Windows 11 तुमच्या PC मध्ये चालणार का? कसे चेक कराल?

Windows 11 तुमच्या PC मध्ये चालणार का? कसे चेक कराल? ।। TMP, System Requirements for Windows 10

मित्रांनो सध्या सगळीकडे Windows 11 ची जोरदार चर्चा सुरू आहे. Windows 11 लाँच होण्याआधी त्याची ISO file लिक झाली आणि भरपूर लोकांनी ती windows 11 कशी आहे हे वापरून बघितले. तुम्ही युट्युबसारख्या प्लॅटफॉर्म वर भरपूर साऱ्या व्हिडीओ बघितल्या असतील ज्यात windows 11 तुम्हाला बघायला मिळेल.

windows 11 vector intro

Windows 11 चा इंटरफेस हा बराच बदललेला असून यात आता तुम्हाला apps देखील वापरता येणार आहेत. Windows 11 हा windows 10 पेक्षा वेगळा असून त्याची जी System Requirements आहेत त्या देखील वेगळ्या आहेत. तुम्ही घर बसल्या तुमच्या windows लॅपटॉप किंवा pc मध्ये PC health नावाच्या मायक्रोसॉफ्ट कडून आलेल्या app च्या माध्यमातून चेक करू शकता की Windows 11 तुमच्या PC मध्ये चालेल की नाही?

आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही तुमचे system configuration बघू शकता आणि तुमच्या PC मध्ये Windows 11 कसे चालू शकते? TPM म्हणजे काय आणि त्याचे व्हर्जन कसे बघायचे हे देखील जाणून घेणार आहोत.


Windows 11 साठी Minimum System Requirements

Processor: 1GHz or Faster than 1 or more cores | System Type- OS 64 Bits

(हे बघण्यासाठी MY PC वर जाऊन Propertise ऑपशन मध्ये तुम्हाला हे configuration दिसतील)

Ram - 4GB

STorage - 64GB

System Firmware - UEFI, Secure Boot Capable

सर्वात महत्वाचे म्हणजे TPM - (Trusted Platform Module) Version 2.0

(Windows+R दाबून run command मध्ये tpm. msc टाकून ok केल्यावर आपल्याला ते version समजेल

इथे काही दिसले नाही तर मग तुम्हाला BIOS सेटिंग मध्ये जाऊन ते ON करावे लागेल, याच्या व्हिडीओ ची लिंक खाली देत आहे

https://youtu.be/2OMgHKXhH2w)

Graphics Card- DirectX 12 Compatible

Display - HD Resolution


Health App च्या माध्यमातून कसे चेक कराल?

खाली दिलेल्या लिंक वरून Health Checkup साठी App डाउनलोड करून घ्या.

Download Health Checkup App

Install झाल्यानंतर open करा. वरच्या बाजूला तुमच्या system च्या नावाजवळ check now हे ऑपशन बघायला मिळेल. त्यावर Click करा.

तुम्हाला Windows 11 चालेल की नाही याच्याविषयी माहिती मिळून जाईल.

This PC cant Run Windows 11 Error

अशी error जर तुम्हाला येत असेल तर windows 10 साठी आलेल्या जुन्या अपडेट करून घ्या. Update setting मध्ये जाऊन ते करून घ्या.

याशिवाय दुसरा error हा TPM मुळे येत असतो. त्यासाठी bios सेटिंग मध्ये TPM ON करून घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने