 किलोमीटर तर कोल्हापूर शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.