मोर्णा गुरेघर धरण || Morna Gureghar Dam Information in Marathi

मोर्णा गुरेघर धरण || Morna Gureghar Dam Information in Marathi

Normal gurjar dam information in marathi

धरणाचे नाव-
मोर्णा गुरेघर धरण / मोरणा गुरेघर धरण (Morna Gureghar Dam)

नदीचे नाव- मोर्णा/ मोरणानदी

ठिकाण- पाटण

जिल्हा- सातारा

Morna Gureghar Dharan Marathi Mahiti

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या पाटण गावाच्या जवळ हे मोर्णा गुरेघर धरण आहे. पाटण तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून एक वेगळी ओळख देखील आहे.  पाटण तालुक्यातून वाहणाऱ्या मोर्णा या नदीवर हे धरण बांधलेले असून ही नदी कोयना नदीची तर कोयना नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. 

2006 साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. मोर्णा गुरेघर धरणाची उंची ही 47 मीटर म्हणजे 154 फूट इतकी आहे. धरणाची लांबी ही 420 मीटर म्हणजेच 1380 फूट इतकी आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 1.4 टीएमसी म्हणजेच 1400 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला 3 मुख्य दरवाजे आहेत. 

मोर्णा गुरेघर धरण हे शेतीसाठी पाणीपुरवठा करते.  धरणाच्या भिंतीजवळून आपल्याला एका नयनरम्य धबधब्याचे दर्शन होते. बाजूने डोंगररांगा असल्याने आपल्याला अनेक नयनरम्य दृश्य हे बघायला मिळतात. हा प्रकल्प दोन अभयारण्य म्हणजे चांदोली आणि कोयना प्रकल्पांच्या सीमेवर आहे. म्हणजे आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा अनुभव घेत असतो. 

मोर्णा गुरेघर धरणाला कसे पोहोचाल?

पाटण शहरापासून मोर्णा गुरेघर धरण हे 13 किलोमीटर तर सातारा शहरापासून 71 किलोमीटर अंतरावर आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने