रॅमन मॅगसेसे पुरस्कार | Ramon Magsese Award Winners and Questions for MPSC/UPSC
आपण आज या लेखाच्या माध्यमातून रॅमन मॅगसेसे अवॉर्ड विषयी माहिती बघणार आहोत. यात आपण मुख्यतः सर्व 2021 सालचे रॅमन मॅगसेसे पुरस्कार आणि त्यासंदर्भातील काही प्रश्न देखील बघणार आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी मग ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट अ पासून तलाठी ग्रामसेवक भरती किंवा पोलीस भरती किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असो, सर्वांसाठी ही माहिती खूप जास्त उपयुक्त ठरणार आहे.
आजच्या आपल्या लेखाचा फॉरमॅट हा थोडासा वेगळा आहे. यात आपण प्रश्न त्याचे उत्तर आणि त्यासंदर्भात सर्व काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
प्रश्न: रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा पुरस्कार केव्हापासून देण्यास सुरुवात झाली होती?
उत्तर: 1957
सविस्तर: फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. रॅमन मॅगसेसे हा आशिया खंडातील सर्वोच्च सन्मान आहे. या पुरस्काराला नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानले जाते.
प्रश्न: रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा किती आणि कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो?
उत्तर: हा पुरस्कार एकूण 6 क्षेत्रात दिला जातो. सरकारी सेवा समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
प्रश्न: रॅमन मॅगसेसे पुरस्काराने 2021 मध्ये किती जणांना सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर: 05
सविस्तर: 2018 मध्ये 6 जणांना तर 2019 मध्ये 5 जणांना सन्मानित करण्यात आले.
2021 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते- Raman Magsaysay Award Winners of 2021
1) मुहम्मद अमजद साकीब (पाकिस्तान)- पाकिस्तान मधील सर्वात मोठ्या सूक्ष्म वित्त संस्थांची स्थापना केली. लाखो कुटुंबाची सेवा केली.
2) फिरदौसी कादिर (बांग्लादेश)- बांग्लादेशी शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी लक्षावधी लोकांचे जीव वाचवलेल्या लसींचा शोध लावण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
3) स्टीव्हन मुन्सी ()- एक मानवतावादी, ते आग्नेय आशियातील विस्थापित निर्वासितांना त्यांचे जीवन पुन्हा तयार करण्यास मदत करत आहे.
4) WatchDoc (इंडोनेशिया)- हे इंडोनेशिया मधील समस्या अधोरेखित करण्यासाठी कल्पकतेने डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग आणि वैकल्पिक प्लॅटफॉर्म एकत्र करणारे एक प्रोडक्शन हाऊस आहे.
5) रॉबरटो बॅलन (दक्षिण फिलिपिन्स)- ते एक मच्छीमार आहेत ज्यांनी समुदायाला त्यांचे समुद्र जलचर आणि त्यांच्या उपजीविकेचे प्राथमिक स्रोत पुनरसंचयीत केले.
प्रश्न: रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे 2021 सालचे हे कितवे संस्करण आहे?
उत्तर: 63 वे
प्रश्न: रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा दरवर्षी केव्हा देण्यात येतो?
उत्तर: 31 ऑगस्ट (रॅमन मॅगसेसे जयंती)
प्रश्न: रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित केले गेलेले पहिले भारतीय कोण आहेत?
उत्तर: विनोबा भावे (समुदायातील नेतृत्वासाठी 1958 साली)
प्रश्न: रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित केल्या गेलेल्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत?
उत्तर: मदर टेरेसा (शांतता आणि आंतरराष्ट्रीय समज - 1962 साली)
प्रश्न: 2019 मध्ये किती भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
उत्तर: 01
सविस्तर: 2019 मध्ये 5 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यातील एक भारतीय हे रविष कुमार होते. पत्रकारिता यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.
1) म्यानमार - को स्वि वीन (पत्रकारिता)
2) थायलंड - अंगखाना निलापजित (मानवाधिकार कार्यकर्ता)
3) भारत- रविश कुमार (पत्रकारिता)
4) फिलिपिन्स - रेमुंडो पुजंते कायाब्याब (संगीतकार)
5) दक्षिण कोरिया - किम जोंग की (तरुणांमध्ये हिंसा आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर काम)
प्रश्न: 2018 मध्ये कोणत्या भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
उत्तर: भारत वाटवानी व सोनम वांगचुक
प्रश्न: आतापर्यंत किती भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर: 52