म्हसवड धरण || Mhaswad Dam information in Marathi

म्हसवड धरण || Mhaswad Dam information in Marathi

धरणाचे नाव- म्हसवड धरण / राजेवाडी धरण (Mhaswad Dam / Rajewadi Dam)

नदीचे नाव- माणगंगा नदी

ठिकाण- राजेवाडी, माण

जिल्हा- सातारा

Mhaswad dam, rajewadi talav information in marathi

Mhaswad Dharan / Rajewadi Talav Marathi Mahiti

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील राजेवाडी गावाजवळ हे म्हसवड म्हणजेच राजेवाडी धरण आहे. धरणाचा बांध हा सांगली जिल्ह्यात येतो आणि जलाशय हा सातारा जिल्ह्यात आहे. वाहून जे पाणी पुढे जाते ते सोलापूर जिल्ह्यात जाते. या जलाशयाला धरणाचे रूप त्या काळात दिले गेले नसल्याने याला राजेवाडी तलाव देखील म्हणले जाते. धरणाचे बांधकाम हे माणगंगा नदीवर करण्यात आलेले असून माणगंगा ही नदी भीमा नदीची उपनदी आहे. 

म्हसवड धरणाला ब्रिटिश काळात बांधले गेले आहे. म्हसवड धरणाचे बांधकाम हे 1887 साली पूर्ण झाले. धरणाची उंची ही 24 मीटर म्हणजे 79 फूट इतकी आहे. तर लांबी ही 2473 मीटर म्हणजेच 8114 फूट इतकी आहे. म्हसवड धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 1.69 टीएमसी म्हणजेच 1690 दशलक्ष घनफुट इतकी आहे. म्हसवड धरणाच्या पाण्याचा उपयोग हा शेतीसाठी प्रामुख्याने केला जातो. 

म्हसवड धरणाला कसे पोहोचाल?

म्हसवड हे धरण म्हसवड शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे. सातारा शहरापासून हे धरण 103 किलोमीटर अंतरावर आहे. राजेवाडी मार्गे किंवा फणसावडे मार्गे तुम्ही या राजेवाडी तलावाकडे येऊ शकता. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने