LNG म्हणजे काय? || देशातील पहिले LNG स्टेशन महाराष्ट्रात

LNG म्हणजे काय? || देशातील पहिले LNG स्टेशन महाराष्ट्रात


LNG म्हणजे काय? || देशातील पहिले LNG स्टेशन महाराष्ट्रात

देशातील पहिल्या LNG स्टेशनचे उदघाटन हे काही दिवसांपूर्वी नागपुरात झाले. हे इंधन डिझेलला पर्याय म्हणून वापरले जाणार आहे. डिझेल आणि पेट्रोल सोबत तुलना केली तर LNG हे इंधन स्वस्त आहे. याच्या वापराने देशात पुढील काळात वाहतूक देखील स्वस्त होऊ शकते. 

LNG म्हणजे काय? LNG चे नेमके काय फायदे आहे? LNG हा पर्यावरणाच्या दृष्टीने कसा फायदेशीर आहे? या सर्व विषयांवर आज तुम्हाला माहिती देतो आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हे सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. अशात नागपुरातून देशासमोर डिझेल साठी एक सशक्त पर्याय उभा राहतो आहे. LNG म्हणचे Liauidied Natural Gas होय! देशातील पहिला LNG पंप म्हणजे जिथे साधारण बस आणि ट्रक्स ला LNG मिळेल असे स्टेशन नागपूर मध्ये उभे राहिले आहे. 

नागपूरच्या रिंग रोडला हा प्रकल्प उभा राहतो आहे. विदर्भातील प्रमुख औषध निर्मिती करणारी कंपनी बैधनाथ हिने हे पंप सुरू केले आहे. 

LNG स्टेशन कसे काम करतात?

ही संपूर्ण यंत्रणा क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी वर आधारित असून नॅचरल गॅसला लिक्विफाय करून -162℃ तापमानावर याचा साठा केला जातो. पूर्ण पणे पाईपलाईन ती म्हणजे बनवण्यापासून ते गाडीच्या टाकीपर्यंत क्रायोजेनिक टॅंक द्वारे होते. गाडीचा टॅंक हा 450 लिटरचा क्रायोजेनिक टॅंक असून त्यात जवळपास 180 किलो गॅस बसतो. या टॅंक चे तापमान देखील -162℃ ठेवावे लागते. ही संपूर्ण प्रक्रिया 6 ते 7 प्रेशर बार वापरून केली जाते. 

सध्याच्या काळात डिझेल चे भाव हे शंभरी गाठत असताना जर कोणी LNG वर शिफ्ट झाले तर त्यानं 61 रुपये किंमतीत 1 किलो LNG मिळतोय. याशिवाय एव्हरेजमध्ये देखील 10 ते 15% वाढ तुम्हाला LNG वापरून बघायला मिळेल. 


-162℃ गाडीमध्ये देखील

गाडीचा टॅंक देखील त्यांनी असा बनवला आहे की जेणेकरून ते तापमान तिथे देखील राहू शकेल. गाडीच्या टॅंक मधून इंजिन कडे जेव्हा गॅस जातो तेव्हा तो बाष्प बनून जातो आणि इंजिन पर्यंत पोहोचताना तो 6 ते 7 वेळा प्रेशर बार मधून जातो. 


डिझेल vs LNG : आर्थिक फायदा

डिझेल vs LNG मध्ये मुख्यतः सर्वांच्या मनात हाच प्रश्न असेल की याचा फायदा आर्थिक दृष्ट्या कसा होणार आहे? महत्वाचे म्हणजे सध्या तरी हा गॅस साध्या प्रवासासाठी नाहीये. याचा वापर हा हेवी ड्युटी व्हेईकल मध्ये केला जातो आहे. तुम्ही बघितलेच असेल की डिझेल खूप महाग आहे आणि त्याच्या तुलनेत LNG स्वस्त आहे. त्यामुळे इथेच आर्थिक फायदा आपल्याला होतो आहे. 

डिझेल देखील आपल्याला मागून घ्यावे लागते आणि LNG देखील आपल्याला मागणी करून घ्यावा लागतो. परंतु LNG हा कमी किंमतीत आपल्याला मिळतो आहे. याचा फायदा सरकारला देखील फॉरेन एक्सचेंज मध्ये होणार आहे. 

अमेरिकेमध्ये LNG चे पंप हे मोठ्या प्रमाणात आहेत मात्र भारतात हा प्रयोग नागपुरातून सुरू होतो आहे. काही वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरि यांनी डिझेल मुक्त विदर्भ ही घोषणा केली होती, त्याच अनुषंगाने पहिले पाऊल नागपुरात पडते आहे! 

भारतातील पहिला LNG प्लांट कोणता? / भारतातील पहिला LNG स्टेशन किंवा पंप कोणता?

नागपूर येथील विहीर गावात रिंग रोडवर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने