सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती || Solapur District Information in Marathi

सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती || Solapur District Information in Marathi

सोलापूर शहर हे दक्षिण महाराष्ट्रातील मुख्य शहर असून हा पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हा आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर आहे. सोलापूर शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणून ओळखले जाते होते. सोलापूर हे शहर भारतातील उत्तर दक्षिण रेल्वेमार्गावर असलेले मुख्य शहर आहे. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच 9 मे ते 11 मे  1930 या काळात 3 दिवसाचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मल्लपा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना 12 जानेवारी 1931 रोजी ब्रिटिशांनी सोलापूर मध्ये फाशी दिली. तेव्हापासून सोलापूर शहराला हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. बिडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे. सोलापूरची चादर खूप जास्त प्रसिद्ध असल्यामुळे या जिल्ह्यात सर्वात जास्त चादर उत्पादन होते. 

ज्वारीचे कोठार म्हणून देखील सोलापूर जिल्ह्याला ओळख निर्माण झालेली आहे.

Solapur district information in marathi

सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती - Geographical Information of Solapur District

सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 14886 चौरस किलोमीटर इतके आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत. सोलापूर जिल्ह्यात करमाळे, बार्शी, माढे, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, मंगळवेढे, अक्कलकोट हे तालुके आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान हे 545.4 मिलीमीटर आहे. भीमा नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्याचा इतर भाग हा सपाट आणि काहीसा पठारी आहे. जिल्ह्याचे हवामान हे सर्वसाधारण पणे उष्ण आणि कोरडे आहे. सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर आणि उस्मानाबाद, पश्चिमेस सातारा, दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य आहे. 

सोलापूर जिल्ह्याचा इतिहास - History of Solapur District

यादवांच्या काळात या भागाला सोन्नलागी असे म्हणले जात होते तर मुघलांच्या काळात या भागास संदलपूर असे म्हणले जात. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज आहे. जानेवारी 1920 मध्ये कामगारांचा संप कोल्हापुरात झाला होता.

सोलापूरचे प्राचीन म्हणजे बाराव्या शतकातील रहिवासी   श्री शिवयोगी सिद्धेश्वर यांनी या परिसरात 68 शिवलिंगांची स्थापना केली. वीर शैव धर्माच्या माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूर जिल्ह्याची पाणी समस्या संपवली. सोलापूर मध्ये सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच गड्डा ही मोठी यात्रा असते. 

सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे- Tourist Places in Solapur District

भुईकोट किल्ला-

भुईकोट किल्ला सोलापूर हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. किल्ला आता सुशोभीकरण केलेला आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी काही नाममात्र शुल्क आकारण्यात येते. किल्ल्याचा प्रत्येक दरवाजा आजही भक्कम आहे. शहर दरवाजा, हत्ती दरवाजा, खादी दरवाजा अशी त्यांची नावे आहेत. किल्ल्यात उध्वस्त झालेले मंदिर आहे तसेच  इमारतीचे अवशेष देखील इथे बघायला मिळतात. नागबावडी विहीर आणि इंग्रज कालीन तोफा ही इथली वैशिष्ट्य आहेत.

हुतात्मा बाग

इंद्रभुवन म्हणजेच सध्याची महानगर पालिका इमारत

शुभराय आर्ट गॅलरी

स्मृती उद्यान

हत्तरसंग कुडल-

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात हे ठिकाण आहे. कुडल हा कन्नड शब्द आहे आणि याचा अर्थ संगम असा होतो. भीमा व सीमा यांचा संगम असून इथे संगमेश्वर आणि हरिहरेश्वर यांची हेमाडपंथी मंदिरे इथे आहेत.  

धर्मवीर संभाजी (कंबर) तलाव-

सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर हा तलाव आहे. महापालिकेने या ठिकाणाचे सुशोभीकरण केले आहे. 

डॉ द्वारकानाथ कोटणीस स्मारक-

दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केले असताना डॉ कोटणीस चीनला गेलेले होते. तिथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन 4 वर्षे रुग्णसेवा केली. तिथेच 9 डिसेंबर 1942 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर डॉ कोटणीस की अमर कहाणी हा हिंदी चित्रपट व्ही शांताराम  यांनी काढला होता. 

 

सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे - Temples in Solapur District

पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूर जिल्ह्यात असून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर देखील याच जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे प्राचीन मंदिर आहे. 

सिद्धेश्वर मंदिर-

श्री सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर शहराचे ग्रामदैवत आहे. हे मंदिर सोलापूर शहराच्या मध्यभागी आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूनी तलाव असून मंदिर एखाद्या बेटावर आहे असे। वाटते. बाराव्या शतकात सोलापूर शहरात श्री सिद्धराम नावाचे थोर संत होऊन गेले. त्यांनी श्री बसवेश्वर यांच्या शिकवणूक व उपदेशाचा प्रचार आणि प्रसार केला. दरवर्षी 14 जानेवारीला येथे यात्रा भरते. सिद्धेश्वर यात्रेला स्थानिक भाषेत गड्डा यात्रा असे संबोधले जाते.

मल्लिकार्जुन मंदिर

अर्धनरीनटेश्वर मंदिर, वेळापूर

संत दामाजी मंदिर, मंगळवेढा-

मंगळवेढा किंवा मंगळवेढे या ठिकाणी हे मंदिर आहे.


सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. कर्नाटक सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबर कन्नड, तेलगू, उर्दू आणि कन्नड देखील बोलली जाते. येथे तेलगू व कन्नड चित्रपट देखील प्रदर्शित होतात. सैराट हा 2016 मध्ये प्रसिद्ध झालेला बहुचर्चित चित्रपट निर्मिती देखील सोलापूर जिल्ह्यात झालेली आहे. सरकारी धोरणानुसार स्मार्ट सिटी यादीत सोलापूर शहराचे नाव समाविष्ट झाल्याने आता सोलापूर स्मार्ट शहर बनत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने