मुळा धरण अहमदनगर ।। Mula Dam Ahmednagar in Marathi

मुळा धरण अहमदनगर ।। Mula Dam Ahmednagar in Marathi

धरणाचे नाव- मुळा धरण / ज्ञानेश्वर सागर (Mula Dam)

नदीचे नाव- मुळा

ठिकाण- बारागाव नांदूर, राहुरी, अहमदनगर

धरणाची क्षमता - 26 टीएमसी

कालव्यांची नावे- डावा कालवा, उजवा कालवा

Mula-dam-marathi-mahiti

आज आपण महाराष्ट्र राज्यातील, अहमदनगर जिल्ह्यामधील बारागाव नांदूर येथे असलेल्या मुळा धरणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मुळा धरणाला मुळा डॅम किंवा ज्ञानेश्वर सागर या नावाने देखील ओळखले जाते. 

मुळा धरण मराठी माहिती - Mula dharan information in Marathi

मुळा धरणाची निर्मिती ही मुळा नदीवर 1972 ते 1974 च्या दरम्यान झाली. मुळा धरण हे राहुरी या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर आहे. अहमदनगर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 38 किलोमीटर अंतरावर मुळा धरण आहे. मुळा नदीचे उगमस्थान हे हरिश्चंद्रगडावर आहे. 

मुळा धरणाची उंची ही 48.17 मीटर म्हणजेच 158 फूट इतकी आहे. धरणाला एकूण 11 दरवाजे आहेत. धरणाची लांबी हे 2856 मीटर म्हणजेच 9370 फूट इतकी आहे. मुळा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 26 टीएमसी म्हणजेच 26 हजार दशलक्ष घनफुट इतकी आहे. 

मुळा धरणातून दोन कालवे जातात: डावा कालवा आणि उजवा कालवा. या कालव्यांमुळे नगर जिल्ह्यातील बराचसा भाग हा बागायत झालेला आहे. यामध्ये राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांना सिंचनाची व्यवस्था आहे.

मुळा धरणाच्या पाण्याचा उपयोग हा पाणलोट क्षेत्रात शेतीसाठी होतो. नगर शहराला आणि आजूबाजूच्या शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुळा धरणाच्या पाण्याचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे मुळा धरणाच्या शेजारी आहे. मुळा धरण परिसरात पर्यटक हे भटकंती साठी येत असतात. 

मुळा धरण आणि सागरी विमान सेवा (Sea Air Flight Service on Mula Dam)

मलेशिया येथील नेव्हएयर ही कंपनी लवकरच मेरिटाईन एनर्जी सेल एयर सर्व्हिस सुरू करणार आहे. यासाठी त्या कंपनीने आपल्या जलसंपदा विभागाशी करार केलेला आहे. या करारानुसार ते मुळा धरण क्षेत्रात एक तरंगता प्लॅटफॉर्म तयार करणार असून त्याचा वापर हा छोट्या फ्लाईट्स लँड आणि टेकऑफ साठी करतील.

मुळा धरणाला कसे पोहोचाल? How to reach Mula Dam?

मुळा धरणाला पोहोचण्यासाठी नगर कडून आला तर तुम्हाला नगर मनमाड महामार्गावर असलेल्या फुले हॉटेल च्या पुढे गेल्यावर एचपी पेट्रोल पंप लागला की लगेच डाव्या हाताला जाणाऱ्या मार्गाने मुळा धरणाकडे जाणारा रस्ता आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून आला तर तुम्ही मुळा धरणाच्या कालव्याच्या बाजूने असलेल्या रस्त्याने धरणापर्यंत जाऊ शकता परंतु तो मार्ग कच्चा असल्याने तुम्ही आणखी पुढे जाऊन फुले हॉटेल च्या अलीकडे असलेल्या उजव्या हाताच्या रस्त्याने मुळा धरणाकडे जाऊ शकता. 

हे देखील वाचा-

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने