आता वापरा डिजिटल नोटा, कागदी नोटा होणार बंद ।। RBI Launching Digital Currency like Bitcoin

आता वापरा डिजिटल नोटा, कागदी नोटा होणार बंद ।। RBI Launching Digital Currency like Bitcoin

RBI digital currency marathi

पुढील काळात कदाचित आपल्याला आर्थिक व्यवहारांसाठी कोणत्याही प्रकारे आपल्या खिशात कागदी नोटा बाळगण्याची गरज पडणार नाहीये कारण लवकरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल करन्सी घेऊन येणार आहे. नेमकी ही डिजिटल करन्सी काय असेल आणि आपल्याला त्याचे काय फायदे होतील याविषयी या लेखातून जाणून घेऊयात!

आपण अनुभवले असेल की काही काळापासून आपल्या चलनातून अनेक नाणी ही हद्दपार होत गेली आहेत आणि आता हीच वेळ नोटांवर येणार आहे. भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस आल्यामुळे भारतातील अनेक रोखीचे व्यवहार हे डिजिटल झाले आहेत. डिजिटल झालेले हे व्यवहार आपल्या रोखीचे व्यवहार जवळपास संपुष्टात आणत आहे.  पुढील काळात हे रोख व्यवहार अधिकच कमी होत जातील. पुढे जाऊन कदाचित या कागदी नोटा बंद होतील कारण  भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच डिजिटल करन्सी आणण्याची तयारी करत आहे. 

RBI DIGITAL CURRENCY

RBI घेऊन येत असलेली डिजिटल करन्सी ही बिटकोईन सारखीच असेल. बिटकॉईन आणि त्यातील गुंतवणूक ही कायदेशीर नसते हे आपल्याला माहीत आहे परंतु RBI जी डिजिटल करन्सी घेऊन येईल त्यातील व्यवहार हे कायदेशीर व पारदर्शक दोन्ही असतील.  बिटकॉईन प्रमाणेच मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकाच्या मदतीने डिजिटल करन्सीची देवाण घेवाण ही आपल्याला करता येईल. 

हे सर्व व्यवहार करताना एखादे app किंवा बँक अशा कोणत्याही थर्ड पार्टीचा समावेश हा नसेल.  म्हणजे जे काही व्यवहार असतील ते थेट होतील. 

अनेक देश आता डिजिटल करन्सी कडे वळत असल्याने भारत देखील आता हे पाऊल उचलतो आहे. ही डिजिटल करन्सी बाजारात कधी येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

डिजिटल करन्सी आणि RBI

डिजिटल करन्सी ही रिझर्व्ह बँक स्वतः देणार असल्याने त्यात पैशाचे मूल्य बदलणे किंवा जास्त पैसा चलनात आणणे या गोष्टी घडणार नाहीत. सर्व काही कायदेशीर आणि पारदर्शक असेल. 

RBI च्या डिजिटल करन्सी चे नाव काय आहे?

अजून RBI ने खरच ही करन्सी भारतात येईल किंवा नाही हे ऑफिशियल दृष्ट्या सांगितले नाहीये. त्यामुळे हे नाव अजूनही माहीत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने