यरळवाडी धरण, खटाव सातारा || Yeralwadi Dam information in Marathi
धरणाचे नाव- यरळवाडी धरण (Yeralwadi Dam)
नदीचे नाव- येरळा नदी
ठिकाण- यरळवाडी, खटाव
जिल्हा- सातारा
Yeralwadi Dharan Marathi Mahiti
आपल्या वेबसाईटवर आपण सर्व धरणे बघत आहोत त्याचाच एक भाग म्हणजे आज आपण सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण बघणार आहोत. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील यरळवाडी या गावानजीक हे यरळवाडी धरण आहे. धरणाला येरळवाडी असे देखील म्हणले जाते. या धरणाची निर्मिती ही येरळा या नदीवर केली गेली आहे.
सातारा जिल्ह्यातील ही येरळा नदी कृष्णा माईची उपनदी आहे. धरणाचे बांधकाम हे 1973 साली पूर्ण झाले. धरणाची उंची ही 19.5 मीटर म्हणजे 63 फूट इतकी आहे. तर धरणाची लांबी 2115 मीटर म्हणजे 6938 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 1.17 टीएमसी म्हणजेच 1170 दशलक्ष घनफुट इतकी आहे.
यरळवाडी धरणाला कसे पोहोचाल?
खटाव शहरापासून 25 किलोमीटर तर सातारा शहरापासून 62 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.