श्रीमान लेजंड बायोग्राफी, कमाई, वय || Shreeman Legend Biography Marathi

 श्रीमान लेजंड बायोग्राफी, कमाई, वय || Shreeman Legend Biography Marathi

गेमिंग विश्वामध्ये हिंदी Youtuber खूप सारे येत होते परंतु मराठी माणसाने गेमिंग मध्ये सुरुवात करून स्वतःच्या वेगळ्या अशा शैलीत हिंदी आणि मराठी भाषेचा सुवर्णमध्य साधत श्रीमान लेजंड ने अवघ्या जगाला भुरळ घातली. अशाच तुमच्या लाडक्या श्रीमान लेजंड म्हणजेच सिद्धांत प्रवीण जोशी याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

श्रीमान लेजंड बायोग्राफी, कमाई, वय || Shreeman Legend Biography Marathi

Shreeman Legend Biography

मूळ नाव- सिद्धांत प्रवीण जोशी (Siddhant Joshi)

Shreeman Legend Age (वय) – 24 वर्षे

युट्युब चैनल चे नाव(Youtube Channel Name)- श्रीमान लेजंड आणि श्रीमान लेजंड लाइव्ह

ओळख- श्रीमान लेजंड

वाढदिवस (Birthday)- 1 ऑगस्ट

धर्म- हिंदू

नागरिकत्व- भारतीय

श्रीमान लेजंडचे शहर- कर्जत, महाराष्ट्र

कुटुंबाविषयी-

वडील- प्रवीण जोशी

आई- माहित नाही

बहिण- डॉ. भक्ती उल्हास

पत्नीचे नाव- अविवाहित

 

Shreeman Legend PUBG ID, Real Name, Age, Income & Wiki Bio.

श्रीमान लेजंड याने आपल्या युट्युब करीयरची सुरुवात हि गेमिंग मधून केली होती. तो त्याच्या युट्युब channel वर गेमिंग च्या व्हिडीओ टाकत असे. आजच्या घडीला तो 2 युट्युब channel चालवत असून एकावर तो लाइव्ह streaming देखील करतो.

श्रीमान ला खरी ओळख हि त्याच्या बोलण्याच्या शैलीवरून मिळाली. लोकांना त्याची हिंदी आणि मराठी mashup आवडली. श्रीमान लेजंड म्हणजेच सिद्धांत चा जनम हा १ ऑगस्ट १९९४ रोजी झाला. श्रीमान ने त्याची सुरुवात हि PUBG Game पासून केली होती. त्या काळात सर्वात जास्त गेमिंग विषयी कोणाला माहित नव्हते. परंतु श्रीमान ने ती सुरुवात करून दिली.

त्याच्या कॉमेंटरी ची शैली हि सर्वाना मनाला भावणारी आहे. श्रीमान लेजंडचे काही प्रसिद्ध डायलॉग –

"अग माझा बागा ग..."

"पिच पिली पिली पिचच.."

श्रीमान आपल्या चाहत्यांचे मनोरंजन अगोदर करतो आणि मग गेमिंग कडे लक्ष देत असतो. त्याच्या अनेक मित्रांसोबत तो खेळत असतो त्यात प्रामुख्याने मिस्टर राणे, चेतन द टायगर, करण शिंदे , निक, नोबिता शिंदे यासारखे अनेक किंवा कधी कधी random मित्रांसोबत देखील तो खेळतो. श्रीमान लेजंड चे सर्वात जास्त चाहते हे महाराष्ट्रीयन आहेत, परंतु यावरून आपण असेही म्हणू शकत नाही कि तो फक्त मराठी माणसांमध्ये फेमस आहे तर तो संपूर्ण देशात देखील प्रसिद्ध झालेला आहे.

 श्रीमान स्वतः सांगतो की तो शाळेत न जाता सायबर कॅफे मध्ये जाऊन बसत होता. बऱ्याच दिवस शाळेत न आल्याने हेड मास्तर घरी जाऊन चौकशी करतात की तुमचा मुलगा ठीक आहे का? मग त्या सर्व गोष्टी समोर आल्या. श्रीमान चा दाखला देखील तेव्हा देण्यात आला होता. अभ्यासाच्या बाबतीत अगदी एव्हरेज होता श्रीमान! पेपर च्या अगोदर तो रात्री अभ्यास करायचा आणि पास व्हायचा. इयत्ता नववी मध्ये त्याने एक मॅटर केला होता अस त्याने त्याच्या एका स्ट्रीम मध्ये सांगितले आहे आणि त्यामुळे त्याला 9 वि मध्ये असताना फेल देखील केले गेले. 

10 वीची परीक्षा तर त्याच्या मित्राने आणि त्याने 17 नंबर फॉर्म भरून दिली. कॉलेजची लाईफ देखील त्याची अशीच गेली. करण शिंदे जो आजही त्यांच्या सोबत खेळतो तो त्यांचा 5 वि पासूनचा मित्र आहे. त्याचेच इंटरनेट कनेक्शन सध्या श्रीमान वापरतो. म्हणजे करण स्वतः इंटरनेट कनेक्शन सर्व्हिस प्रोव्हाईडर आहे.

करण स्वतः सांगतो की तुम्हाला श्रीमान जसा स्ट्रीम वर दिसतो तसाच आहे, फक्त तो समोर असताना कधी शिवी देत नाही परंतु जी शिवी देतो ना ती इतकी मोडीफाय करून देतो की समोरचा गार पडतो. 

राणे हा PUBG चालू असताना भेटला आणि तो Pubg सोबत खूप जोडला गेला. अनुप हे सध्या अमेरिकेत असतात. त्यांना श्रीमान भाऊ म्हणतो. अनुप यांनी श्रीमान ला त्या वेळी मॉनिटर आणि UPS घेऊन दिला होता. दुसरे युट्युब पेमेंट आल्यानंतर त्याने अनुप ला हे सर्व पैसे दिले होते. अभिजित देखील श्रीमान च्या सुरुवातीच्या काळातील सोबती होता. अभिजित सुरुवातीला श्रीमान सोबत PUBG खेळत होता. 

Youtube Channel

श्रीमान लेजंड (Shreeman Legend)

Subscribers- 309k

श्रीमान लेजंड लाइव्ह (Shreeman Legend Live)

Subscribers- 1.33M

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने