सैखोम मीराबाई चानू बायोग्राफी ।। Saikhom Mirabai Chanu Biography In Marathi

सैखोम मीराबाई चानू बायोग्राफी ।। Saikhom Mirabai Chanu Biography In Marathi

2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलंपिक मध्ये जरी अपयश आले असले तरी पुन्हा एकदा जिद्दीने लढत 2021 ऑलंपिक मध्ये मीराबाई चानू यांनी भारताला पहिले पदक मिळवून देत भारताची खाते उघडले आहे. आज याच मीराबाई चानू यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांचा कठीण प्रवास आज आपल्यासमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न!

Mirabai Chanu Information in Marathi

Mirabai-chanu-information-marathi

संपूर्ण नाव -
मीराबाई चानू

जन्म तारीख - 8 ऑगस्ट 1994

जन्म स्थळ- इंफाल जिल्हा, मणिपूर

पुरस्कार- 2018 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2018 मध्येच पद्मश्री पुरस्कार

पदक- टोकियो 2020 ऑलम्पिक मध्ये सिल्व्हर मेडल


मीराबाई चानू यांचे सुरुवातीचे जीवन -Early Life of Mirabai Chanu 

मीराबाई चानू यांचा जन्म हा 8 ऑगस्ट 1994 रोजी इंफाल, मणिपूर इथे झाला होता. मणिपूर मधील नोंगपोक काकचिंग या छोट्याश्या गावात त्यांचा जन्म झाला. मणिपूर च्या मातीत अशी काहीतरी गोष्ट नक्कीच आहे ज्यामुळे तिथे प्रत्येक खेळाला महत्व तर आहेच परंतु प्रत्येक घरात एक तरी खेळाडू देखील आहे. मणिपूर मध्ये सर्व सुविधा आहेत परंतु मीराबाई यांचे गाव हे मणिपूर पासून 22 किलोमीटर दूर आहे. मणिपूर मध्ये खेळाला जरी महत्व असले तरी देखील गुन्हेगारी मध्ये देखील मणिपूर आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास हा काही सोपा नव्हता. त्यांनी अशा सर्व अडचणींचा सामना करत ट्रेनिंगला सुरुवात केली.

2007 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी वेटलिफ्टिंग सुरुवात केली. त्यांच्या आदर्श या भारतातील पहिल्या वेटलिफ्टर कुंजराणी देवी या आहेत. त्यांची एक डॉक्युमेंटरी बघूनच मीराबाई यांना प्रेरणा मिळाली. 

मीराबाई चानू यांना सुरुवातीचे प्रशिक्षण हे त्यांच्या घरातूनच मिळण्यास सुरुवात झाली होती. घरात जेव्हा कधी जेवण बनवायचे असे तेव्हा मीराबाई त्यासाठी लाकडं आणायला जात असत. त्यांना घरकामात चांगली रुची होती. लाकूड आणण्यासाठी मीराबाई एका वेळी अनेक लाकडांची मोळी घेऊन येत असत. सुरुवात काय असते ना तर ते हेच! असंख्य लाकडांची वजनदार मोळी त्या सहज त्या डोंगरांमधून घेऊन येत असत. यावर गावकरी त्यांना विचारत असत की तुला हे कस जमतंय? कारण इतक्या जास्त वजनाची लाकडे इतरांना त्या वयात उचलणे देखील शक्य नव्हते. त्यांचे शालेय शिक्षण हे मणिपूर मध्येच झाले. 

ट्रेनिंग साठी त्यांना दिवसातून तीन वेळा जावे लागणार होते.   घरच्यांची सोबत होती त्यामुळे त्या ट्रेनिंग सेन्टर ते घर हे अंतर म्हणजे 22 किलोमीटर इतके अंतर दररोज जात असत. पुढे जाऊन त्यांनी दिल्ली इथे येऊन चांगल्या सुविधांमध्ये ट्रेनिंग घेतली. तिथे त्यांना कोच चांगले मिळाले, त्यांनी मीराबाई मधील टॅलेंट ओळखले आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन देखील दिले.


