घरबसल्या टायपिंग करून पैसे कमवा ।। Part Time Online Job for Students in Marathi

घरबसल्या टायपिंग करून पैसे कमवा ।। Part Time Online Job for Students in Marathi

मित्रानो तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी आज हा पार्ट टाईम ऑनलाइन जॉब घेऊन आलो आहे.  या जॉब मध्ये तुम्हाला दिवसातून फक्त 2 तास काम करायचे आहे आणि महिन्याला 5 ते 10 हजार रुपये तुम्ही सहज कमावू शकता. हा इंटर्नशिप जॉब आहे त्यामुळे तुम्हाला पुढर कुठेही नोकरी करत असताना या जॉब चा संदर्भ देऊन तुम्ही एक चांगल्या प्रकारे प्रोफाइल बनवू शकता.

Part Time Online Job for Students in Marathi

इंटर्नशिप चा अर्थ असा होतो की इथे तुम्हाला काम करून पैसे तर मिळताच परंतु त्या जॉब सोबत तुम्हाला ते काम कसे करायचे याची ट्रेनिंग देखील दिली जाते. पेमेंट इथे कमी असते परंतु तुम्हाला इंटर्नशिप मध्ये शिकायला मिळते हे महत्वाचे आहे.

Part Time Pocket Money Internship

Part Time Pocket Money Internship या नावाने ही इंटर्नशिप असून यामध्ये तुम्हाला दररोज 2 ते 3 तास काम करायचे आहे. तुम्ही विद्यार्थी असाल किंवा गृहिणी असाल तरी देखील तुम्हाला हे काम सहज मिळू शकेल. यात 7000 हुन अधिक घर बसल्या काम करण्याच्या संधी आहेत. इथे तुम्हाला मोफत इंटर्नशिप गाईड देखील मिळते आहे त्यामुळे तुम्हाला या इंटर्नशिप सहज करता येतील.

जॉईन कसे करणार?

इथे दिलेल्या लिंक वर क्लीक करून तुम्ही रजिस्ट्रेशन पेज वर येऊ शकता.
माहिती आणि रजिस्ट्रेशन वेबसाईट लिंक
https://internshala.com/part-time-july21

एकदा रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाली की तुम्ही सहज इंटर्नशिप साठी apply करू शकता.
अनेकांना टायपिंग निगडित जॉब हवे आहेत त्यामुळे तुम्हाला टायपिंग विषयी इंटर्नशिप इथे शोधायच्या आहेत.
(Search मध्ये तुम्हाला Content Writing टाकायचे आहे जेणेकरून तुम्हाला हे जॉब्स बघायला मिळतील)

यात तुम्हाला कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया आणि ब्लॉगिंग सारखे जॉब बघायला मिळतील. यातील प्रत्येक गोष्ट कशी आणि काय असते हे आज आपण समजून घेऊयात.

Content Writing

तर कंटेंट रायटिंग म्हणजे एखाद्या विषयावर आपण लिहून द्यायचं.समजा मी तुम्हाला विषय दिला की इलेक्ट्रिक बाईक, तर त्या गाडीला सुरुवात कधी झाली तिचे फीचर्स काय आहेत याविषयी एक सविस्तर लेख लिहायचा आहे. यात सोशल मीडिया विषयी तुम्ही कंटेंट लिहिणार असाल तर ते कंटेंट तुम्हाला लिहून द्यायचे आहे. तुम्हाला हा टायपिंग जॉब च आहे परंतु यात तुम्हाला अनेक विषयांवर सखोल अभ्यास करून लिहावा लागणार आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यास शैलीचा देखील इथे कस लागणार आहे.

अनेकांना असे वाटते की Captcha भरणे, वर बघून खाली लिहिणे असे जॉब द्यावे परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो की आजकाल असे अनेक सॉफ्टवेअर आलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचे जॉब आता बंद झालेले आहेत.
इंटरनेट वर भरपूर अशा वेबसाईट आहेत जशा की नोकरी.कॉम परंतु ते सर्व डेटा एन्ट्री रिलेटेड जॉब असतात ते फेक असतात. असे अनेक लोक आम्ही ओळखून आहोत ज्यांची खूप मोठी फसवणूक झालेली आहे.
अनेक लोक 10 हजार रुपये देऊन अशा डेटा एन्ट्री जॉब ला जॉईन होतात.  त्यांना हे माहीत नसते की असे जॉब आता शिल्लकच नाहीत तर जॉब मिळणार कसा? पुढे जाऊन तुम्हाला पैसे देऊन सुद्धा काही काम तर सोडा पैसे पण मिळत नाहीत. त्यामुळे हे असे जॉब करण्यासाठी 16-18 वयाचे मुले जास्त शिकार होतात.

आम्ही जे काही जॉब आणतो आहे तुमच्यासाठी त्यामध्ये तुम्हाला शक्यतो पैसे द्यायचे नाहीयेत त्यामुळे हे सर्व काही मिळवण्यासाठी अवघड आहेत परंतु मिळाले तर पैसे मिळण्याची खात्री आहे.

तुम्हाला ज्या जॉब साठी apply करायचे आहे त्याच्या समोर असणाऱ्या व्हिव्यु डिटेल्स या बटनावर क्लीक करायचे आहे. यात तुम्हाला त्या जॉब चा कालावधी देखील बघायला मिळेल आणि त्यासाठी apply करण्याची शेवटची तारीख देखील दिसेल. यात तुमच्याकडून त्यांना काय Expect आहे ते देखील दिलेले आहेत.
तुम्हाला कंटेंट रायटिंग जॉब मध्ये कंटेंट लिहिता यायला हवे आणि ते कंटेंट हे पूर्णपणे युनिक असायला हवे. यात गुगल वरून कॉपी केलेले कंटेंट ग्राह्य धरले जात नाही. कंटेंट लिहिताना तुम्हाला गुगल वरून 3-4 लेख वाचायचे आहेत आणि त्यातून माहिती घेऊन स्वतःच्या शब्दात लिहायचे आहे. तुम्हाला त्यांनी दिलेल्या वेळेतच त्या कंटेंट ला लिहून सबमिट देखील करायचे असते.
9 Tips to write Unique Content in Marathi

तुम्हाला या जॉब साठी पुढे जाऊन apply करताना काही महत्वाच्या डिटेल्स द्यायच्या आहेत त्या दिल्यानंतर तुम्ही apply करू शकता.

इथे स्पर्धा खूप आहे त्यामुळे जास्तीत जास्त इंटर्नशिप ला तुम्हाला नोंदणी करायची आहे. तुम्हाला जर एखाद्या स्पेसिफिक विषयाशी निगडित इंटर्नशिप हव्या असतील तर तुम्ही तिथे फिल्टर मध्ये जाऊन विषय देखील सिलेक्ट करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला इंटर्नशिप बघायला मिळतील.

आपण लवकरच फ्री कोर्सेस देखील घेऊन येतो आहे जे करून तुम्हाला अशा इंटर्नशिप सहज मिळू शकतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने