उरमोडी धरण सातारा || Urmodi Dam Information in Marathi

उरमोडी धरण सातारा || Urmodi Dam Information in Marathi

धरणाचे नाव- उरमोडी धरण (Urmodi Dam)

नदीचे नाव- उरमोडी नदी

ठिकाण- परळी, सातारा

जिल्हा- सातारा

Urmodi dam information in marathi

Urmodi Dharan Marathi Mahiti

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असलेले उरमोडी धरण या विषयावर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. उरमोडी हे धरण सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात असलेल्या परळी गावाच्या जवळ आहे. 

उरमोडी या धरणाचे बांधकाम हे उरमोडी नदीवर केले गेलेले आहे. उरमोडी नदी ही कृष्णा माईची उपनदी आहे. उरमोडी नदीविषयी सांगायचे झालेच तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध वज्रई धबधबा मधून येणारे पाणी हे पुढे उरमोडी नदी बनते. धरणाच्या बांधकामाला सुरुवात 1997 साली झाली तर बांधकाम हे 2003 साली पूर्ण झाले. धरणाची उंची ही 50.1 मीटर म्हणजेच 164 फूट तर धरणाची लांबी 1960 मीटर म्हणजे 6430 फूट इतकी आहे. 

उरमोडी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 10 टीएमसी म्हणजेच 10000 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला एकूण 4 दरवाजे आहेत. 

पर्यटनाच्या दृष्टिने सज्जनगड किल्ला आहे आणि येथून आपण धरणाच्या जलाशयाचा आनंद घेऊ शकता. 

उरमोडी धरणाला कसे पोहोचाल?

उरमोडी हे धरण सातारा शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर असून पर्यटकांसाठी एक खास पर्वणी आहे. इथे तुम्ही थांबणार असाल तर शेजारी आपली टेंट किंवा रूम्स दोन्हींची व्यवस्था ही होऊ शकते. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने