ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन कसे होतात? || Oscar Award Nominations info Marathi
चित्रपट बघने हे तुम्हाला देखील आवडत असेल. बॉलीवूड सोबत हॉलिवूड फिल्म देखील तुम्हाला आनंद देत असतील. आपण चित्रपटांना इतकी जास्त पसंती देत असतो आणि त्यामुळेच या फिल्म पुरस्कार देखील मिळवतात. चित्रपट सृष्टीतील सर्वात महत्वाचा अवॉर्ड म्हणजे ऑस्कर अवॉर्ड होय. याला चित्रपट सृष्टीमध्ये सर्वात जास्त महत्व आणि प्रसिद्धी आहे. प्रत्येक चित्रपट हा अवॉर्ड मिळवू इच्छित असतो परंतु जो चांगला आणि उत्कृष्ट असतो त्यालाच हा अवॉर्ड मिळू शकतो.
हॉलिवूड सिने सृष्टीमधील हा अवॉर्ड इतरही भाषांमधील चित्रपटांना दिला जातो. त्यामुळे हे जाणणे खूप जास्त महत्वाचे आहे की हा ऑस्कर अवॉर्डसाठी चित्रपटांना कशा प्रकारे नॉमीनेट केले जाते?
ऑस्कर काय आहे? What is an Oscar?
ऑस्कर संपूर्ण जगातील सिनेसृष्टीत असलेला एक प्रसिद्ध आणि मान्यताप्राप्त अवॉर्ड आहे. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात ही 1929 मध्ये झाली. याच पुरस्काराला सुरुवातीच्या काळात अकॅडमी अवॉर्ड म्हणून ओळखले जात असे. ऑस्कर अवॉर्ड फंक्शन मध्ये हॉलीवूड मधील चित्रपटांना बेस्ट परफॉर्मन्स साठी अवॉर्ड दिला जातो. याशिवाय इतर देशांच्या चित्रपटांना अवॉर्ड देण्यासाठी एक वेगळी कॅटेगरी देखील असते. यात विदेशी चित्रपट हे नामांकित होत असतात आणि त्यातून बेस्ट फिल्म चा अवॉर्ड हा दिला जातो.
ऑस्कर पुरस्काराला दरवर्षी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड सायन्स (AMPAS) द्वारा आयोजित केले जाते. या पुरस्काराच्या अंतर्गत बेस्ट ऍक्टर, बेस्ट ऍक्टरेस, बेस्ट मुव्ही, बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट रायटर सारखे खूप अवॉर्ड दिले जातात.
अकॅडमी अवॉर्ड फंक्शन विषयीच्या या मूलभूत माहिती नंतर आता या अवॉर्ड विषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.
पहिले अकॅडमी अवॉर्ड फंक्शन हे 16 मे 1929 रोजी कोलजुर्वेल्ट हॉटेल मध्ये आयोजित केले गेले. हे अवॉर्ड फंक्शन सार्वजनिक नव्हते आणि यात फक्त 270 पाहुणे सामील झाले होते. प्रत्येक पाहुण्याला 5 डॉलर चे तिकीट देखील घ्यावे लागले होते. या कार्यक्रमात जे अवॉर्ड दिले गेले ते 3 महिने आधीच घोषित केले गेले होते. यानंतर पुढील वर्षीपासून अवॉर्डस हे कार्यक्रमाच्या वेळीच घोषित केले जात आहेत.
पहिल्या अकॅडमी अवॉर्डस मध्ये मीडियाला शामिल केलेले नव्हते परंतु दुसऱ्या अकॅडमी अवॉर्ड पासून आजतागायत अकॅडमी अवॉर्ड ला मीडियाच्या माध्यमातून खूप प्रसिद्ध केले गेले.
चित्रपटाला ऑस्कर नामांकनासाठी रुल्स । What are rules to follow
1. चित्रपट हा कमीत कमी 40 मिनिट वेळाचा असायला हवा.
2. चित्रपट हा 35 mm किंवा 70mm प्रिंट चा असायला हवा.किंवा 24 फ्रेम प्रति सेंकंद किंवा 48 फ्रेम प्रति सेकंद प्रोग्रेसिव्ह स्कॅन डिजिटल सिनेमा फॉरमॅट मध्ये असायला हवे. त्याचे रेसोल्युशन हे 1280×720 पेक्षा कमी असायला नकोय.
3. जर कोणी प्रोड्युसर किंवा डिस्ट्रिब्युटर त्याच्या चित्रपटाला ऑस्कर नॉमिनेशन साठी देऊ इच्छित असेल तर त्यांना ऑफिशियल स्क्रीन क्रेडिट फॉर्म हा सबमिट करावा लागतो. हे सर्व फॉर्म अकॅडमी गोळा करते आणि त्यांना रिमाईडर लिस्ट ऑफ एलिजीबल रिलीज लिस्टसाठी सबमिट केले जाते.
4. अकॅडमी अवॉर्ड मधील काही भागांमध्ये केवळ अकॅडमी मधील काही व्यक्तीच वोट देऊ शकतात. म्हणजे बेस्ट डायरेक्टर च्या नामांकनासाठी फक्त डायरेक्टर आणि बेस्ट एडिटर च्या नामांकनासाठी फक्त एडिटर फॉर्म देऊ शकतात.
5. परदेशी फिल्म आणि डॉक्युमेंटरी साठी रुल्स वेगळे आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक ब्रांच मध्ये असलेला स्पेशल स्क्रिनिंग ग्रुप ते काम करत असतो. या ग्रुपचा प्रत्येक मेम्बर हा बेस्ट पिक्चर नॉमिनिज सिलेक्ट करत असतो. बेस्ट पिक्चर साठी कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 नॉमिनिज असायला हवेत.
6. फॉरेन फिल्म नामांकनांना परदेशातुन येणाऱ्या फिल्म च्या लिस्ट मधून सिलेक्ट केले जाते. प्रत्येक विदेशी देश हा एका वर्षात केवळ एकच चित्रपट देऊ शकतो.
ऑस्कर मध्ये कोणत्या चित्रपटाला नामांकन मिळेल आणि कोणती फिल्म अवॉर्ड जिंकेल हे निवडण्याचे काम यांच्या द्वारे केले जाते.
1. Members of Academy of Motion Pictures arts and science
2. Accounting Company Price Water House Coopers
अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्टस् अँड सायन्स यांची 6000 मेम्बर्स ची वोटिंग रिसर्च टीम आहे. ही टीम चित्रपटांना सर्व मापदंडांवर चेक करते. यामध्ये डायरेक्टर आणि ऍक्टर्स शिवाय फिल्म एडिटर, मेकअप आर्टिस्ट, म्युझिशन आणि रायटर्स सारखे मेम्बर्स देखील असतात. फिल्म्स च्या निर्मात्यांना या सर्व टीम मेम्बर्स साठी आपल्या फिल्म चे शो ठेवावे लागतात. याशिवाय स्क्रिनिंग वर वोटर्स ला समाविष्ट करून आणि त्यांना नजरेत चित्रपटाला आणण्यासाठी खूप सारे खर्च देखील करावे लागतात.
चित्रपटाला अवॉर्ड मिळन्यासाठी वोटर्स ची भूमिका यासाठी महत्वाची असते कारण वोटर्स हे वोटिंग च्या वेळी रँकिंग देत असतात. या मतांनुसारच सर्वात जास्त मते मिळवणारी फिल्म ही अवॉर्ड साठी विजेती घोषित केली जाते.
आपल्या चित्रपटाला विजेता बनवण्यासाठी एका फिल्म डायरेक्टर समोर हे आवाहन असते की तो त्या चित्रपटाला कशा प्रकारे प्रमोट करतो आहे जेणेकरून चित्रपट जास्तीत जास्त वोटर्स च्या नजरेत येईल आणि त्यांना ती आवडेल देखील. ज्या चित्रपटाची जास्त स्क्रिनिंग केली जाते तो चित्रपट वोटर्स चे जास्त लक्ष आकर्षित करून जातो. आणि या सर्व प्रक्रियेत आपला चित्रपट टिकून ठेवण्यासाठी डायरेक्टर ला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठे जाऊन तो ऑस्कर अवॉर्ड त्या वर्षी एका फिल्मच्या नावावर होत असतो!
ऑस्कर नामांकनात आलेले भारतीय चित्रपट
1. मदर इंडिया
2. ऍन एन्काऊंटर विथ फेसेस
3. सलाम बाँबे
4. लगान
5. लिटल टेरेरिस्ट
ऑस्कर पुरस्कार जिंकणारे भारतीय
भानू अथईया (कॉस्टयूम डिझाइनर)
सत्यजित रे (फिल्म मेकर)
ए आर रहमान (म्युझिक डायरेक्टर)
गुलजार (रायटर)
रिसुल पुकुट्टी (फिल्म साउंड डिझाइनर)
2019 सालचा ऑस्कर अवॉर्ड म्हणजेच 91 व्या ऑस्कर अवॉर्ड मध्ये विजेते
बेस्ट ऍक्टर- रामी मलेक
बेस्ट ऍक्टरेस - ओलिव्हिआ कॉलमेन
बेस्ट अनिमेटेड फिचर फिल्म- स्पायदर मॅन इनटू द स्पायडरव्हर्स
बेस्ट फॉरेन लँग्वेज - रोमा
बेस्ट पिक्चर - ग्रीन बुक
बेस्ट डायरेक्टर- अलफोनसो कुरोन
