जळगाव जिल्ह्याविषयी माहिती || Jalgaon District Information in Marathi
सातपुडा आणि अजिंठा पर्वतरांगांच्या मध्ये असलेला हा जिल्हा म्हणजे जणू बहिणाबाईंच्या कवितांची आठवणीत रमवतो. अहिराणी भाषेची आपुलकी या भागात गेल्यावर आपल्याला अनुभवायला मिळते. साने गुरुजींचे धडे ज्या भागाने अनुभवले त्या भागात आपण आज जाणार आहोत. आज आपण जळगाव जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती (Jalgaon District Information in Marathi) आपण जाणून घेणार आहोत.
जळगाव जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Geographical Information about Jalgaon District in Marathi
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या खानदेश विभागात येतो.उत्तर सातपुडा पर्वतरांगांमध्ये आणि अजिंठा पर्वतरांगांमध्ये दक्षिणेकडे स्थित आहे.या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 42 लाख 29 हजार 917 इतकी असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 11 हजार 765 चौरस किलोमीटर इतके आहे .जिल्ह्यात सरासरी 690 मिलिमीटर इतका पाऊस पडतो.येथे प्रामुख्याने मराठी आणि अहिराणी या भाषा बोलल्या जातात .जळगाव जिल्ह्यात एकूण पंधरा तालुक्यांचा समावेश होतो.त्यामध्ये जळगाव ,पाचोरा ,अंमळनेर ,यावल, एरंडोल, भुसावळ, चाळीसगाव ,जामनेर ,जळगाव, चोपडा, रावेर, धरणगाव ,पारोळा ,मुक्ताईनगर आणि बोदवड हे तालुके येतात .
जळगाव जिल्ह्यातील नद्या व धरणे- Rivers and Dams in Jalgaon District
जळगाव जिल्ह्यात तापी ,गिरणा आणि वाघुर या प्रमुख नद्या आहेत. तापी नदीवर बांधलेले हातनुर धरण जळगाव जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. वाघूर डॅम देखील जळगाव जिल्ह्यातील एक पर्यटकांना आकर्षित करणारे धरण आहे.
प्रसिद्ध कवी बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव जिल्ह्यातल्या होत्या. तर साने गुरुजी यांचा हा जिल्हा कर्मभूमी होता.
जळगाव जिल्ह्यातील महत्वाची ठिकाणे- Important Places from Jalgaon District
श्री क्षेत्र पद्मालय- हे जळगाव पासुन सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे. पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाफ आहे. पद्मालय चा अर्थ संस्कृत मध्ये कमळाचे घर असा होतो. पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पीठा मधील एक आहे. हे मंदिर अर्धपीठ म्हणून सन्मानित आहे. या मंदिरामध्ये दोन स्वयंभू गणेश मुर्त्या आहेत. आमोद आणि प्रमोद.
उनपदेव येथे गरम पाण्याचा झरा आहे. श्री शेत्र उनपदेव सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे ठिकाण भेट देणाऱ्या दुर्गम तीर्थ क्षेत्रापैकी एक आहे. या मंदिराचा प्रमुख झरा गरम पाण्याचा झरा आहे. सातपुडा पर्वतरांगेतील इतर गरम पाण्याचे झरे म्हणजे सुनपदेव आणि निझर देव. या तीनही ठिकाणचा उल्लेख रामायणात काव्यात आढळतो.
फरकांदेचे झुलते मनोरे हे कूट वाडी नदीच्या काठावरील एरंडोल पासून 16 किलोमीटर अंतरावर आहेत. हे जुन्या बांधकाम तंत्राचे एक उत्तम उदाहरण आहे .याचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही मनोरे 15 मीटर लांब आहेत .याशिवाय यातील एक बुरुज हलविल्यास इतर बुरुज देखील आपोआप हलू लागतात .
संत मुक्ताबाई मंदिर ,मुक्ताईनगर येथील मंदिर आणि नवी मुक्ताबाई मंदिर अशी या देवतेचे दोन मंदिरे आहेत. मुक्ताई किंवा मुक्ताबाई वारकरी परंपरेतील अत्यंत लोकप्रिय संत आहेत.त्यांनी आपल्या आयुष्यात सुमारे 41 अभंग लिहले.मुक्ताबाई यांचा सर्वात लोकप्रिय आणि विचारशील अभंग म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा!
चांगदेव मंदिर- मुक्ताईनगर येथून जवळच 13 किलोमीटर अंतरावर व भुसावळ येथून 35 किलोमीटर अंतरावर आहे .हे ठिकाण मुक्ताईनगर या तालुक्यात येते .येथील चांगदेवाचे मंदिर दगडात बांधलेले आहे.दगड घोटून व घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे वास्तू फार मजबूत आहे.
श्री मनुदेवी मंदिर जळगाव पासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे .मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आणि मन प्रसन्न करणारा आहे.कुलस्वामिनी श्री मनुदेवी सातपुडा पर्वत रांगा निवास करेल असे श्रीकृष्णाने म्हटले होते.अशी आख्यायिका येथे सांगितली जाते .या मंदिराच्या तिन्ही बाजूस उंच कडे असून मंदिराच्या समोर अंदाजे 400 फूट उंचावरून कोसळणारा धबधबा आहे .
जळगाव जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटन स्थळे- Devotional and Tourist Places in Jalgaon District
जळगाव शहरामध्ये अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत.त्यामध्ये ओमकारेश्वर मंदिर आणि श्रीराम मंदिर यांचा समावेश होतो.
गांधी तीर्थ, गांधी उद्यान ,कांताई बंधारा ,आर्यन पार्क अशी या जिल्ह्यात अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. चाळीसगाव तालुक्यातील कालीमठ व गंगा आश्रम, याच तालुक्यातील पाटणादेवी देवस्थान आहे. अमळनेर येथील साने गुरुजी तत्वज्ञान मंदिर आणि संत सखाराम महाराज मंदिर , पारोळा येथील भुईकोट किल्ला (हा झाशीची ची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला होता).अमळनेर येथील भुईकोट किल्ला, यावल येथील भुईकोट किल्ला, वढोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर ,रावेर तालुक्यातील पाल हे थंड हवेचे ठिकाण, मेहरुन तलाव, वाघुर डॅम ,तरसोद येथील गणपती मंदिर, कुसुंबा येथील गोशाळा ,पाळधी येथील साईबाबा मंदिर आणि वाघणि येथील श्रीकृष्ण मंदिर हे सर्व जिल्ह्यातील आकर्षणच आहेत.