युट्युबर जीवन कदम बायोग्राफी - Jeevan Kadam Biography in Marathi

युट्युबर जीवन कदम बायोग्राफी - Jeevan Kadam Biography in Marathi 

जीवन कदम जीवनपट - Jeevan Kadam Biography, Earning, Wife, Early Life

मराठी युट्युब विश्वातील एक महत्त्वाचे पान म्हणजे जीवन कदम! जीवन दादांच्या गडकिल्ल्यांच्या भटकंतीविषयी आणि महाराष्ट्र भ्रमंती विषयी जाणून असालच, परंतु त्यांच्या वयक्तिक जीवनाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. Jeevan Kadam Biography in Marathi. 

युट्युबर जीवन कदम बायोग्राफी - Jeevan Kadam Biography in Marathi

जीवन
दादा कदम महत्वाची माहिती
 

नाव (Name): जीवन कदम 

जन्म दिनांक (Jeevan Kadam Birthdate) : 17 ऑक्टोबर 

जन्म ठिकाण (Birth Place): चंचळी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा 

प्राथमिक शिक्षण: न्यू इंग्लिश स्कुल, चंचली 

आवड/ छंद : भटकंती, क्रिकेट 

शिक्षण: Software Engineer 

युट्युब चॅनल: जीवन कदम व्हीलॉग्स (Jeevan Kadam Vlogs)  

काम (Job) : सॉफ्टवेअर इंजिनियर (लवकरच फुल टाईम युट्युबर) 

पत्नी (Wife Name) : प्रतिमा पाटील-कदम 

विवाह: 25 जानेवारी 2015 

मुलगा: तन्वीश 


जीवन कदम यांची सुरुवातीचे आयुष्य - Early Life of Jeevan Kadam 

जीवन दादाचे गाव म्हणजे चंचळी, तालुका कोरेगाव. प्राथमिक शिक्षण ते पदवी पर्यंत म्हणजे BCA पर्यंत सर्व शिक्षण हे चंचळी येथेच झाले. अभ्यासात काही जास्त हुशार असा जीवन दादा नव्हता. त्यावेळी गुरे चारायला जायचा. क्रिकेट खेळायला तर त्याला खूप आवडायचे 

त्यावेळी मुंबईतील मिल्स बंद पडल्या आणि वडील घरी आले. त्यांच्या आई या अंगणवाडी सेविका होत्या. घरात त्यावेळी 5 जण होते, जीवन दादा, त्यांच्या दोन बहिणी आणि आई वडील! सुरुवातीचा काळ हा बेताचा होता. घरात पैशांची तारांबळ होती. प्रत्येक दुकानदाराकडे काहीकाही उधारी होतीच. शैक्षणिक शुल्क भरायचे असेल किंवा कपडे घ्यायचे असतील तर त्यांना एक आठवडाभर का होईना परंतु कुणाच्या तरी शेतात काम करायला जावे लागायचे 

वडील फळ विकायला गावोगावी फिरत होते. जीवन दादाला तेव्हा कुटुंबाला हातभार लावावा म्हणून आर्मीत भरती व्हावे असे वाटत होते. त्यावेळी त्याची फिटनेस देखील चांगली होती आणि तो रनिंगवर भर देखील देत होता. परंतु आईला ते आवडत नव्हते म्हणून मग ते नाकारले गेले. आईने BCA साठी फोर्स केला 

कॉलेज हे दादाच्या घरापासून 13 किमी दूर, दररोज 13 किमी जायचे ते देखील सायकल वर आणि तिथे जाऊन इंग्लिशची दमछाक! दादाने एकदा मुलाखतीत सांगितले होते की त्याला बारावीला इंग्लिश ला 35 टक्के म्हणजे अगदी काठावर पास मार्क्स होते. शेवटच्या वर्षी दादाने थोडं सिरीयस घेतले, आणि कॉलेजमध्ये 5वा क्रमांक त्याने मिळवला 

BCA संपल्यावर पुण्याला येऊन दादाने कॉल सेंटरवर 2 ते 3 महिने काम देखील केले. MCA चे पुढे फॉर्म सुटले आणि वडिलांनी ते आणले देखील! दादाने फॉर्म भरून मुंबईच्या वाय एम के कॉलेज खारघर येथे नंबर लागला. कॉलेज चांगले असल्याने 95 हजार फी वर्षाची होती. बँक देखील कर्ज देत नव्हती त्यामुळे नातेवाईकांनी मदत केली. पुढे खारघरला मावशी कडे राहून शिक्षण घेतलं 


जीवन कदम कुटुंब आणि युट्युब - Family Support For YouTube

जीवन दादाच्या पत्नी म्हणजे प्रतिमा वहिनी यांनी त्यांना कायम साथ दिली. सुरुवातीच्या काळात जीवन दादा आई वडिलांना तो व्हिडीओ बनवत आहे हे जास्त सांगत नव्हता परंतु पुढे एकदा त्याने शिवनेरी किल्ल्यावर इव्हेंट ऑर्गनाईज केला होता, तेव्हा त्याची कल्पना त्याने आई बाबांना दिली होती. या इव्हेंट ला बरेच इतिहास अभ्यासक, इंस्टाग्राम पेजेस आलेले होते.  

जीवन दादा त्याच्या कार्यक्रमाच्या तयारीत होता आणि त्याला बाबांचा फोन आला की इथे कसे पोहोचायचे! त्याला त्यावेळी एक मोठं सरप्राईज मिळाले होते.  


जीवन दादाच्या युट्युबची सुरुवात- Jeevan Kadam YouTube Starting Journey 

2016 साली त्याचे मित्र हे तापोळ्याला फिरायला गेले होते. जीवन दादा तेव्हा साताऱ्याला होता. तापोळा आणि सातारा जवळ जवळ, त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला भेटायला बोलावले परंतु कुठे भेटायचे हे मात्र सांगायचे विसरून गेले! तिथे गेल्यावर त्यांच्यादेखील मोबाईल ची रेंज गेली परंतु जीवन दादाला तिथे जायचेच होते. कुठलाही संपर्क नव्हता, ना मोबाईल वरून कॉल , ना मेसेज ना व्हाट्सअप्प! जीवन दादा मित्रांना भेटायला जायला निघाला, अगोदरपासूनच त्याला कॅमेऱ्याची आवड होती त्यामुळे तो त्याच्या सोबत होताच. तिकडे कुठलीही बस भेटत नाही त्यामुळे दादा रानावणातून फिरत होता. त्याने आपोआप तो कॅमेरा व्हीलोगिंग स्टाईल मध्ये पकडला आणि तो त्याच्या मित्रांना त्याचा भेटण्यासाठीचा स्ट्रगल दाखवण्यासाठी रेकॉर्डिंग करू लागला. जीवन दादा ने तो व्हिडिओ मित्रांना दाखवला आणि पुढे जाऊन त्याने तो व्हिडिओ सहज एडिट केला. एडिट करायला जीवन दादाने movie maker हे अगदी साधे सॉफ्टवेअर वापरले होते. दादाने तो व्हिडीओ युट्युबवर अपलोड केला आणि आठवड्याभरात त्याला 600 view आले!

युट्युब चॅनल वरील विषय- 

महाराष्ट्रातील गडकिल्ले 

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे 

संस्कृती 

फक्त महाराष्ट्राच्या बाहेरील नव्हे तर भारताच्या बाहेरील पर्यटन ठिकाण 

लाइफस्टाइल 

डिजिटल विश्वातील संधी

पुढे जीवन दादा हा मुंबई ते सातारा हा प्रवास करतच होता त्यामुळे त्याचे छोटे छोटे व्हिडीओ टाकायला लागला. पुढे त्यांचा भाऊ सागर बाबर फ्रॉम खारघर, व्हिडीओ बघत असाल तर नक्की ऐकलं असेल हे नाव, त्याने दादाला विचारले की तू हे का करतोय? जीवन दादाने उत्तर दिले की मला आवडते म्हणून करतोय. परंतु त्याच्या पुढच्या प्रश्नाने जीवन दादाला विचार करायला भाग पाडले. तो प्रश्न होता, तुला आवडत तू करतो परंतु लोकांनी ते का बघायचे? त्याचा फायदा काय?  

 

सुरुवात दादाने गडकिल्ल्यांपासून केली, ती देखील सोलो गेला आणि 15 जणांचा ग्रुप बनून गेला. तिथे ट्रेकिंगची सुरुवात आणि आवड लागली. सह्याद्री भटकत असताना त्याला खूप काही शिकायला मिळत गेले.  

#गुडूप 

ऑफिसवरून आला, कोणाला काही माहीत देखील नाही, आणि बॅग भरून लगेच गायब! याला दादाने शब्द दिला गु डु प!  

युट्युब चॅनल माहिती 

नाव: जीवन कदम व्हीलॉग्स (JEEVAN KADAM VLOGS) 

सबस्क्राईबर (Subscribers) : 410K+ 

व्हिडीओ: 343 

पुरस्कार 

◆महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे जागतिक पर्यटन दिनी Professional Videography स्पर्धेचा विजेता म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार 

◆राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून सन्मान

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने