शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश || Teachers Day Wishes and Quotes in Marathi
देशभरात 5 सप्टेंबर या दिवशी उत्साहाने शिक्षक दिन साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा यादिवशी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शिक्षकांना काहीतरी भेटवस्तू किंवा शुभेच्छा देण्याचा आनंद असतो तशाच प्रकारे शिक्षक दिनाच्या दिवशी देखील विद्यार्थी शिक्षकांना त्यांच्या त्यांच्या परीने मदत करत आपले प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात.
या कोव्हिडं काळात आणि कोव्हिडं गेल्यानंतर देखील आपल्याला काही काळ भेटणे हे शक्य नाहीये त्यामुळे आपण ज्या शिक्षकांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही त्यांना शिक्षक दिनाच्या एक खास शैलीत शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद हा नक्कीच वाढवू शकतो.
आम्ही या लेखात शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा (Teachers Day Wishes in Marathi), शिक्षक दिनानिमित्त प्रेरणादायी विचार/ कोट्स (Teachers Day Inspirational Quotes in Marathi), शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Teachers Day Wishes in Marathi), शिक्षक दिनासाठी विशेष व्हाट्सअप्प स्टेट्स (Whatsapp Status for Teachers Day in Marathi), शिक्षक दिनासाठी कविता आणि चारोळी (Teachers Day Wishes, Quotes, Poems in Marathi), शिक्षक दिनानिमित्त सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार (Sarwapalli Radhakrishnan Thoughts on Teachers Day in Marathi) या सर्व गोष्टी बघणार आहोत.
शिक्षक दिनानिमित्त प्रेरणादायी विचार / कोट्स - Teachers Day Inspirational Quotes and Thoughts in Marathi
शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक
शिक्षक दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
शिक्षक दिनासाठी काही सुविचार खाली देत आहे. तुम्ही ते शिक्षक दिनाच्या शुभेच्छा म्हणून शिक्षकांना पाठवू शकता.
जगण्यासाठी ऑक्सिजन आणि जगण्याला दिशा देण्यासाठी शिक्षक दोघेही अत्यावश्यक असतात!
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर तुमचा स्वतःवर विश्वास हवा आणि हाच विश्वास देण्याचे काम एक शिक्षक करत असतो.
जेव्हा तुम्हाला योग्य मार्गदर्शक मिळतो तेव्हा जीवनाला कलाटणी ही आपोआप मिळते.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Teachers Day Wishes in Marathi
आपल्याला एक चांगला नागरिक घडविणाऱ्या त्या निर्मात्यांना माझा शत शत प्रणाम !
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शिक्षक आपल्याला फक्त शिकवतात असे नाही तर ते आपल्याला आपल्या मुलांप्रमाणे समजवून सांगून आपले भविष्य घडवत असतात.
माझे पहिले गुरू नंतर मित्र आणि मार्गदर्शक बनून मला जीवनाच्या वाटेवर प्रकाश देण्यासाठी धन्यवाद!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आम्हाला घडविण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत ही खरच खूप कठोर होती, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी राहू!
शिक्षक दिनानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!!
गुरू म्हणजे कोण?
आईही गुरू आहे, वडीलही गुरू आहेत,
शाळेत शिकविणारे प्रत्येक शिक्षक हे गुरू आहेत,
इतकेच नाही तर आयुष्यात जो कोणी आपल्याला काहीही शिकवेल तो देखील गुरुच आहे!
शिक्षक दिनानिमित्त माझ्या सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम!!
तुम्ही शिकवलं वाचायला,
तुम्ही शिकवलं लिहायला,
गणिताची सूत्रे भूगोलाची ठिकाणे शिकलो तुमच्याकडूनच
शतशः नमन करतो तुम्हाला!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
आई वडील आपल्याला जन्म देतात परंतु पुढे जाऊन आपले शिक्षकच आलेल्या देहाला आकार देत असतात.
शिक्षक दिनानिमित्त माझ्या सर्व गुरुजनांना हार्दिक शुभेच्छा!
मी भाग्यशाली आहे की तुमच्यासारखे शिक्षक मला मिळाले.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिकविण्याची शैली असेल तर ती तुमच्यापेक्षा चांगली कोणाकडेही नसेल.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी जो काही आहे तो आज माझ्या शिक्षकांमुळेच!
शिक्षक दिनानिमित्त तुम्हा सर्व गुरुजनांना माझा प्रणाम!
शिक्षक दिन मराठी संदेश - Teachers Day Marathi Messages
योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही,
खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही,
जेवहा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखविता तुम्ही,
आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखविता तुम्ही!
हॅपी टीचर्स डे
मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद. असाच तुमचा आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असेल तर माझं यशही असेच उत्तुंग राहील.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या आयुष्यातील प्रेरणा तुम्ही आहात, कारण सदैव शिस्त आणि सत्य ही शिकवण तुम्ही मला दिली. आपणास शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे
तेव्हा रस्ता दाखविता तुम्ही,
फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर
जीवन जगणे शिकवता तुम्ही!
Happy Teachers Day
जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचे शिल्पकार हे त्यांचे गुरू असतात. या देशभरातील शिल्पकारांना माझा प्रणाम!
शांततेचा धडा दिला,
अज्ञानाचा अंधःकार दूर केला,
गुरूने शिकविले आम्हाला
जीवनात जगायला,
द्वेषावरही प्रेमाने विजय मिळवायला!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
शिक्षक दिनानिमित्त व्हाट्सअप्प स्टेट्स - Whatsapp Status for Teachers Day in Marathi
बोट धरून चालायला शिकवलं तुम्ही
पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही,
तुमच्यामुळे आम्ही आज आहोत या ठिकाणी
शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी!
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवू हा वारसा!
५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक शिक्षकास कोटी कोटी प्रणाम...
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!