1500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे नेकबँड ।। India's best selling NeckBands under 1500

1500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे नेकबँड ।। India's best selling NeckBands under 1500

भारतात आपल्याला नेकबँड म्हणजेच गळ्यात अडकवण्याचे ब्ल्यूटूथ हेडसेट हे खूप जास्त वापरताना लोक दिसतात. हा सेगमेंट आपल्याला खूपच जास्त गाजलेला दिसतो परंतु यात देखील 1500 रुपये किंमतीच्या आतील नेकबँड हे जास्त प्रसिद्ध आहेत. आज तुमच्यासाठी असेच टॉप चे India's best selling NeckBands under 1500 rs घेऊन आलो आहे. 

दिलेल्या रँकिंग मध्ये खराब प्रोडक्ट् असा कोणताही नाहीये परंतु जो शेवटी सांगणार आहे तस तसे प्रोडक्ट्स हे बेस्ट बनत जाणार आहेत.

NeckBands under 1500


1. Noise Tune Active

Best Neckband from Noise under 1000 Rs / 1500 Rs

नोईज या प्रसिद्ध ब्रँड कडून येणारे हे नेकबँड तुम्हाला 1000 रुपयांच्या आत बघायला मिळतील. यात ब्रँड तुम्हाला 10 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल असे सांगतो परंतु तो 8 ते 9 तासांचा मिळतो आणि तो खरच ओके आहे. बिल्ड क्वालिटी देखील यांची खूप चांगली असून कानांमध्ये सहज फिट देखील होतात त्यामुळे यासाठी 1000 रुपये देणे योग्य वाटते. 

या प्रोडक्ट् मध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे याची जी साउंड क्वालिटी आहे ना ती एका फेक बेस सारखी वाटते. आपल्याला जो बेस अनुभवायला मिळतो तो खरच कानांमध्ये त्रास देतो आणि लगेच फेक आहे असे समजून येते. मॅग्नेट मध्ये देखील काही काळानंतर प्रॉब्लेम यायला सुरुवात होते कारण ते तितके स्ट्रॉंग नाहीत.


2. Infinity (JBL) Glide 120

Best Neckband from JBL under 1500 Rs

या नेकबँड ची किंमत ही 1150 रुपये आहे. बिल्ड क्वालिटी ही तितकी इम्प्रेसिव्ह नसून ओके ओके आहे! संपूर्ण प्रोडक्ट् हे ओके ओके आहे परंतु याचा साउंड जो आहे ना तो सर्वात जास्त इम्प्रेसिव्ह आहे. साउंड एकदम मस्तपणे ट्यून केलेला आहे. प्रॉब्लेम हाच आहे की याची बॅटरी ब्रँड 7 तास बोलतो आणि हा या कॅटेगरी सेगमेंट मध्ये सर्वात कमी आहे. तुम्ही जर 100% व्हॅल्यूम वर ऐकत असाल तर मग बॅटरी बॅकअप हा तर खूपच कमी होऊन जाईल. 


3. Boat Rockerz 235v2

Best Neckband from Boat under 1500 Rs

या नेकबँड ची किंमत ही 1200 रुपये इतकी आहे. Boat ची साउंड क्वालिटी ही सुपर ऍक्युरेट असते त्यामुळे याच्याविषयी जास्त काही प्रश्न निर्माण होणार नाहीत. ब्रँड इथे सांगतो की 8 तासांचा बॅटरी बॅकअप आहे आणि 20 मिनिट चार्जिंग मध्ये 4 तास चालू शकेल, जे की एक चांगले फिचर आहेत.


4. Boult Bass Curve Pro

Best Neckband from Boult under 1500 Rs

Boult ची किंमत ही आपल्याला 1500 रुपये बघायला मिळेल. 

बौल्ट आणि बोट दोघे पण सारखेच दिसायला आहेत त्यामुळे कदाचित तिसरा प्रोडक्ट् आणि हा प्रोडक्ट् तुम्हाला अगदी सारखाच वाटेल. वायर स्लाईड करणे, डिझाइन सर्व काही सारखेच आहे.

दोघांचे साउंड देखील तुम्हाला एकदम सारखेच बघायला मिळतील. परंतु boat च थोडंस नाव आहे त्यामुळे याला थोडा प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता.  Boat ची किंमत ही एक रिजनेबल असल्याने तुम्ही boat सोबत जाऊ शकता. 


5. Boat Rockerz 255 Pro+

Best Neckband from Boat under 1500 Rs

याची सर्वात महत्वाची खास गोष्ट म्हणजे याचा 40 तासांचा बॅटरी बॅकअप आहे! याच्यात कशा प्रकारे कंपनीने इतका मोठा बॅटरी बॅकअप दिलाय काही माहीत नाही परंतु जे काही केलंय ना ते खरच तारीफ करण्यायोग्य आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे हे हेडफोन 10 मिनिट चार्जिंग मध्ये 10 तास चालू शकतात! 

ज्या कोणाला गाण्यांमध्ये बेस जास्त आवडतो ना त्यांनी हे नक्कीच ट्राय करायला हवेत. या नेकबँड सारखा बेस कुठेच भेटणार नाही. थोडासा कम्फर्ट मध्ये कमतरता आहे परंतु 1500 रुपये मध्ये एक बिस्ट प्रोडक्ट् boat ने बनवलेला आहे. यात IPS7 रेटिंग आहे त्यामुळे तुम्ही स्पोर्ट्स साठी देखील याचा वापर करू शकता. 


6. Dizo Wireless

Best Neckband from Dizo under 1500 Rs

फक्त 1300 रुपयांमध्ये मिळणार हा प्रोडक्ट् तुम्हाला 17 तासांचा प्लेबॅक टाईम देतो. बिल्ड क्वालिटी बघितली तर एकदम सुपर आहे. यांच्यात असलेला सर्वात मेन मुद्दा म्हणजे जेव्हा आपण याचे मॅग्नेट बाजूला करतो तेव्हा हे नेकबँड आपल्याला मोबाईलच्या ब्ल्यूटूथ मध्ये बघायला मिळतात. साउंड क्वालिटी मध्ये खूप जास्त त्यांनी मेहनत घेतलेली आहे. यात सुपर लो लेटन्सी मोड मिळतो तो कदाचित रिअलमी सोबत काम करू शकेल.


India's best selling NeckBands under 1500 हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल अशी आशा बाळगतो. या आर्टिकल च्या माध्यमातून तुम्हाला 1500 च्या आतमध्ये मिळणारे ब्ल्यूटूथ हेडफोन ची माहिती दिली आहे. यात शेवटी असणारे 3 प्रोडक्ट्स हे बिस्ट आहेत आणि स्पेशली boat rockerz 255 pro + तर कमालीचे प्रोडक्ट् आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने