How to Write Unique Article ? || ब्लॉगसाठी नवीन आणि युनिक कंटेंट कसे लिहावे?
ब्लॉगिंग असो किंवा वेबसाईट साठी आर्टिकल लिहायचे असतील, या सर्वांमध्ये यश मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा हा ओरिजिनल आणि युनिक कंटेंट असतो. आर्टिकल मध्ये ओरिजिनल आणि युनिक कंटेंट ठेवणे तितके सोपे तर नसते परंतु जे ब्लॉगर्स आणि कंटेंट रायटर्स कंटेंट ची किंमत समजतात ते त्यांच्या कंटेंट ला फ्रेश नवीन आणि युनिक बनवतातच! परंतु कसे? त्यांना असे काय माहीत असते जेणेकरून त्यांना यश मिळते? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून कंटेंट लिहिले पाहिजे जेणेकरून ते युनिक राहील आणि सर्वांपेक्षा ते काहीतरी वेगळे देखील असेल?
मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या आर्टिकलच्या माध्यमातून मिळतील. त्यामुळे हे आर्टिकल पूर्ण वाचा.
चला तर मग सुरू करूया युनिक आर्टिकल लिहायच्या 9 टिप्स - 9 Tips to Write Unique Content
1.आपल्या छंदाला जोपासत कंटेंट लिहा
कित्येक वेळा ब्लॉगर्स ते टॉपिक निवडत असतात जे त्यांना आवडत देखील नसतात. कारण बाकी ब्लॉगर्स त्यावर लिहीत असतात आणि चांगली कमाई करता असतात म्हणून ते तसे करतात. अशामध्ये ते विचार देखील करत नाही की असे करणे पूर्णपणे गरजेचे नाहीये. तुम्हाला जर इतर लोक काम करत असलेल्या विषयावरचं लिहायचे असेल तर तुम्हाला त्या निवडलेल्या विषयाला थोड वळण देखील देता आले पाहिजे. टॉपिक विषयी जी थीम आहे तिला बदलता आले पाहिजे आणि तुमची शैली काही वेगळी असायला हवी. यामुळे तुमचे कंटेंट हे आपोआप युनिक बनेल. जर तुम्हाला असे करणे देखील शक्य नसेल तर तुम्ही अशा विषयांना हात घाला ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे आणि तुम्ही तुमचे विचार त्यात देऊ शकता.
2. सीमा ओलांडून बाहेर पडा
जर तुम्ही टेबल खुर्ची वर बसून कंटेंट सर्च करत लिहीत आला असाल तर एक वेळेनंतर तुम्ही असे अनुभवाल की तुमच्याकडे काही नवीन शिल्लक च नसेल. आणि हीच गोष्ट तुमच्या लेखात आणि ब्लॉग मध्ये देखीक दिसून येईल. तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडून प्रत्येकाकडून काही ना काही तरी शिकत रहा. यासाठी तुमची नजर चांगली असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही लहान मुलांपासून, मोठ्यांपासून, पक्ष्यांपासून, निसर्गापासून सर्वांपासून काही ना काही नवीन नक्की शिकू शकता.
त्यामुळे तुमच्या आखलेल्या सीमेच्या बाहेर पडा आणि कोणाकडूनही प्रेरणा घ्या, जेणेकरून तुमचे आर्टिकल हे युनिक बनतील. तर आज पासून प्रत्येक नवीन ठिकाणी नवीन गोष्टींमध्ये निरीक्षण करून अशा गोष्टी शोधा जेणेकरून तुम्ही काहीतरी नवीन शिकाल देखील.
3. तुमचे वयक्तिक अनुभव देखील लिहा.
सर्वांचा वयक्तिक अनुभव हा एकाच गोष्टीविषयी वेगवेगळा असतो. अशात तुम्ही तुमच्या लेखाला थोडासा पर्सनल टच देत त्या लेखाला युनिक बनवू शकता. त्यामुळे फक्त कन्सेप्ट आणि फॅक्टस यादरम्यान अडकून पडू नका, तुम्ही त्याविषयी काय विचार ठेवता हे देखील तुमच्या वाचकांसोबत नक्की शेअर करा.
4. प्रश्नांची उत्तरे घेऊन या.
जर तुम्हाला युनिक आर्टिकल लिहायचे असेल तर तुम्ही तुमच्या वाचकांच्या प्रश्नाचे विश्लेषण करा. तुमच्या आर्टिकल च्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही त्यांच्या प्रॉब्लेम्स चे सोल्युशन हे सर्वात आधी देऊ शकला तर ते तुमच्याशी जोडले जातील आणि तुमच्या या प्रयत्नांना ते दाद देखील देतील. हे तुम्हाला युनिक कंटेंट साठी देखील मदत करतील.
5. खोलात जाऊन अभ्यास करा
जर तुम्ही कोणत्याही विषयावर लिहीत असाल तर लिहिण्याच्या आधी त्या विषयाशी निगडित सर्व बाजूनी अभ्यास करा जेणेकरून तुम्ही त्या विषयावर सविस्तर आणि युनिक असे आर्टिकल लिहू शकाल. आर्टिकल असे लिहा ज्यात त्या विषयाशी निगडित सर्व प्रश्नांची उत्तरे देखील दिलेली असतील. हे असेच असेल की तुम्ही समुद्रात उडी मारून त्याच्या खोलीतून तुम्ही मोती बाहेर काढता आहात. त्यामुळे या गोष्टीला एकदा नक्की उपयोगात आणून बघा!
6. अनेक ठिकाणांहून मदत घ्या.
आपल्या आर्टिकल मध्ये युनिकनेस ठेवण्यासाठी आणि आपल्या वाचकांना बेस्ट कंटेंट देण्यासाठी तुम्ही केवळ एका ठिकाणावर अवलंबून राहू नका. याऐवजी ज्या रिसोर्स ची तुम्हाला मदत घेता येईल त्यांची मदत घेत रहा. अशा पद्धतीने तुमच्याकडे एका विषयाला लिहिण्याच्या वेगवेगळ्या आयडिया येतील. यात जर तुम्ही तुमची स्वतःची शैली जोडली तर तुमचे कंटेंट हे पूर्णपणे युनिक बनलेले असेल.
7. भाषा साधी ठेवा
कित्येक वेळा आपण युनिक म्हणजे सर्वात वेगळे आणि कॉम्प्लेक्स असे समजतो. यात आपण आर्टिकल ची भाषा अशी अवघड बनवतो की त्याला समजणे देखील कठीण जाते. तुम्हाला असे करायचे नाहीये. तुम्हाला एकदम साधी आणि सोपी भाषा वापरायची आहे ज्याची शैली ही मैत्रीपूर्ण असेल. तुमचा आर्टिकल फॉरमॅट इतका साधा असावा की त्यात कलर असलेले हेडिंग , सबहेडिंग आणि छोटे छोटे पॅराग्राफ्स असतील जेणेकरून ते सोपे तर वाटेलच पण त्याला वाचायचे देखील मन झाले पाहिजे. लक्षात ठेवा हा सर्वात साधा परंतु खूप महत्वाचा मुद्दा आहे.
8. लॉंग टेल कीवर्ड्स चा वापर करा
समजा की तुमचे आर्टिकल हे खूप युनिक आहे परंतु त्यातून जास्त वाचकांची पोहोच नाही मिळत, तर अशात तुम्हाला तुमच्या कीवर्ड्स वर देखील लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला शीर्षकात स्पेसिफिक लॉंग टेल कीवर्ड्स वापरावे लागतील जेणेकरून वाचक तुमच्या लेखाकडे आकर्षित होऊ शकतील. वाचकांना तुमच्या लेखाकडे खेचण्यासाठी तुम्हाला त्यात आकर्षक असे इमेजेस देखील वापरावे लागतील. कारण छोट्यात छोटी गोष्ट देखील वाचकांना attract आणि distract देखिल करू शकते.
9. आपल्या ज्ञानाला वाढवत रहा
आर्टिकल ला युनिक तेव्हाच बनवता येईल जेवहा प्रत्येक गोष्टीला एका वेगळ्या रूपाने वेगळ्या शब्दांमध्ये खूप चांगल्या प्रकारे लिहिले गेले असेल. आणि हे सर्व करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्ञानात देखील वाढ करत राहावी लागेल. तुम्हाला पुस्तके वाचायला हवीत जेणेकरून तुम्हाला नवीन शब्द, नवीन वाक्ये आणि नवीन अनुभव मिळतील. आपल्या आर्टिकल मध्ये हे शब्द तुम्हाला नक्की वापरता येतील.
आपल्या कॅटेगरी नीच नुसार तुम्ही स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे. कारण ज्ञान तुम्हाला कायम प्रगती कडेच घेऊन जाते.
अशा प्रकारे या 9 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये सहज यश मिळेल आणि तुम्ही यशाचे नवनवीन शिखर गाठू शकाल. कंटेंट वर तुम्हाला लक्ष द्यायचेच आहे त्यासोबत त्याच्या प्रेझेन्टेशन वर देखील तुम्हाला काम करायचे आहे.