डिजिटल मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे | How to earn money by Digital Marketing Business in Marathi

डिजिटल मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे | How to earn money by Digital Marketing Business in Marathi

डिजिटल मार्केटिंग द्वारे किती आणि कसे पैसे कमावता येतात? (How to and How much Earn Money By  Top 2021 Digital Marketing Business in Marathi)

Digital-marketing-earn-money-marathi

आज वेळेनुरूप पैसे कमावण्याच्या पद्धतीत देखील बदल होत चालले आहेत. पहिल्या काळात तुम्हाला पैसे कमावण्यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत नोकरी करावी लागत असे परंतु आता वेळ बदलली आहे. आतासध्या अनेक असे मार्ग आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतः घर बसल्या पैसे कमावू शकता. सध्याच्या काळात डिजिटल मार्केटिंग हे असे क्षेत्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमावू शकता. घरी बसून पैसे मिळणार आहेत तर मग याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला काही काम करायचे नाहीये, सुरुवातीच्या काळात तुम्हाला खूप वेळ देऊन लॅपटॉप समोर बसून हे काम सुरू करावे लागेल. 

डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून पैसे कामावताना तुम्हाला ही गोष्ट आधी जाणून घ्यायला हवी की हे डिजिटल मार्केटिंग नक्की काय आहे? 


डिजिटल मार्केटिंग काय आहे? (What is Digital Marketing?)

डिजिटल मार्केटिंग ची सर्वात सोपी व्याख्या अशी आहे की ते सर्व उपाय आणि पर्याय ज्यांचा वापर तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वापरून मार्केटिंग साठी करतात. या मार्केटिंग यामध्ये वेगवेगळे व्यावसायिक पर्याय जसे की सर्च इंजिन, सोशल मीडिया, ईमेल आणि वेबसाईट यांचा वापर हा ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी केला जातो. 

अगोदरच्या काळात मार्केटिंग ची व्याख्या ही काहीशी वेगळी होती. त्या काळात तुम्हाला त्या ग्राहकांना असे टार्गेट करावे लागत होते जेव्हा ते योग्य वेळी आणि योग्य संधीला त्या प्रोडक्ट्स ला खरेदी करू शकतील. आता देखील काही अशाच प्रकारे आहे परंतु आता ग्राहकांना भेटून टार्गेट करण्याऐवजी तुम्हाला ते ग्राहक सध्या जिथे आहेत तिथे टार्गेट करायचे आहे, म्हणजेच तुम्हाला ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर ग्राहकांना आता टार्गेट करून मार्केटिंग करायची आहे. 

डिजिटल मार्केटिंग मधून पैसे कसे कमावता येतात? (How to earn money by top type of Digital Marketing Online Business)

डिजिटल मार्केटिंग ची तोंडओळख झाल्यानंतर आता आपल्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की डिजिटल मार्केटिंगद्वारे पैसे कसे कमवतात? त्यासाठी इथे आम्ही डिजिटल मार्केटिंग च्या काही पद्धती समोर आणतो आहे ज्यांचा वापर करून तुम्हाला एक कल्पना येईल आणि तुम्ही तुमचा व्यवसाय सहज सुरू करू शकता.


ऑनलाइन ई-बुक्स लिहिणे आणि विकणे (Write and Sell Ebooks Online)

जर तुमच्यामध्ये लिहिण्याची कला असेल आणि तुम्ही एखादे पुस्तक लिहू शकत असाल तर ई-बुक हे तुमच्यासाठी खूप मोठे माध्यम आहे.  इथे तुम्ही तुमच्या शैलीचे प्रदर्शन देखील करू शकता अंक त्या पुस्तकाच्या विक्रीतून पैसे देखील कमावू शकता. इथे तुम्हाला सुरुवातीला ग्राहक मिळणे कठीण असते परंतु एकदा लोकांच्या नजरेत तुमचे लेखन आले की मग तुम्हाला यातून खूप सारे पैसे नक्कीच मिळतील. सध्याच्या काळात असे पुस्तक जे लोकांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देतात ते लोकांना खूप आवडतात. त्यामुळे अशा विषयावर जर तुम्ही लिहाल तर तुम्हाला यशाच्या खूप संधी उपलब्ध होतील.


स्वतःचे ऍप बनवून पैसे कमवा (Create an app and make money by internet marketing)

जर तुमच्याकडे app developement विषयी माहिती असेल तर तुम्ही याच्या माध्यमातून सहज पैसे कमावू शकता. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर योग्य प्रकारे केला तर तुम्ही सहज पैसे कमावू शकता. तुम्ही एक उपयुक्त असे चांगले app बनवून अनेक मोबाईल वापरकर्त्यांना तुमच्याकडे आकर्षित करू शकता. तुम्हाला एक चांगले app बनवण्यासाठी पैसे आणि वेळेची गरज असते. जर तुमच्याकडे app development विषयी ज्ञान नसेल परंतु तुमच्याकडे आयडिया असेल तर तुम्ही एखाद्या app developer कडून स्वतःसाठी app बनवून घेऊ शकता. 


युट्युबवर व्हिडीओ ट्युटोरीअल बनवून इतर सोशल मीडिया माध्यमांचा देखील फायदा करून घ्या (Create Video Tutorials on YouTube and use other social media platforms)

जे लोक सोशल मीडियाचा वापर करून सहज पैसे कमावू इच्छिता त्यांच्यासाठी हा एक सोप्पा मार्ग आहे. त्यासोबत इंटरनेट मार्केटिंग वापरून पैसे कमावण्याचा एक सर्वात मोठा मार्ग आहे. तुम्ही याच्या माध्यमातून एका रात्रीत करोडपती बनणार नाहीत परंतु वेळेनुसार आणि तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला योग्य वेळेत यश हे नक्कीच मिळणार आहे. तुम्ही आकर्षक अशा व्हिडीओ बनवत राहिला तर एक दिवस तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे.


ब्लॉग बनवून (Blogging)

इंटरनेट मार्केटिंग मध्ये सर्वात जास्त पैसे कशात असतील तर ते ब्लॉगिंग मध्ये आहेत. तुम्ही जर एखादा यशस्वी ब्लॉग बनवण्यात जर यशस्वी झालात तर मग तुम्हाला महिन्याला बाहेर कंपनीमध्ये किंवा इतर ठिकाणी जितका पैसा मिळतो त्याहून अधिक पैसे मिळायला सुरुवात होईल. परंतु यासाठी सुरुवातीच्या काळात मेहनत आणि वाट बघणे गरजेचे आहे. सुरुवातीला तुम्हाला कोणत्या विषयावर ब्लॉग सुरू करायचा आहे त्याचा विषय निवडावा लागेल. सुरुवातीला काही काळ तुम्हाला वाचक मिळवायला खूप वेळ लागेल परंतु एकदा वाचकांना तुमचा ब्लॉग आवडायला लागला की तुम्हाला चांगल्या प्रकारे पैसे मिळायला सुरुवात ही होऊन जाते.


स्वतः काढलेले फोटो विकून (By Selling your Photographs on Internet)

जर तुम्हाला फोटोग्राफी मध्ये आवड असेल आणि तुमच्याकडे चांगल्या आणि आकर्षक फोटोग्राफ्स असतील तर तुमच्यासाठी इंटरनेट मार्केटिंग मध्ये एक चांगला स्कोप आहे. तुम्ही तुमची फोटोग्राफी इंटरनेटवर विक्री करून देखील पैसे कमवू शकतात. इंटरनेटवर अनेक अशा वेबसाईट्स आहेत जे तुमचे फोटो खरेदी करून त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला मोबदला म्हणुन काही रक्कम देखील देतात. यासाठी तुम्हाला तुमच्या कार्य पेक्षा जास्त काही वेगळे करण्याची गरज नाही परंतु तुम्ही जे काही फोटोग्राफ्स क्लिक करणार आहात ते वेगळे आणि आकर्षक असायला हवेत. तुम्हाला आता बरोबर ऐकून असे वाटत असेल की यातून पैसे कमावणे खूप सोपे आहे, परंतु जेव्हा तुम्ही या फिल्डमध्ये याल त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांविषय देखील माहिती मिळेल. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायला जमले तर फोटो आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांमध्ये तुम्ही खूप काही करू शकता.


एसईओ (सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन) [Search Engine Optimization (SEO)]

ऐकायला हे तुम्हाला थोडे अवघड वाटेल परंतु तुम्ही जेव्हा हे कन्सेप्ट समजून घ्याल त्यानंतर तुम्हाला यातून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग मिळू शकतात. SEO म्हणजे एखाद्या शब्दाचा किंवा कीवर्ड च्या माध्यमातून आपल्या वेबसाईट वरील कंटेंट हे सर्च इंजिनमध्ये रँक करणे होय. याच्या माध्यमातून आपल्या वेबसाइट ची विसिबिलिटी हीस सर्च इंजिन मध्ये जास्त वाढते. सर्च इंजिनने एखादा किवर्ड किंवा फ्रेज यांच्या माध्यमातून आपल्याला रिझल्ट देत असते. ज्या वेबसाईटवर त्या कीवर्ड्स शी आधारित जास्तीत जास्त माहिती असते ती वेबसाइट सर्च इंजिन आपल्याला वर दाखवते. SEO Expert ही अशी पोस्ट आहे ज्यामध्ये तो व्यक्ती कीवर्ड्स च्या माध्यमातून त्याच्या वेबसाईट्स या रँक करत असतो. यामध्ये तुम्ही कन्टेन्ट लिहून किंवा वेबसाईटसाठी बॅकलींक बनवून देखील पैसे कमावू शकता. तुम्ही लिहिलेले कन्टेन्ट हे कितपत लोकांना आकर्षित करते आहे यावर देखील SEO अवलंबून असतो. यामध्ये ब्लॉग रायटिंग, इन्फोग्राफिक्स, व्हिडीओ, स्लाईड शो, लिस्ट मेकिंग, इत्यादी अनेक गोष्टी समाविष्ठ असतात. 


वेबसाईट डिझायनिंग (Web Designing)

या क्षेत्रांमध्ये तुम्हाला आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी काही तांत्रिक शिक्षणाची गरज असते. तुम्ही एखादी वेबसाइट बनवून तिला मेंटेन करू शकत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. वेबसाईट डिझायनिंगमध्ये प्लॅनिंग, स्ट्रक्चरिंग, क्रिएटिव्हिटी आणि अपडेट देत राहणे या सर्व गोष्टी समाविष्ठ आहेत. तुम्हाला व्यवसायात टिकून राहायचे असेल तर आपल्या वेबसाईटला सतत अपडेट ठेवणे गरजेचे आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यवसायाला वेबसाईट ची गरज आहे त्यामुळे प्रत्येक व्यावसायिक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या व्यवसायाची वेबसाइट बनवू इच्छितो. अशा काळामध्ये जर तुम्ही वेबसाईट बनवून देण्याचे काम करत असाल तर तुम्हाला अनेक ऑर्डर तर मिळतीलच परंतु तुमचे कायमस्वरूपी ग्राहक देखील भेटतील.


एफिलियेट मार्केटिंग (Affiliate Marketing)

या प्रकारची मार्केटिंग म्हणजे तुम्ही यामध्ये कुणाच्यातरी व्यवसायाला हातभार लावण्यासाठी त्याच्या उत्पादनांचे प्रमोशन करण्यासाठी मदत करत असतात. इतर प्रकारच्या मार्केटिंग पेक्षा हा प्रकार डिजिटल मार्केटिंगच्या सर्वात जास्त जवळ जातो. या प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना किंवा तुमच्या ब्लॉग्सवर विजीट करणाऱ्या लोकांना एखाद्या प्रॉडक्ट विषयी माहिती देऊन त्यांच्या साईटच्या लिंक देतात. जर कोणी त्या साईट लिंक वरती जाऊन ते प्रॉडक्ट विकत घेतले तर तुम्हाला त्याच्या बदल्यात काही प्रमाणात कमिशन मिळते. डिजिटल मार्केटिंग मध्ये सर्वात जुना पैसे कमावण्याचा मार्ग म्हणजे हा एफिलियेट मार्केटिंग होय. यालाच रेफरल मार्केटिंग असे देखील म्हटले जाते. 


सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)

ऐकून थोडे आश्चर्य वाटेल की कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पैसे कमावू शकतो. याच्या नावाच्या नुसार ही देखील एक डिजिटल मार्केटिंग च आहे. यामध्ये माध्यम हे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम हे वापरले असल्याने याला सोशल मीडिया मार्केटिंग असे संबोधले जाते. 

अनेक सोशल मीडिया टूल्स चे स्वतःचे data analytic tools असतात आणि यांचीच मदत ही आपल्याला सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये अधिक होते. सोशल मीडिया हे माध्यम मोठे असल्याने इथून तुम्ही अनेक लोकांपर्यंत म्हणजेच मोठ्या जनसमुदयापर्यंत सहज पोहोचू शकता. 


मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing)

मोबाईल मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंगचा एक नवीन प्रकार आहे. डिजिटल मार्केटिंग द्वारे पैसे कमावण्याचा हा मार्ग आता कुठे समोर आलेला आहे. खाली मोबाईल मार्केटिंगचे काही पद्धती दिलेल्या आहेत. 

1. एसएमएस मार्केटिंग (SMS Marketing)

ही मार्केटिंग मेसेजेस च्या माध्यमातून केली जाते. इंटरनेट निर्माण होण्याच्या अगोदर या प्रकारची मार्केटिंग ही केली जात असे. आजही या मार्केटिंग तंत्राचा वापर छोट्या उद्योगांद्वारे मार्केटिंग साठी केला जातो.

2. पुश नोटिफिकेशन (Push Notification)

हा प्रकार 2009 मध्ये apple ने सुरू केला. पुश मेसेज म्हणजे ते मेसेज जे तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसतात आणि युझर ला आकर्षित करतात.

3. QR Codes

सध्याच्या काळात आपण पेमेंट करण्यासाठी हे QR कोड वापरत असतो. हे कोड तुमच्या मोबाईल स्क्रीन द्वारे बघितले जातात आणि त्यांच्यामध्ये दडलेला URL ते तुमच्या BROWSER मध्ये ओपन करत असतात. म्हणजे यातून तुमच्या ग्राहकांना तुम्ही सहज तुमच्या वेबसाईटवर घेऊन येऊ शकता.

आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत ही घ्यावी लागणार नाही.


ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)

ईमेल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग मध्ये एक नवीन माध्यम आहे. ई-मेलचा वापर येथे एक ॲडव्हर्टायझिंग म्हणून केला जातो ज्यामध्ये आपल्या ग्राहकांपर्यंत आपल्या उत्पादनाविषयी माहितीही ई-मेलच्या माध्यमातून पाठवली जाते. यामध्ये तुमच्या प्रोडक्ट् विषयी तुम्ही पूर्ण डील देखील  पाठवू शकतात. याच्या माध्यमातून तुम्ही एका क्लीकच्या माध्यमातून सहज लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. 


शॉपीफाय चा वापर करून स्वतःचे ऑनलाइन स्टोअर सुरू करा (Use shopify to build your own store)

जर तुम्हाला तुमचे काही प्रोडक्ट्स हे ऑनलाइन विक्री करायचे असतील तर तुम्ही शॉपिफाय सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून स्वतःचे ऑनलाइन स्टोअर बनवू शकता. इथे तुमचे प्रोडक्ट्स तुम्ही लिट्स करून आणि सेल करून ऑनलाइन मार्केटिंग करू शकता.

याशिवाय तुम्ही अमेझॉन सेलर म्हणून अकाउंट बनवून देखील आपले प्रोडक्ट्स हे विक्री करू शकता. यामध्ये देखील तुम्हाला जास्त प्रमोशन न करता तुमच्या प्रोडक्ट्स ची विक्री करता येते.


दुसऱ्या साईट्स साठी कंटेंट लिहून (Content Writing Business)

हे ऑनलाइन पैसे कमावण्यासाठी एक सोपे आणि कमी रिस्क असलेले काम आहे. तुम्हाला यासाठी तुमच्या विषयाशी निगडित ज्ञान तर असायलाच हवे परंतु तुमच्याकडे वाक्यरचना आणि लेख वाचकांना आकर्षित कसा लिहिता येईल याचे ज्ञान देखील असायला हवे. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट्वर काम करून पैसे कमावू शकता. 


अशा प्रकारे तुम्ही हे तर जाणून घेतले आहे की इंटरनेट मार्केटिंगद्वारे कशा प्रकारे पैसे हे कमावता येतात. परंतु तुम्हाला हे देखील जाणून घ्यायला उत्कंठा असेल की तुम्ही या मार्गाद्वारे किती पैसे कमावू शकतात?


तुम्हाला डिजिटल मार्केटिंगद्वारे किती पैसे कमावता येतात (How much earn Money by Digital Marketing)

सध्याच्या काळात डिजिटल मार्केटिंग विश्वामध्ये तुम्हाला 20 लाखाहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यात कोणताही व्यक्ती त्यांच्या क्षमतेनुसार आणि कामावर अनुसरून पैसे कमावू शकतो. तुम्ही या क्षेत्राला करियर म्हणून जर बघत असाल तर एक महिन्याला 15 हजार ते 1.5 लाख रुपये तुम्ही कमावू शकता. जास्तीत जास्त आकडा हा तुमच्या कामावर अवलंबून आहे. 

सध्या या क्षेत्रात पवन अग्रवाल, अमित शर्मा, प्रीतम नगराळे आणि मराठीमध्ये मराठीमोल, मराठी वारसा सारख्या वेबसाईट्स आहेत. यातील लोकांची कमाई तुम्हाला त्यांच्या व्हिडीओ मध्ये कळून येईलच परंतु एक सर्वसाधारण आकडा हा 5000$ च्या वरच असेल.

या सर्व गोष्टींवरून तुम्हाला या क्षेत्रात मिळकतीला असलेल्या संधी समजून आल्याच असतील. या क्षेत्रात यश हे लगेच मिळेल असे नाही तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि तुमच्याकडे संयम आणि चिकाटी देखील हवीच!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने