घाटघर धरण || Ghatghar Dam Information in Marathi
धरणाचे नाव- घाटघर धरण (Ghatghar Dam)
नदीचे नाव- प्रवरा नदी
ठिकाण- घाटघर (चोंडा), अकोले
जिल्हा- अहमदनगर
घाटघर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण आहे. या धरणाला दोन प्रकल्पात विभागले गेलेलं आहे. अप्पर घाटघर आणि लोवर घाटघर अशी त्यांची नावे आहेत. सह्याद्रीचा घाटमाथा हा अप्पर घाटघर तर सह्याद्रीचा काहीसा पायथा हा लोवर घाटघर आहे. लोवर घाटघर जे धरण आहे त्याला चोंडा धरण असे देखील म्हणले जाते. अकोले तालुक्यातील घाटघर या गावाजवळ हे धरण आहे.
अप्पर घाटघर धरणाची निर्मिती ही प्रवरा नदीवर केली गेलेली आहे. प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. 2005 मध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
अप्पर घाटघर या धरणाची उंची 15.16 मीटर म्हणजे 49.73 फूट इतकी आहे. धरणाची लांबी ही 503 मीटर म्हणजे 1650 फूट आहे. अप्पर घाटघर धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 0.21 टीएमसी म्हणजे 210 दशलक्ष घनफुट इतकी आहे.
लोवर घाटघर या धरणाची उंची 86.14 मीटर म्हणजे 282 फूट तर लांबी 449 मीटर म्हणजे 1473 फूट आहे. लोवर घाटघर धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 0.11 टीएमसी म्हणजे 110 दशलक्ष घनफुट इतकी आहे.
या प्रकल्पातून 250 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते.
धरणपरिसरात अनेक गडकिल्ले आहेत त्यापैकी अलंग, मदन आणि कुलंग ही त्रिजोडी आहे. पर्यटकांसाठी हे धरणक्षेत्र आकर्षनाचे केंद्र आहे.
घाटघर धरणाला कसे पोहोचाल?
अकोले शहरापासून घाटघर हे धरण 60 किलोमीटर अंतरावर आहे. अहमदनगर शहरापासून 178 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.