फायनान्स म्हणजे काय? संपूर्ण माहिती मराठी मध्ये || What is Finance in Marathi

फायनान्स म्हणजे काय? संपूर्ण माहिती मराठी मध्ये || What is Finance in Marathi

फायनान्स (Finance) विषयी कायमच आपण ऐकत असतो. हा एक अर्थपूर्ण आणि व्यापक असा शब्द आहे. कित्येक वेळा तुमच्या डोक्यात हा विचार नक्कीच आला असेल की What is Finance in Marathi? फायनान्स काय असत? हु गोष्ट कदाचित तुम्ही इंटरनेटवर सर्च करून देखील बघितली असावी. इंटरनेटवर याविषयी अगदी कमी आर्टिकल आहेत आणि जी माहिती आहे ती संपूर्ण मराठी भाषेत तुम्हाला कुठेच मिळणार नाही.  तर या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात की फायनान्स चा अर्थ काय होतो?

Finance in marathi


फायनान्स म्हणजे काय? (What is Finance in Marathi)

Finance meaning in Marathi - फायनान्स हा शब्द फ्रेंच भाषेतून घेतलेला आहे. फायनान्स चा मराठी अर्थ हा वित्त असा होतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर वित्त किंवा फायनान्स या गोष्टी संपत्तीशी किंवा पैशाशी निगडित आहेत. परंतु फायनान्स हा खूप वेगवेगळ्या अर्थाने वापरला जाणार शब्द आहे. फायनान्स हा अनेक कमर्शियल कार्यांमध्ये वापरला जाणाऱ्या गोष्टींचा जुडगा आहे असे म्हणले तरी काही हरकत नसावी. कोणत्याही व्यक्तीला, कंपनीला किंवा प्रशासनाला देखील काम करण्यासाठी फायनान्स ची गरज असते. 


फायनान्स चे प्रकार (Types of Finance) 

व्यक्तिगत वित्त / पर्सनल फायनान्स (Personal Finance)

कंपनी वित्त / कॉर्पोरेट फायनान्स (Corporate Finance)

सार्वजनिक वित्त / पब्लिक फायनान्स (Public Finance)


तिन्ही प्रकारच्या फायनान्सचे कार्य हे सारखेच आहे जसे की, योग्य प्रकारे गुंतवणूक करणे, कमी व्याजदरावर कर्ज मिळविणे, देणे देण्यासाठी फंडाची व्यवस्था करणे आणि बँकिंग. परंतु त्यांच्या वापराच्या प्रकारानुसार तर वेगळे असतात जसे की काही एखाद्या व्यक्तीच्या वापरासाठी असतात तर काही कंपनी किंवा सरकारी उपयोगात येतात.


पर्सनल फायनान्स काय असतो? (Personal Finance in Marathi)

Personal Finance meaning in Marathi -  पर्सनल फायनान्स चा मराठी अर्थ हा वैयक्तिक किंवा व्यक्तिगत वित्त असा होतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर  एखाद्या व्यक्तीसाठी वैयक्तिक रित्या पैशाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण होत असेल तर त्याला वैयक्तिक वित्त असे म्हणतात. प्रत्येक व्यक्ती हा ज्याच्या त्याच्या परीने त्याचे पैसे सांभाळत असतो म्हणजेच प्रत्येकाची पद्धती ही वेगळी असते. वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मॅनेज करणे हेच पर्सनल फायनान्स आहे.


कॉर्पोरेट फायनान्स काय असतो? (What is Corporate Finance in Marathi)

Corporate Finance meaning in Marathi- तुम्हाला माहीतच आहे की पर्सनल फायनान्स मध्ये कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक इनकम, खर्च आणि गुंतवणूक आराखड्याची चर्चा केली जाते. तर कॉर्पोरेट फायनान्स म्हणजेच कंपनी वित्त मध्ये कंपनी, संघटना किंवा एखाद्या समूहाच्या इनकम, खर्च आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स विषयी माहिती असते.यात त्या कंपनी ची कमाई, कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर खर्च आणि गुंतवणूक यांचा देखील समावेश असतो.


पब्लिक फायनान्स काय आहे? (Public Finance in Marathi)

 पब्लिक फायनान्स या नावातूनच स्पष्ट होते की हा सार्वजनिक फायनान्स चा भाग आहे. या प्रकारच्या फायनान्स चा संबंध हा शक्यतो सरकारशी निगडित असतो.  पब्लिक फायनान्स चा मराठी अर्थ हा सार्वजनिक वित्त असा होतो. पब्लिक फायनान्स चा संबंध हा सार्वजनिक क्षेत्राशी येतो. सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय देवाण घेवाण, गुंतवणूक, हिशोब हा सरकार ठेवत असते.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला फायनान्स विषयी थोडक्यात माहिती मिळाली असेल. इतरही फायनान्स क्षेत्राशी निगडित आर्टिकल आमच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळतील. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने