Top 30 Marathi Youtubers | मराठी भाषेत काम करणारे टॉप युट्युबर | टॉप 30 मराठी युट्युब चॅनल
युट्युब म्हणले की आपल्याला मनोरंजनाचे साधन वाटते परंतु मनोरंजन व्यतिरिक्त यावरून अनेक लोकांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. याशिवाय त्यांना पैसा मिळतोय हे वेगळेच!
काही काळापूर्वी मराठी भाषेत एखाद्याने काहीतरी व्हिडीओ बनवणे म्हणजे त्याला कमी View येतील किंवा त्याला जास्त Responce मिळणार का? याविषयी शंका निर्माण व्हायची मात्र आज काहीतरी वेगळी स्थिती आहे. आज मराठी युट्युबर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
Top Youtuber म्हणणं थोडंस चुकीचे ठरेल कारण आज आम्ही एखाद्याला त्याच्या subscriber किंवा तो किती जास्त पैसे कमावतो यावरून न ठरवता आज आपण त्याला त्याच्या लोकप्रियतेवरून टॉप मध्ये ठरवत आहोत.
चला तर मग आता पाहुयात Top आणि Famous असे Marathi Youtubers आणि Channels:
1 जीवन कदम व्हीलोग्स
चॅनलचे नाव- जीवन कदम व्हीलोग्स (Jeevan Kadam Vlogs)
चॅनल प्रकार- Vlog
Subscribers- 430K+
जीवन कदम व्हीलोग्स या चॅनल वर जीवन कदम हे त्यांच्या खास शैलीत आपल्याला गडकिल्ल्यांची भटकंती घडवितात. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र कोकण भटकंती आणि दुबईची वारी या गोष्टी देखील लोकांना जास्त आवडतात. मराठी मध्ये Vlog बनवून लोकांच्या घराघरात सध्या जीवन कदम पोहोचले आहेत. त्यांनी फॅमिली vlog देखील लॉकडाऊन पासून दूर केले आहेत.
2 विनायक माळी
चॅनलचे नाव- विनायक माळी (Vinayak Mali)
चॅनल प्रकार- कॉमेडी
Subscribers- 2.06 Million
आग्री कोळी भाषेत अनेकांच्या मनावर राज्य करणारे आणि संपूर्ण महाराष्ट्राला शेठ शेठ म्हणून वेड लावणारे विनायक माळी त्यांच्या खास शैलीत या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडीओ बनवून हसवत असतात.
3 मधुरा रेसिपी मराठी
चॅनलचे नाव- मधुरा'ज रेसिपी मराठी (Madhura's Recipe Marathi)
चॅनल प्रकार- कूकिंग
Subscribers- 5.64 Millions
मराठी भाषेत तुम्हाला खाद्यपदार्थ कसे बनवायचे हे जाणून घ्यायचे असेल तर मधुरा रेसिपी हे नाव संपूर्ण युट्युबवर चर्चेत असते. तुम्हाला अगदी पारंपरिक ते पाश्चात्य सर्व काही पदार्थ या चॅनलवर कसे बनवायचे हे बघायला मिळेल. त्यांनी इतकी जास्त प्रसिद्धी मिळविली आहे की त्यामुळे त्या स्वतःचे पुस्तक आणि मसाल्याचे पदार्थ देखील विक्री करतात.
4 राजश्री मराठी
चॅनलचे नाव- राजश्री मराठी (Rajshri Marathi)
चॅनल प्रकार- एंटरटेनमेंट
Subscribers- 3.35 Million
मराठी भाषेत नवीन मनोरंजन क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या चॅनल वर बघायला मिळतील. या चॅनल वर लेटेस्ट फिल्मी अपडेट, अभिनेत्यांसोबत झालेल्या गप्पा, मनोरंजन क्षेत्रातील बातम्या, मराठी चित्रपटांचे रिव्ह्यू, नाटकं, मराठी चित्रपट, गाणे या सर्व गोष्टी बघायला मिळतील.
5 मराठी संकेत
चॅनलचे नाव- मराठी संकेत (Marathi Sanket)
चॅनल प्रकार- आर्थिक सल्ला
Subscribers- 1.67 Million
करोडो मराठी लोकांना यशस्वी बनविण्यासाठी संकेत यांनी सुरू केलेले हे मराठी संकेत युट्युब चॅनल होय. यामध्ये ते शेअर मार्केट, गुंतवणूक, स्टॉक मार्केट याविषयी अधिक सविस्तर माहिती देतात.
6 भाडिपा
चॅनलचे नाव- भारतीय डिजिटल पार्टी (Bharatiya Digital Party)
चॅनल प्रकार- मनोरंजन
Subscribers- 1.03 Million
भारतीय डिजिटल पार्टी म्हणजे एखादी राजनैतिक पार्टी नाहीये तर हे आपले लाडके भाडिपा आहेत. सर्व मराठी लोकांना अफलातून कॉमेडी मधून हसवणारे भाडिपा चॅनल कॉमेडी व्हिडीओ आणि म्युझिक व्हिडीओ बनवते. यामध्ये शक्यतो ट्रेंडिंग विषयाला धरून अनेक भन्नाट कॉमेडी व्हिडीओ तुम्हाला बघायला मिळतील.
7 नामदेवराव जाधव
चॅनलचे नाव- नामदेवराव जाधव (Namdevrao Jadhav)
चॅनल प्रकार- प्रेरणादायी भाषण
Subscribers- 1.04 Million
नामदेवराव जाधव म्हणतात की अपयश ज्यांच्या शब्दकोशात नाही त्यांच्यासाठी मराठी भाषेतील प्रेरणा देणारे व्याख्यान या चॅनल वर आहेत. नामदेवराव जाधव हे एक लेखक, व्याख्याते, इतिहास संशोधक आणि काही ऐतिहासिक चित्रपट मालिकांचे सल्लागार आहेत. शिवाजी द मॅनेजमेंट गुरू यासारखे उत्कृष्ट पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. सध्याच्या परिस्थितीवर आणि तरुणांवर ते भाष्य करून त्यांना कशा प्रकारे योग्य वाटेवर आणता येईल याविषयी मार्गदर्शन करत असतात.
8 जोश टॉल्क मराठी
चॅनलचे नाव- जोश Talks मराठी
चॅनल प्रकार- कौशल्यपूर्ण यशस्वी लोकांची माहिती
Subscribers- 847 हजार
जोश talks ही एक संस्था आहे ज्यांची जवळपास 10 भाषां मध्ये जोश Talks नावाने चॅनल आहेत. यापैकी एक म्हणजे मराठी होय. तुम्हाला या चॅनेलवर विविध क्षेत्रातील यशस्वी लोकांविषयी त्यांच्या तोंडून त्यांचे अनुभव ऐकायला मिळतील. जोश Talks मराठी इथे मराठी लोकांचे अनुभव आणि त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल माहिती मिळेल.
9 श्रीमान लेजंड
चॅनलचे नाव- श्रीमान लेजंड लाईव्ह (Shreeman Legend Live)
चॅनल प्रकार- मराठी गेमिंग
Subscribers- 1.46 Million
मराठी गेमिंग विश्वात अनोख्या शैलीने सर्वांना वेड लावणारा हा श्रीमान लेजंड! मराठी भाषेत अनेक गेम्स तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम करून दाखवतो. यामध्ये PUBG, GTA 5, MINECRAFT यासारखे प्रसिद्ध गेम्स तर आहेच परंतु तो अनेक सिरीयल, युट्युबर लोकांना रोस्ट देखील करतो.
10 आपली आजी
चॅनलचे नाव- आपली आजी
चॅनल प्रकार- कूकिंग
Subscribers- 1.18 Million
एका आजी आणि नातवाने सुरू केलेले हे युट्युब चॅनल आज त्या आजीला लाखो नातू आणि नाती मिळवून देत आहेत. लोकडाऊन काळात या चॅनेलने अधिक लोकप्रियता मिळविली. आजी आणि तिचा नातू तुमच्यापर्यन्त हिंदू संस्कृतीत असणारे सर्व पदार्थ कसे बांवताता हे पोहोचवत आहेत. आपली आजी सध्या इतकी प्रसिद्ध झालेली आहे की त्यांच्या नावाने आता मसाले देखील विक्री केले जातात.
11 मराठी किडा
चॅनलचे नाव- मराठी कीडा (Marathi Kida)
चॅनल प्रकार- कॉमेडी मुलाखती आणि pranks
Subscribers- 763 हजार
मराठी भाषेत अनेकांच्या मुलाखती घेणे आणि एखाद्यसोबत prank करणे हे या चॅनेलचे केले आहे. नावात ज्याप्रमाणे किडा आहे ना तसाच कीडा या चॅनल वर आपल्याला बघायला मिळेल. वेळ घालविण्यासाठी आणि माहितीपूर्ण असे निखळ मनोरंजन मात्र या चॅनेलवर नक्की मिळेल यात काही शंका नाही.
12 शहाणपण
चॅनलचे नाव- शहाणपण (Shahanpan)
चॅनल प्रकार- मोटिव्हेशन
Subscribers- 1.08 Million
मराठी भाषेतील सर्वात चांगले प्रेरणा देणारे चॅनल म्हणून शहाणपण ला ओळख निर्माण झाली. या चॅनलवर असंख्य प्रेरणादायी मोटिव्हेशन देणाऱ्या व्हिडीओ उपलब्ध आहेत. आपले आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी कसे होईल यासाठी हा चॅनल आपल्याला मार्गदर्शन करेल.
13 हर्षदा स्वकुल
चॅनलचे नाव- हर्षदा स्वकुल (Harshada Swakul)
चॅनल प्रकार- माहितीपूर्ण
Subscribers- 237 हजार
ABP माझा वर तुम्ही हर्षदाला बऱ्याचदा बघितले असेल. ABP MAJHA सोडून हर्षदा ऑस्ट्रेलिया मध्ये गेली व तिने भारतातील समस्यांवर माहिती देणारे एक चॅनल सुरु केले आणि ते चॅनल म्हणजे हर्षदा स्वकुल होय.
14 स्नेहल निती
चॅनलचे नाव- स्नेहल नीती (SnehalNiti)
चॅनल प्रकार- उद्योगणिती
Subscribers- 588 हजार
मराठी मध्ये यश, बिझनेस आणि मोटिव्हेशन वर बोलतात. मराठी मध्ये एक चांगले मोटिव्हेशन चॅनल म्हणून स्नेहल नीती चॅनल ची ओळख आहे.
15 UIC Vlogs
चॅनलचे नाव- UIC Vlogs
चॅनल प्रकार- फॅमिली शॉर्टस
Subscribers- 650 हजार
घरातील कंटेंट बनवणारे हे UIC टेक्निकल चॅनल चे मालक प्रसिका म्हणजेच प्रसाद आणि रसिका यांचे हे चॅनल आहे.
16 RJ सोहम
चॅनलचे नाव- RJ सोहम (RJ Soham)
चॅनल प्रकार- कॉमेडी / RJ
Subscribers- 272 हजार
Rj सोहम याने रेडिओ वर काम करत असताना आता त्याने चॅनल देखील सुरू केला आहे. इथे तुम्हाला अनेक सिरीयल आणि लोकांचे मराठी रोस्ट बघायला मिळतील. त्याने वेळेला जोक करण्याचे टायमिंग मस्त साधलेले आहे. सध्या गडकिल्ल्यांची माहिती देणारे स्वराज्य हे नवीन सदर तो त्याच्या चॅनेलवर घेऊन येतो आहे.
17 नितीन बानुगडे पाटील
चॅनलचे नाव- नितीन बानुगडे पाटील (Nitin Banugade Patil)
चॅनल प्रकार- व्याख्यान
Subscribers- (दिसत नाहीत)
आता एका पक्षाचा भाग जरी असले तरी देखील नितीन बानुगडे पाटील हे एक उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यांनी केलेली शिवरयांवरील आणि इतिहासावरील व्याख्याने अनेक लोकांना आवडतात.
18 मराठी कॉर्नर
चॅनलचे नाव- मराठी कॉर्नर (Marathi Corner)
चॅनल प्रकार- माहितीपूर्ण
Subscribers- 307 हजार
शुभम पवार या मराठी मुलाचे हे चॅनल असून यावर नवीन अपडेट्स, शासन निर्णय, सरकारी योजना , ऑनलाइन फॉर्म आणि सुविधा, शिक्षण क्षेत्राविषयी अधिक माहिती मिळते.
19 आयकॉनिक मराठी
चॅनलचे नाव- आयकॉनिक मराठी (icoNik Marathi)
चॅनल प्रकार- माहितीपूर्ण
Subscribers- 248 हजार
मराठी लोक एकमेकांचे पाय खेचतो परंतु एकमेकांना साथ देऊन कशा प्रकारे पुढे जाता येईल यासाठी हे चॅनल आहे. यावर बिझनेस आयडिया, पार्ट टाईम पैसे कमावण्याचे मार्ग, मराठी शेअर मार्केट विषयी माहिती, जॉब अपडेट्स, टेक्निकल सपोर्ट इत्यादी विषयांवर माहिती मिळते.
20 खास रे टीव्ही
चॅनलचे नाव- खास रे टीव्ही (Khaas Re TV)
चॅनल प्रकार- मनोरंजन
Subscribers- 294 हजार
मराठी मनोरंजन क्षेत्रात लस घ्या लस, उसाचा रस, चहा घ्या सारखे अनेक सुप्रसिद्ध गाणे देणारा हा एक चॅनल. यार तुम्हाला कॉमेडी आणि म्युझिक विषयावर अनेक मनोरंजक व्हिडीओ बघायला मिळतील.
21 ट्रॅकिंन टेक मराठी
चॅनलचे नाव- Trakin Tech Marathi
चॅनल प्रकार- तंत्रज्ञान
Subscribers- 493 हजार
हिंदी आणि इंग्रजी भाषेत तंत्रज्ञान विश्वात प्रसिद्ध असणारे Trakin Tech हे आता मराठी मध्ये देखील लोकप्रिय होत आहेत. त्यांनी टेक्नॉलॉजी विषयावर मोबाईल रिव्ह्यू किंवा इतर माहिती देण्यासाठी हे चॅनल सुरू केलेले आहे.
22 चावडी ग्रुप
चॅनलचे नाव- चावडी ग्रुप (Chawadi Group)
चॅनल प्रकार- बिझनेस
Subscribers- 228 हजार
अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहायचे असते आणि त्यासाठी हा चॅनल तुम्हाला नक्कीच मदत करेल.
23 मी उद्योजक
चॅनलचे नाव- मी उद्योजक
चॅनल प्रकार- व्याख्यान व प्रेरणा
Subscribers- 271 हजार
शरद तांदळे हे एक उद्योजक, व्याख्याते आणि लेखक आहेत. त्यांनी प्रेरणा देण्यासाठी आणि इतरांना व्यवसायात उतरविण्यासाठी हे चॅनल सुरू केलेला आहे.
24 कॅफे मराठी
चॅनलचे नाव- कॅफे मराठी (Cafe Marathi)
चॅनल प्रकार- कॉमेडी, मुलाखती
Subscribers- 428 हजार
अनेक OTT प्लॅटफॉर्म वर देखील या कॅफे मराठीचे अधिराज्य आहे. तरुणांना वेड लावणारे प्रश्न आणि त्यांची इतरांकडून जाणून घेतलेली कॉमेडी उत्तरे या चॅनल वर आहेत. यामध्ये तुम्हाला अनेक वेगळ्या प्रश्नाची मुलाखत बघायला मिळेल.
25 आम्ही कास्तकार
चॅनलचे नाव- आम्ही कास्तकार
चॅनल प्रकार- शेती विषयक
Subscribers- 380 हजार
शेती विषयक माहिती पुरविणारा हा एक मराठी चॅनल आहे. या चॅनलवर तुम्हाला हवामान अंदाज, कृषि सल्ला, शेती साठी सरकारी योजना याविषयी माहिती मिळेल.
26 मराठी किचन
चॅनलचे नाव- मराठी किचन (Marathi Kitchen)
चॅनल प्रकार- रेसिपी
Subscribers- 864 हजार
मराठी भाषेत अनेक पाककृती तुम्हाला या चॅनेलवर बघायला मिळतील.
27 Masteer Recipes
चॅनलचे नाव- Masteer Recipes
चॅनल प्रकार- पाककृती
Subscribers- 740 हजार
आपल्या सर्वांना परिचयाचे असणारे मास्टर शेफ विष्णू मनोहर यांचा हा चॅनल आहे. यावर देखील तुम्हाला अनेक रेसिपी बघायला मिळतील.
28 जीवन संजीवनी Health
चॅनलचे नाव- जीवन संजीवनी Health
चॅनल प्रकार- आरोग्य
Subscribers- (दिसत नाही)
सतेश यांनी हे चॅनल सुरू केलेले आहे. या चॅनल वर तुम्हाला आरोग्याशी निगडित अनेक व्हिडीओ मिळतील. यात तुम्हाला आयुर्वेदिक उपचार जास्तीत जास्त प्रमाणात बघायला मिळतात.
29 गावरान फिल्म प्रोडक्शन
चॅनलचे नाव- गावरान फिल्म प्रोडक्शन (Gavran Films Production)
चॅनल प्रकार- कॉमेडी
Subscribers- 1.23 Million
चांडाळ चौकडीच्या करामती मध्ये असलेले बाळासाहेब आणि त्यांच्या टीमचे काम अनेक प्रेक्षकांना आवडले आणि आज गावरान फिल्म प्रोडक्शन आमच्या यादीत आले. मराठी अस्सल कॉमेडी व्हिडीओ तुम्हाला या चॅनेलवर बघायला मिळतील.
30 कोरी पाटी प्रोडक्शन
चॅनलचे नाव- कोरी पाटी प्रोडक्शन (Kori Pati Productions)
चॅनल प्रकार- कॉमेडी
Subscribers- 896 हजार
गावाकडच्या गोष्टी या वेब सिरीजने या चॅनलला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली. गावाकडच्या गोष्टी सिरीजचे कोरी पाटी प्रोडक्शन नवीन भाग घेऊन येत आहेत परंतु त्यांची आजोळ म्हणून एक नवीन सिरीज देखील लोकप्रिय होत आहे.
हे फक्त 30 चॅनल होते आणि याशिवाय अनेक असे युट्युब चॅनल आहेत ज्यावर subscribers भरपूर आहेत परंतु लोकप्रियतेच्या दृष्टीने ही यादी बनविली असल्याने यात त्यांचा समावेश होत नाही. अनेक असे युट्युब चॅनल लवकरच भाग 2 मध्ये तुमच्यासाठी घेऊन येऊ!
आम्ही कास्तकारला समावेशीत खुप खूप धन्यवाद!
उत्तर द्याहटवा