मीराबाई चानू स्पर्धा आणि पदक - Mirabai Chanu Games and Medals

मीराबाई यांनी 2011 मध्ये साऊथ एशियन ज्युनियर गेम्स आणि इंटरनॅशनल ज्युनियर चॅम्पियनशीप मध्ये त्यांनी गोल्ड मेडल देखील जिंकले होते. अवघ्या 23 वर्षांच्या असताना मीराबाई यांनी 2014 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सिल्व्हर मेडल जिंकले. यात त्या 48 किलो कॅटेगरी मध्ये खेळत होत्या. रिओ ऑलम्पिक मध्ये त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले गेले. त्या ऑलम्पिक मध्ये त्यांना अपयश आले. परंतु यानंतर त्यांचे कोच आणि त्यांनी अशी ट्रेनिंग सुरू केली की त्या स्वतःच्या बहिणीच्या लग्नाला देखील गेल्या नव्हत्या. मीराबाई यांच्या कडून सर्वांना अपेक्षा होत्या त्यामुळे कोच देखील त्यांना योग्य ती ट्रेनिंग देण्यासाठी जीव ओतत होते. 

वेटलिफ्टिंग मध्ये स्नॅच व क्लिन अँड जर्क हे दोन विभाग येतात. स्नॅच मध्ये हात न वळवता तो गळ्याकडे न नेता सरळ वर उचलायचा असतो. क्लीन आणि जर्क मध्ये तो रॉड उचलून तो खांद्याजवळ आणून वर करतात. 

त्यांना रिओ ऑलम्पिक मध्ये यश मिळाले नाही परंतु पुढे जाऊन कॉमनवेल्थ गेम मध्ये मेडल जिंकले आणि त्यासोबत एशियन चॅम्पियनशीप आणि वर्ल्ड चॅम्पियनशीप मध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकले.

2016 मध्ये झालेल्या साऊथ एशियन गेम्स मध्ये मीराबाई यांनी यश मिळविले. 2017 मध्ये वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप जिथे भारताने 22 वर्षात एकदाही मेडल जिंकले नव्हते  त्यामध्ये 48 किलो वजन गटात त्यांनी 85 किलो स्नॅच आणि 109 किलो क्लीन अँड जर्क मध्ये म्हणजे 194 किलो उचलत यश मिळवत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. 

हे यश प्राप्त झाल्यानंतर मणिपूर चे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी मीराबाई यांना 20 लाखांचा धनादेश देत या माणिपूरच्या हिऱ्याला सन्मानित केले. 2018 मध्ये मीराबाई चानू यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. 

पुन्हा एकदा 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स मध्ये एकूण 196 किलो वजन उचलत (86 किलो स्नॅच आणि 110 किलो क्लीन अँड जर्क मध्ये) पुन्हा गोल्ड मेडल मिळविले. 2019 मध्ये त्यांनी वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप मध्ये ब्रॉंझ मेडल मिळविले. यात त्यांनी एक स्वतःचा नवीन रेकॉर्ड बनवत 199 किलो वजन उचलले. 

मीराबाई चानू एकदा मुलाखतीत सांगतात की त्यांचा आवडता अभिनेता हा सलमान खान असून त्यांना जेव्हा कधी तणाव येतो तेव्हा त्या एखाद्या खोलीत स्वतःला बंद करून भरपूर नाचतात. 

टोकियो 2020 ऑलम्पिक मध्ये 49 किलो महिला वेटलिफ्टिंग मध्ये चानू यांना सिल्व्हर मेडल प्राप्त झाले आहे. या प्रकारात चायना च्या जिहुई यांनी गोल्ड वर नाव कोरले आहे. इंडोनेशियाच्या विंडी कंटीका यांना ब्रॉंझ मेडल मिळविले आहे. 

चानू यांनी स्नॅच इव्हेंट मध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्क मध्ये 115 किलो वजन उचलले. म्हणजे एकूण 202 किलो वजन मीराबाई चानू यांनी उचलून त्यांचे जुने रेकॉर्डस् देखील मोडले. भारताकडून सर्वात जास्त वजन उचलण्याचा रेकॉर्ड देखील तुम्हाला आता मीराबाई चानू यांच्या नावावर दिसेल. 

मीराबाई चानू या भारताच्या लेकीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने