गरीब कामवाली बनली कलेक्टर || Marathi Goshti || Marathi Moral Stories

गरीब कामवाली बनली कलेक्टर || Marathi Goshti || Marathi Moral Stories

रश्मी साधारण 20 ते 22 वर्षांची असेल. 2 वर्षांपूर्वी एका बस दुर्घटनेत तिच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता. तिचं आता या जगात आपलं अस कोणीही नव्हतं. रश्मीला शिक्षणाची खुप आवड होती. तिच्या वडिलांना तिला कलेकटर बनवायचे होते. त्यांनी रश्मीच्या शिक्षणात काही कमी पडू दिली नाही. परंतु त्यांच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे रश्मीची सगळी स्वप्न अर्धवट राहिली.

गरीब कामवाली बनली कलेक्टर || Marathi Goshti || Marathi Moral Stories

 घरात जे काही साठवलेले पैसे होते त्यातून रश्मीने तिचे कॉलेज चे शिक्षण कसे बसे पूर्ण केले. तिच्या मनात अजूनही कलेक्टर बनण्याचे स्वप्न डोकावत होते. पण पैशांची अडचण तिच्यासमोर आ वासून उभी होती. तरीही रश्मीने हार मानली नाही, आपल्या शिक्षणाबरोबरच तिने स्वयंपाक आणि भांडी घासण्याचे काम सुरू केले. 

एकदा तिच्या मैत्रिणीने तिला विचारले की अग रश्मी तू शिकून एव्हडी पदवीधर होऊन धुनी भांडी करण्याचे काम करणार आहे का? यावर रश्मी ने उत्तर दिले की कुठलेही काम हे छोटं किंवा मोठं नसत. आणि तसही हे काम मी माझं जीवन जगण्यासाठी नाही तर माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत आहे. 

रश्मी ने काम सुरू केले. दिवसभर मेहनत करून काम करायची आणि संध्याकाळी घरी येऊन ती अभ्यास करायची. ती जिथे काम करायला जायची तिथून तिचे घर हे 5 किलोमीटर अंतरावर होते. भराभर चालून देखील तिला घरी पोहोचायला रात्रीचे 9 वाजायचे. दमलेली असताना देखील ती कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायची आणि वाचता वाचताच बिचारी झोपून जायची. ती इतकी जास्त मेहनत करायची तरी देखील तिची कमाई इतकी होऊ शकत नव्हती की ती तिची स्वतःची अभ्यासाची सर्व काही पुस्तके घेऊ शकेल, क्लासेस लावणे तर खूप दूरची गोष्ट होती. तरीही रश्मी कधीच माघारी फिरली नाही. ज्या घरात रश्मी काम करायची त्या घरातील मुलगा देखील यूपीएससी ची तयारी करत होता. 

एक दिवस काम करत असताना रश्मीने तिच्या मालकिणीला विचारले की, "ताईसाहेब, अमित दादा देखील  UPSC ची तयारी करतोय ना?" यावर मालकीण म्हणाली की "हो पण तुला काय करायचे आहे? तू तुझं काम कर. आली मोठी चौकशी करणारी!"

मालकीण बाईंचे बोलणे ऐकून रश्मीने पटापट आपली कामे केली आणि घरी जायला निघाली. तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या, "उद्या जरा लवकर ये ग, घरी पाहुणे येणार आहेत. त्याचा स्वयंपाक करावा लागेल. त्याचे जे काही वाढीव पैसे होतील ते मी तुला देईल." यावर रश्मी म्हणाली की " ताईसाहेब, मला पैसे नकोय. पण मला जर अमित दादाची UPSC ची जुनी पुस्तके मिळाली तर खूप उपकार होतील." तेव्हाच अमित तिथे येतो. रश्मीची शेवटची वाक्ये त्याच्या कानी पडतात. यावर अमित तिची चेष्टा करत म्हणतो की, "तुझी लायकी तरी आहे का? तुला माहिती तरी आहे का UPSC म्हणजे काय? भल्याभल्यांचे डोळे पांढरे होतात पांढरे! तुझ्यासारखे लोक जर कलेक्टर झाले तर देशाचं कल्याणच झालं समजायचे." अमितच्या बोलण्यावर त्याची आई देखील मोठ्याने हसू लागली. रश्मी बिचारी दुःखी मनाने तिथून बाहेर पडली. त्याच्या बोलण्याने ती दुःखी झाली मात्र तिने हिंमत मात्र हरली नाही. रश्मी स्वतःलाच म्हणाली की तू कितीही माझी खिल्ली उडव, मात्र मी माझे स्वप्न पूर्ण करणारच! आजपासून मी दहा दहा तास अभ्यास करेल, आता शांतपणे मी तेव्हाच झोपेल जेव्हा मी माझे स्वप्न पूर्ण करेल. मग हे स्वप्न पूर्ण करता करता मला मरण आले तरी चालेल. 

रश्मीने ठरवले तर होते परंतु पुस्तकांची अडचण मात्र अजूनही तशीच होती. तिने तिकडे सगळ्या पाहुण्यांचा स्वयंपाक केला आणि ते सर्व जेवून गेल्यानंतर ती मालकीण बाई कडे गेली. ती म्हणाली की, "ताईसाहेब सर्व काम झाले आहे, तुम्ही म्हणाला होता ना की मला जास्त पैसे द्याल. मला जर आत्ता ते पैसे मिळाले तर मी काही पुस्तके विकत घेईल." मालकीण बाईंचे आता सगळे काम झाले होते त्यामुळे आता त्यांच्या मनात कपटी विचात येऊ लागले. त्या म्हणाल्या, "अग तुला पुस्तकेच पाहिजेत ना, तू अमितची पुस्तके घेऊन जा. वाचून झाली की दे परत आणून." रश्मीला हेच तर हवे होते. तिने लगेच होकार दिला. मालकीण बाई ने अमितला बोलावले आणि त्याला म्हणाल्या की, "अमित, हिला जरा काही तुझी पुस्तके दे बाबा! दोन तीन दिवसात वाचून झाली की देईल ती परत आणून." आईच्या सांगण्यावरून अमितने काही पुस्तके आणून रश्मीच्या हातात दिली. त्यानंतर हे असच सतत चालू राहिलं. 

मालकीण बाई रश्मी कडून हवं तेव्हड काम करून घ्यायच्या आणि त्याच्या बदल्यात तिला काही पुस्तके वाचायला मिळायची. मालकीण बाई ना यात त्यांचा फायदा दिसत होता परंतु रश्मी ला पुस्तके मिळत असल्याने ती आनंदात होती. आता ती अजूनच उत्साहाने अभ्यास करू लागली. अमितच्या आता त्या धूळखात पडलेल्या पुस्तकांचे देखील नशीब उजळले होते. एक दिवस रश्मी काम करत असताना मालकीण बाईनि रश्मीला विचारले की ,"काय ग रश्मी, तुझा अभ्यास कसा चाललाय? आता तर तुला पुस्तके सुद्धा मिळताय." रश्मी काही बोलणार इतक्यात अमित तिथे येतो आणि म्हणतो, " अग ही काय अभ्यास करणार? सगळा दिवस तर इथेच पडलेली असते. अभ्यास कसला डोंबल्याचा करतीये! काय ग रश्मी, तुला माहीत तरी आहेत का या परीक्षेत पेपर किती असतात?" यावर रश्मी म्हणते की, " हो दादा, मला माहीत आहे यात किती पेपर असतात. माझी तयारी दोन्ही पेपर साठी झालेली आहे. माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे की खजुराहो मंदिर कोणाच्या शासन काळात निर्माण झाले? "

अमितची तर हवाच गेली, त्याला या प्रश्नाचे उत्तरच माहीत नव्हते. यावर रश्मी म्हणते, "काय झाले दादा, हा तर खूपच साधा प्रश्न आहे. तुला याचे उत्तर माहीत नाही का?" अमित काही न बोलताच तिथून गुपचूप निघून जातो. आज रश्मीने तिच्या इतक्या दिवस झालेल्या अपमानाचे सडेतोड उत्तर दिले होते. रश्मी मन लावून आपला अभ्यास करत होती. परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम तिने दोन महिने आधीच संपवला होता. दिलेल्या वेळात पूर्व परीक्षा पार पडली आणि रश्मी ने यात उत्तम यश मिळविले. तिकडे अमित खूप प्रयत्न करून देखील या परीक्षेत यशस्वी झाला नाही. रश्मीने या परीक्षेत मिळालेले यश कोणालाच सांगितले नाही. जोपर्यंत ती मुलाखतीत यशस्वी होणार नाही तोपर्यंत ती कोणालाच सांगणार नाही असा निर्धार तिने केला. रश्मी ने खूप मेहनत घेत मुख्य परीक्षा देखील पार पाडली. आता फक्त मुलाखत देणे बाकी होते.

मुलाखतीच्या एक दिवस आधी मालकीण बाई रश्मीला सांगतात की, " हे बघ रश्मी, उद्या अमितचा वाढदिवस आहे. खूप लोक येणार आहेत त्यामुळे तू जरा उद्या लवकरच ये."  यावर रश्मी म्हणते की, " ताईसाहेब उद्या माझे येणे जरा अवघड आहे. उद्या माझी शेवटची परीक्षा आहे." मालकीण बाई यावर प्रतिउत्तर देतात की, " आली मोठी परीक्षा देणारी, जेव्हढ सांगितले तेव्हड कर. जर उद्या तू आली नाहीस तर परत तुला इंडे फिरकू सुद्धा देणार नाही." 

रश्मीने मालकीण बाईंचे ऐकले नाही आणि ती ठरलेल्या वेळेप्रमाणे तू मुलाखत द्यायला गेली. मालकीण बाईंनी त्याच दिवशी दुसरी कामवाली ठेवली. "येऊदे त्या शहाणीला पगार मागायला, असं सुनावते ना की आयुष्यभर लक्षात राहील." अस त्या स्वतःशीच पुटपुटल्या. पण रश्मी त्या दिवसानंतर पुन्हा कधीच त्या घरी गेली नाही. देवाने तिच्या नशिबात दुसरेच काहीतरी लिहिलेले होते. इकडे मालकीणबाई तिला सूनवण्यासाठी तिची वाट बघत राहिल्या. तिकडे UPSC च्या परीक्षेचा निकाल आला. रश्मी 65 व्या क्रमांकाने पास तर झालीच आणि त्यामुळे टॉप 100 मध्ये तिचे नाव होते. 

शहरातल्या सगळ्या वृत्तपत्रात तिचे कौतुक होत होते. अमित आणि त्याच्या आईने तिचा फोटो आणि कौतुक पेपर मध्ये वाचले तेव्हा ते आ वासून बघतच राहिले. काल पर्यंत त्यांच्या घरी काम करत असणाऱ्या एका मुलीने आज ती जागा मिळवली होती जिच्या भोवती अमित आणि त्यांच्या आईसारखे लोक जवळपास सुद्धा फिरकू शकत नाहीत. 

तिकडे रश्मी आज खूप खुश होती कारण तिच्या मेहनतीने आज तिचे आणि तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले होते. तिने आज अमित आणि त्याच्या आईसारख्या लोकांना जे एखाद्याला बघून त्याची कुवत ठरवतात त्यांना चांगला धडा शिकवला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने