टोकियो पॅरालिम्पिक 2020 | Tokyo Paralympics 2020 important Questions

टोकियो पॅरालिम्पिक 2020 | Tokyo Paralympics 2020 important Questions

5 सप्टेंबर रोजी संपलेल्या टोकियो येथे होत असलेल्या पॅराऑलम्पिक खेळांमध्ये यावेळी भारताने 19 पदके मिळवली. आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे टोकियो पॅराऑलम्पिक वरील प्रश्न आणि उत्तर या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. स्पर्धा परीक्षा कुठलीही असो, आपल्या वेबसाईटवर स्पर्धा परीक्षा या विभागात तुम्हाला सर्व महत्वाच्या गोष्टी या नोट्स स्वरूपात बघायला मिळतील. 

टोकियो पॅरालिम्पिक 2020 | Tokyo Paralympics 2020 important Questions



प्रश्न: टोकियो पॅरालिम्पिक 2020 या स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते?

उत्तर: जपान 

सविस्तर: जिथे ऑलम्पिक खेळ होतात तिथे पॅराऑलम्पिक होत असतात. टोकियो पॅराऑलम्पिक 2020 उन्हाळी स्पर्धा आहे. टोकियो हे शहर म्हणजे जपानची राजधानी होय.


प्रश्न: टोकियो पॅराऑलम्पिक 2020 या खेळाचे हे कितवे संस्करण होते?

उत्तर: 16 वे

सविस्तर: याआधी जे टोकियो ऑलम्पिक झाले ते 32 वे संस्करण होते. आपण जुन्या पॅरालिम्पिक विषयी देखील काही माहिती जाणून घेऊयात.


वर्ष

संस्करण

ठिकाण

2008

13 वे

बीजिंग

2012

14 वे

लंडन

2016

15 वे

रिओ

2020

16 वे

जपान

2024

17 वे

पॅरिस


प्रश्न: पॅराऑलम्पिक या खेळाची केव्हापासून सुरुवात झाली आहे?

उत्तर: 1960

सविस्तर: ऑलम्पिक या खेळांची सुरूवात ही 6 एप्रिल 1896 मध्ये झाली. पहिली ऑलम्पिक स्पर्धा ही 1896 मध्ये अथेन्स, ग्रीस येथे झाली. पॅराऑलम्पिक खेळ हे 1960 साली सुरू झाले व पहिली स्पर्धा ही रोम, इटली इथे झाली.


प्रश्न: टोकियो पॅराऑलम्पिक 2020 या खेळाची सुरुवात कधी झाली?

उत्तर: 24 ऑगस्ट 2021

सविस्तर: ही स्पर्धा 2020 जरी असली तरी देखील या स्पर्धा कोरोना संकटामुळे 2021 मध्ये झाल्या होत्या.


स्पर्धा

सुरुवात

शेवट

ऑलम्पिक गेम्स 2020

23 जुलै 2021

8 ऑगस्ट 2021

टोकियो 2020 पॅरालिम्पिक गेम्स

24 ऑगस्ट 2021

5 सप्टेंबर 2021


पॅराऑलम्पिक मध्ये कोणत्या देशाचे कितवे स्थान आहे?


स्थान

देश

सुवर्णपदक

रौप्यपदक

कांस्यपदक

एकूण पदके

1

चीन

96

60

51

207

2

ग्रेट ब्रिटन

41

38

45

124

3

अमेरिका

37

36

31

104

24

भारत

5

8

6

19


सविस्तर: 2012 मध्ये झालेल्या पॅराऑलम्पिक लंडन खेळात भारताला 1 पदक मिळाले. 2016 मध्ये झालेल्या रिओ पॅराऑलम्पिक मध्ये भारताला 4 पदक मिळाले होते. सध्या झालेल्या 2020 पॅराऑलम्पिक मध्ये भारताने सर्वोत्तम कामगिरी करत 19 मेडल जिंकले आहेत.


भारताचे पॅराऑलम्पिक मधील सुवर्णपदक विजेते - Gold Medalist of India in Tokyo Paralympics 2020


खेळाडू

खेळ

राज्य

अवनी लेखरा

नेमबाजी

जयपूर, राजस्थान

सुमित अंतिल

भालाफेक

सोनिपत, हरियाणा

मनीष नरवाल

नेमबाजी

हरियाना

प्रमोद भगत

बॅडमिंटन

बिहार

कृष्णा नागर

बॅडमिंटन

राजस्थान


भारताचे पॅराऑलम्पिक मधील रजतपदक विजेते - Silver Medalist of India in Tokyo Paralympics 2020


खेळाडू

खेळ

भाविना बेन पटेल

टेबल टेनिस

निषाद कुमार

उंच उडी

योगेश कथुनिया

थाळीफेक

देवेंद्र झझारीया

भालाफेक

मरियप्पन थांगावेलू

उंच उडी

सिंघराज अधाना

नेमबाजी

प्रवीण कुमार

उंच उडी

सुहास यतिराज

बॅडमिंटन


भारताचे पॅराऑलम्पिक मधील कांस्यपदक विजेते - Bronze Medalist of India in Tokyo Paralympics 2020


खेळाडू

खेळ

सुंदर सिंग गुर्जर

भालाफेक

सिंघराज अधाना

नेमबाजी

शरद कुमार

उंच उडी

अवनी लेखरा

नेमबाजी

हरविंदर सिंग

तिरंदाजी

मनोज सरकार

बॅडमिंटन


प्रश्न: टोकियो पॅराऑलम्पिक 2020 मध्ये एकूण किती स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर: 540 (539 असेल तर ते उत्तर मिळेल)

सविस्तर: टोकियो पॅराऑलम्पिक 2020 मध्ये एकूण 22 स्पर्धा आणि त्यात 540 इव्हेंट होते. टोकियो ऑलम्पिक 2020 मध्ये एकूण 33 स्पर्धा आणि 339 इव्हेंट होते.


प्रश्न: टोकियो पॅराऑलम्पिक 2020 या खेळासाठी थीम सोंग "कर दे कमाल तू" कोणी लाँच केले आहे?

उत्तर: अनुराग ठाकूर

सविस्तर: लेखक व गायक- संजीव सिंह


प्रश्न: टोकियो पॅराऑलम्पिक 2020 मध्ये किती देशांनी सहभाग घेतला आहे?

उत्तर: 163

सविस्तर: भारताचे या स्पर्धेत 54 खेळाडू सहभागी होते.


प्रश्न: टोकियो पॅराऑलम्पिक 2020 आणि टोकियो ऑलम्पिक 2020 यांचा विषय किंवा हेतू म्हणजेच मोटो काय आहे?

उत्तर: United by Emotions (भावणाद्वारे संयुक्त)


प्रश्न: आत्तापर्यंत कोणत्या शहरामध्ये 2 वेळेस पॅराऑलम्पिक खेळाचे आयोजन झाले आहे?

उत्तर: टोकियो (1964 आणि 2021)


प्रश्न: टोकियो पॅराऑलम्पिक 2020 या खेळाचे उदघाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

उत्तर: नारूहितो (जपान सम्राट)


प्रश्न: टोकियो पॅराऑलम्पिक 2020 खेळांचे आयोजन कोणत्या स्टेडियम मध्ये करण्यात आले?

उत्तर: जपान राष्ट्रीय स्टेडियम


प्रश्न: पॅराऑलम्पिक या खेळाचा प्रकारामध्ये कोणत्या प्रकारच्या खेळाडूंचा समावेश असतो?

उत्तर: फक्त अपंग / विकलांग


प्रश्न: पॅराऑलम्पिक या खेळाच्या प्रकारामध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक जास्त वेळा पदक जिंकले आहेत?

उत्तर: यूएसए


प्रश्न: टोकियो पॅराऑलम्पिक 2020 या खेळांचे प्रायोजक कोणाला बनवले आहे?

उत्तर: thumbs up


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने