अहमदनगर जिल्ह्यातील धरणे | Dams in Ahmednagar District
अहमदनगर जिल्ह्यात अनेक धरणे आहेत परंतु त्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत. त्यामुळे यातील महत्वाची काही धरणे आणि इतर धरणाची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात.
अहमदनगर जिल्ह्यातील धरणांची माहिती - Information about Dams in Ahmednagar District Marathi
1.भंडारदरा धरण
भंडारदरा धरणाला विल्सन डॅम असे देखील म्हणतात. प्रवरा नदीवर 1926 पर्यंत हे धरण बांधण्यात आले. अकोले या तालुक्याच्या ठिकाणापासून हे धरण 36 किलोमीटर अंतरावर आहे. अहमदनगर शहरापासून हे धरण 150 किलोमीटर अंतरावर आहे. प्रवरा नदीवर ब्रिटिश काळात या धरणाचे बांधकाम झाले. पर्यटनाच्या दृष्टीने हे धरण खूप प्रसिद्ध आहे.
2.मुळा धरण
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या बारागाव नांदूर गावाजवळ हे धरण आहे. मुळा धरण मुळा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. 1974 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. राहुरी पासून 10 किलोमीटर तर अहमदनगर शहरापासून 38 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.
3.घाटघर धरण
घाटघर या एका धरण प्रकल्पात दोन धरणे आहेत. त्यातील एक म्हणजे अप्पर घाटघर आणि दुसरे म्हणजे लोवर घाटघर(चोंडा धरण) ! अकोले तालुक्यातील घाटघर गावाजवळ हे धरण आहे. अकोले शहरापासून हे धरण 60 किलोमीटर अंतरावर आहे. अहमदनगर शहरापासून हे धरण 178 किलोमीटर वर आहे. अप्पर घाटघर धरणाचे बांधकाम हे प्रवरा नदीवर आहे. 2005 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
4.विसापूर धरण
श्रीगोंदा तालुक्यतील विसापूर गावाजवळ हे धरण आहे. श्रीगोंदा शहरापासून हे धरण 28 किलोमीटर अंतरावर आहे. अहमदनगर शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. हंगा या नदीवर हे धरण बांधलेले असून हे ब्रिटीश कालीन धरण आहे. 1896 ते 1927 या काळात इंग्रजांनी हे धरण बांधले.
5.निळवंडे धरण
अकोले तालुक्यातील निळवंडे गावाजवळ हे धरण आहे. अकोले शहरापासून हे धरण 15 किलोमीटर अंतरावर आहे. अहमदनगर शहरापासून हे धरण 130 किलोमीटर अंतरावर आहे. प्रवरा नदीवर 2011 साली हे धरण बांधून पूर्ण झाले.
6.सांगावी धरण
7.पदोशी धरण
8.आढळा धरण
9.ढोकी धरण
10.घोड धरण
11.हांगा धरण
12.खैरी धरण
13.मांडोहोळ धरण
14.पळशी धरण
15.रुई छत्रपती धरण
16.सीना धरण
यातील काही तलाव आणि बंधारे देखील आहेत. त्यामुळे संभ्रमित होऊन जाऊ नये.