नागपूर जिल्ह्याची माहिती- Nagapur District Information In Marathi

नागपूर जिल्ह्याची माहिती- Nagapur District Information In Marathi

नागपूर म्हणले की संत्र्याची आठवण ही नक्कीच होते। विदर्भ भागात येणारा हा नागपूर जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचा तर मध्यबिंदू आहेच परंतु संपूर्ण भारताचा देखील मध्यबिंदू आहे. याच नागपूर जिल्ह्याविषयी आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Nagpur District Information in Marathi

Nagpur District information in Marathi


नागपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Nagpur District Geographical Information in Marathi

नागपूर हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. येथे दरवर्षी महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरवले जाते. नागपूर हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी असून, येथील झिरो माइल मार्ग भारताचा भौगोलिक मध्य बिंदू दर्शविते. हा जिल्हा देशाच्या मध्यभागी  असल्यामुळं येथून महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग जातात. विशेषतः मुंबई ,दिल्ली ,कोलकत्ता, चेन्नई या महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे गाड्या नागपुर येथूनच जातात. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 46 लाख 53 हजार 570 आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे 9897 चौरस किलोमीटर आहे. नागपूर जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान 1205 मिलिमीटर आहे.


या जिल्ह्यातील मुख्य पिके ऊस, संत्री ,गहू ,ज्वारी, तूर, मूग ,सोयाबीन, सूर्यफूल ,कापूस, इत्यादी आहेत. नागपूर शहर हे संत्रानगरी नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील संत्रे संपूर्ण भारतात तसेच परदेशातही निर्यात होतात. या शहराला नुकतेच स्वच्छ शहर आणि भारतातील दुसरे हिरवे शहर असे नामांकन मिळाले आहे.


नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर वर्धा नदी आणि पूर्व सीमेवर वहिनी गंगा नदी आहे. कन्हान ही जिल्ह्याची मुख्य नदी आहे आणि ही नदी जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते. नागपूर शहराची स्थापना गोंड  राजा 'बक्त बुलंद' या राजाने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली. नागपूर जिल्ह्यातील 14 तालुके आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यात 12  विधानसभा मतदार संघ आहेत.

नागपूर जिल्ह्यातील काही महत्त्वाची स्थळे- Important Places in Nagpur District

नागपूर जिल्ह्यातील धरणे आणि तलाव - Dams and Lakes from Nagpur District

तोतलाडोह धरण:

नागपूर जिल्ह्यात नागपूर शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेक जवळील पेंच नदीवर असलेले तोतलाडोह धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर हा परिसर आहे. हा परिसर अतिशय मनमोहक आहे.

खिंडसी तलाव: 

रामटेक तालुक्यात असलेला खिंडसी तलावाच्या सभोवताली घनदाट जंगल आहे. नागपूर शहरापासून 53 किलोमीटर अंतरावर आणि रामटेक पासून 3.5 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. येथे येणारे पर्यटक मोटर बोट, पेडल बोट, रोविंग बोट, वॉटर स्कूटर्स इत्यादी च्या माध्यमातून जलतरणात आनंद घेऊ शकतात.

खेक्रा नाला ,धरण :

नागपूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या खापरा येथील खेक्रा नाला हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे . खापा जवळील चिंदवाडा मार्गावर हे ठिकाण आहे. साहसी कृत्य करणाऱ्यांसाठी विशेषतः पर्वत रोहका साठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे . 

गांधी सागर तलाव :

नागपूर च्या महाल भागात असलेला गांधीसागर  तलाव हा शुक्रवार तलाव आणि जुम्मा तलाव या नावाने ओळखला जातो .रमण सायन्स सेंटर च्या अगदी समोर हा तलाव आहे. सुमारे 275 वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुलतान यांच्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्वात आला असल्याचे बोलले जाते .

सक्करदरा तलाव:

एखाद्याला निसर्गाच्या अद्भुत गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल ,तर त्याने येथे नक्की भेट द्यावी . भारताचा शून्य मैलाचा दगड हा देखील येथेच आहे .ब्रिटिशांनी झिरो माईल स्टोन ची स्थापना केली होती.झिरो माईल स्टोन मध्ये चार घोडे आणि एक वाळूचा खडक असलेला खाब आहे.

नागपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे- Temples from Nagpur District

रामटेक येथील राम मंदिर :

रामटेक हे नागपूर पासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे .श्रीराम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते, त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले .येथे प्रभू श्रीरामांचे सुमारे 600 वर्षे जुने एक मंदिर आहे .

दीक्षाभूमी: 

दीक्षाभूमी चे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना सोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. दीक्षाभूमी हा सर्वात मोठा स्तूप आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन या दिवशी देश व विदेशातील विशेषतः नवबौद्ध येथे अभिवादन करण्यासाठी येतात.

ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी: 

कामठी या गावाजवळील ड्रॅगन पॅलेस हे प्रसिद्ध बौद्ध विहार आहे. या विहारांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपश्यना केंद्र आहेआहे.

नागपूर जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळे - Tourist Places in Nagpur District

सातपुडा बोटॅनिकल गार्डन :

नागपूरचा फुटाळा तलावाजवळ सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बोटॅनिकल गार्डन हे अतिशय अद्भुत गार्डन आहे. येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र ,प्राणीशास्त्र आणि पर्यावरण या विषयांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे .


याशिवाय येथे काही महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा आहेत .त्यामध्ये नागपुर पेंच प्रकल्प ,राष्ट्रीय उद्यान ,नागपूर मध्यवर्ती संग्रहालय हे प्रसिद्ध आहे .अंबाझरी तलाव, महाकवी कालीदास स्मारक, मनसर येथील रामधाम ,आदासा येथील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. भिवगड किल्ला येथे गुंड देवस्थान आहे .सात बर्डी चा किल्ला हा देखील नागपूर मध्ये आहे .रमण विज्ञान केंद्र आणि देवलापार येथील गोशाळा आहे.नागपुरात वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.महाराष्ट्र शासन आयोजित कालिदास महोत्सव आठवडाभर चालतो .या महोत्सवात अनेक संगीत नृत्य विषयक कार्यक्रम होतात.राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार त्यात भाग घेतात. लोकनृत्य महोत्सव हा कार्यक्रम दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित केले जातात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने