तारळी धरण सातारा || Tarali Dam Information in Marathi
धरणाचे नाव- तारळी धरण (Tarali Dam)
नदीचे नाव- तारळी नदी
ठिकाण- मुरुड, पाटण
जिल्हा- सातारा
Tarali Dharan Marathi mahiti
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मुरुड गावाच्या शेजारी तारळी धरण आहे. धरणाचे बांधकाम हे तारळी नदीवर केलेले आहे. तारळी ही नदी कृष्णा माईची उपनदी आहे. धरणाच्या बांधकामाला सुरुवात 1997 मध्ये झाली आणि काम पूर्ण 2007 साली झाले.
धरणाची उंची ही 73.41 मीटर म्हणजे 240 फूट आहे तर धरणाची लांबी ही 1096 मीटर म्हणजे 3595 फूट आहे. तारळी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 10 टीएमसी म्हणजे 10000 दशलक्ष घनफुट आहे. धरणाला एकूण 5 दरवाजे आहेत.
तारळी धरणाला देखील गळती लागली आहे. त्यावर फक्त मलमपट्टी करण्याचे काम सरकार आणि प्रशासन करत आहे. पुढे जाऊन खटाव मान तालुक्यांना हे धरण पाणी पुरवते.
तारळी धरणाला कसे पोहोचाल?
पाटण शहरापासून तारळी हे धरण 37 किलोमीटर अंतरावर आहे. सातारा शहरापासून तारळी धरण 36 किलोमीटर अंतरावर आहे.