भंडारदरा धरण माहिती || Bhandardara Dam Information in Marathi

भंडारदरा धरण माहिती || Bhandardara Dam Information in Marathi


धरणाचे नाव - भंडारदरा धरण / ऑर्थर लेक / विल्सन डॅम (Bhandardara Dam / Arthur Lake / Wilson Dam)

नदीचे नाव - प्रवरा नदी

ठिकाण - शेंडी, अकोले

धरणाची क्षमता - 11 टीएमसी

भंडारदरा धरण माहिती || Bhandardara Dam Information in Marathi

नगर जिल्ह्यातील अकोले हा तालुका म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने स्वर्गच! याच अकोले तालुक्यात नयनरम्य परिसरात प्रवरा नदीवर बांधलेले भंडारदरा धरण हे पर्यटकांचे लक्ष नेहमीच वेधून घेत असते. आज याच भंडारदरा धरणाविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. Bhandardara Dharan Mahiti Marathi

पर्यटकांच्या मनात अनेक प्रश्न सतत येत असतात त्यातील महत्वाचे प्रश्न म्हणजे भंडारदरा हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध का आहे? (Why is Bhandardara Famous for Tourism?) याशिवाय लोक हा देखील प्रश्न विचारतात की खरच भंडारदरा हा भाग पर्यटनासाठी योग्य आहे का? (Is Visiting Bhandardara Worth it for tourism?) या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायला मी वाट बघायला किंवा पूर्ण लेख वाचायला लावणार नाहीये कारण हा भाग खरच पर्यटनाच्या दृष्टीने खूप प्रसिद्ध असून परिवारासोबत फिरायला यायचं असेल तर नगर जिल्ह्यातील हे एक उत्तम ठिकाण आहे. 

भंडारदरा धरणाचा इतिहास (History Of Bhandardara Dam)

1903 मध्ये इंग्रज अभियंता आर्थर हिल याला भंडारदरा धरणासाठी शेंडी या गावात एक जागा सापडली. म्हणून भंडारदरा धरणाच्या जागेचा शोध हा आर्थर हिल ने लावला असे सांगितले जाते. या धरणाच्या बांधकामाला ब्रिटिश सरकारकडून 9 ऑगस्ट 1907 रोजी परवानगी मिळाली. भंडारदरा धरणाचे बांधकाम हे ब्रिटिश अभियंता आर्थर हिल यांच्याच नेतृत्वाखाली एप्रिल 1910 मध्ये सुरू झाले. धरणाच्या बांधकामाला अनेक वर्षे कालावधी लागला अखेर 19 डिसेंबर 1926 रोजी भंडारदरा धरणाचे बांधकाम पूर्ण होऊन तत्कालीन गव्हर्नर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे लोकार्पण झाले.

विल्सन यांच्या हस्ते उदघाटन झाल्याने धरणाला विल्सन डॅम असे नाव देण्यात आले तर त्या जागेचा म्हणजे त्या पाणीसाठ्याचा शोध हा आर्थर हिल यांनी लावला असल्याने भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्याला आर्थर लेक / अर्थुर जलाशय म्हणून संबोधले जाते. 

भंडारदरा धरणाचे बांधकाम (Architecture of Bhandardara Dam)

भंडारदरा हा तसा आदिवासी भाग! आदिवासी भागाला आणि खाली संपूर्ण नगर जिल्ह्याला भंडारदरा धरण हे एक वरदानच आहे. त्या काळात भंडारदरा धरणाच्या भिंती बांधण्यासाठी फक्त दगड आणि चुन्याचा वापर करण्यात आला होता. वाळू उपलब्ध नसल्याने दगडाचा चुरा या धरणाच्या बांधकामात वापरला गेला आहे. 1920 मध्ये जेव्हा धरणाचे बांधकाम पुढे जात राहिले तेव्हा नोव्हेंबर महिन्यात धरणात 200 फूट उंचीपर्यंत पाणी साठविण्यात आले होते. त्यानंतर प्रवरा नदी पात्रता पहिल्यांदा धरणातून पाणी सोडण्यात आल्याचा उल्लेख देखील आढळतो. 

भंडारदरा धरणाची उंची ही 20 फुटांनी चालू बांधकामात वाढविण्यात आली होती. धरणाची अगोदर उंची ही 250 फुट ठेवायची होती परंतु नंतर ती 270 फूट करण्यात आली. सध्या धरणाची तळाशी रुंदी ही 82.3 मीटर इतकी असून उंची ही 507 मीटर इतकी आहे. धरणाची माथ्यावर रुंदी ही 7 मीटर आहे. धरणाला एकूण 4 दरवाजे असून यासाठी लागणारे सर्व सामान त्या काळात इंग्लंडहून मागवून आणण्यात आले होते. भंडारदरा धरणाची लांबी ही 2717 मीटर म्हणजेच 8914 फूट इतकी आहे. 

भंडारदरा धरणाची क्षमता ही 11 टीएमसी म्हणजेच 11 हजार दशलक्ष घनफुट आहे. (What is Capacity of Bhandardara Dam?)


भंडारदरा धरणाला एकूण 4 दरवाजे असून त्यांचा आकार हा इंग्रजी अक्षर S सारखा आहे.

भंडारदरा धरण वीजनिर्मिती प्रकल्प 

भंडारदरा धरणाच्या पाण्यापासून 10 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प देखील आहे. 

भंडारदरा धरण परिसरातील पर्यटन स्थळे- अंब्रेला फॉल, रंधा फॉल (Umbrella Fall / Randha Fall)

भंडारदरा धरणाच्या व्हॉल्व्ह मधून जवळपास 200 फुटवरून एका खडकावर पाणी सोडले जाते. त्या खडकावरून ते पाणी खळाळत वाहते त्यामुळे तिथे एक छत्रीसारखा आकार तयार होतो आणि त्यामुळे त्याला अंब्रेला फॉल (Umbrella Fall) म्हणून ओळखले जाते. शेजारीच थोड्या अंतरावर असलेल्या स्पिल वे मधून ज्यावेळी अतिरिक्त पाणी हे सोडले जाते तेव्हा ते खळाळत पुढे वाहत जाते. हे पाणी आपल्याला पुढे जाऊन रंधा फॉल चा आनंद देते. 

धरणाच्या पाणीसाठ्यात आपल्याला नौकानयन देखील वर्षभर करता येते. भिंतीच्या शेजारीच एक बाग बांधलेली आहे, तिथे फिरत अंगावर पाण्याचे शिंतोडे घेत आपला वेळ कसा निघून जातो हे आपल्याला कळणारच नाही. 

धरण परिसरात आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर म्हणजेच कळसुबाई शिखर देखील बघायला मिळेल. रतनवाडी येथे असणारे अमृतेश्वराचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर देखील आहे. 

भंडारदरा धरणाला कसे जाल? (How to reach Bhandardara Dam)

अकोले या तालुक्याच्या ठिकाणापासून भंडारदरा धरण हे 36 किलोमीटर अंतरावर आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या ठिकाणापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. 

हे देखील वाचा-

मुळा धरण माहिती

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने