वीर धरण, सातारा || Veer Dam Satara information in Marathi
धरणाचे नाव- वीर धरण (Veer Dam)
नदीचे नाव- नीरा नदी
ठिकाण- शिरवळ, खंडाळा
जिल्हा- सातारा
Veer Dharan Marathi Mahiti
महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातील एक धरण म्हणजे वीर धरण! आज याच धरणाविषयी आपण जाणून घेणार आहोत. सातारा जिल्ह्यातील खंडाळा या तालुक्यातील शिरवळ गावाच्या शेजारी हे वीर धरण वसलेले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याची सीमा देखील धरणाला लागूनच आहे. याच तालुक्यातील वीर या गावावरून धरणाला वीर धरण असे नाव पडले आहे. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्याच्या सीमेवर धरण असल्याने धरणाचा फायदा दोन्ही जिल्ह्यांना होत असतो.
लॉइड धरणातील पाणी अडविण्यासाठी पुढे जाऊन हा बंधारा आधी बांधण्यात आला होता. पुढे जाऊन तिथेच मोठे धरण बांधण्यात आले आणि मग त्याला वीर धरण असे नाव देण्यात आले. नीरा नदीवर बांधकाम करून वीर धरणाची निर्मिती झालेली आहे. 1965 साली वीर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
धरणाची उंची ही 35.81 मीटर म्हणजे 117 फूट आहे. वीर धरणाची लांबी ही 3629 मीटर म्हणजे 11906 फूट इतकी आहे. वीर धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 10.15 टीएमसी इतकी म्हणजेच 10150 दशलक्ष घनफुट आहे. वीर धरणाच्या पाण्याचा वापर हा शेतीसाठी तर होतोच परंतु 9 मेगावॅट चा वीजनिर्मिती प्रकल्प देखील या धरणावर बांधण्यात आलेला आहे. धरणाला दोन कालवे असून एक कालवा हा पुणे जिल्ह्यातील शेतीसाठी तर दुसरा कालवा हा सातारा जिल्ह्यात शेतीसाठी पाणीपुरवठा करतो.
वीर धरणाला कसे पोहोचाल?
वीर धरण हे खंडाळा शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. सातारा या शहरापासून 80 किलोमीटर इतक्या अंतरावर हे धरण वसलेले आहे. पुण्यापासून 64 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.