इसापूर धरण | Isapur Dam Information in Marathi

इसापूर धरण | Isapur Dam Information in Marathi

धरणाचे नाव- इसापूर धरण (Isapur Dam)

नदीचे नाव- पैनगंगा नदी

ठिकाण- इसापूर

जिल्हा- यवतमाळ, हिंगोली

इसापूर धरण | Isapur Dam Information in Marathi

Isapur Dharan Marathi Mahiti

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या धरणांच्या यादीमध्ये इसापूर धरणाचा 4था क्रमांक येतो. इसापूर हे धरण पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले आहे. 1971 ते 1982 या दरम्यान या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. पैनगंगा म्हणजे वर्धा नदीची उपनदी होय. पुढे जाऊन वर्धा नदी ही वैनगंगा नदीला जाऊन मिळते. तिथून पुढे ही नदी प्राणहिता या नावाने ओळखली जाते. प्राणहिता पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळते. 

इसापूर धरणाची उंची 57 मीटर म्हणजे 187 फूट आहे.धरणाची लांबी 4120 मीटर म्हणजे 13517 फूट आहे. इसापूर धरणाची पाणी साठविण्याची एकूण क्षमता 44.28 टीएमसी म्हणजे 44280 दशलक्ष घनफुट इतकी आहे. यातील उपयोगात आणता येईल असा जलसाठा हा 33.58 टीएमसी आहे. उपयुक्त जलसाठा असणाऱ्या धरणांच्या यादीत इसापूर धरणाचा 5 वा क्रमांक लागतो. धरणाला एकूण 15 दरवाजे आहेत. इसापूर धरणातून जाणाऱ्या दोन कालव्यांच्या मदतीने हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना फायदा होतो.  

इसापूर धरणाला कसे पोहोचाल?

हिंगोली शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. यवतमाळ शहरापासून हे धरण 136 किलोमीटर अंतरावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने