Google Free Learn & Earn Program || गुगलचा कमवा आणि शिका प्रोग्रॅम

Google Free Learn & Earn Program || गुगलचा कमवा आणि शिका प्रोग्रॅम


आज गुगल कडून एक जबरदस्त अपडेट घेऊन आलो आहे ती म्हणजे लर्ण अँड अर्ण प्रोग्रॅम विषयी! गुगल ने त्यांची एक इंटर्नशिप लॉंच केली आहे आणि त्यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. महत्वाचे म्हणजे हा शिका आणि कमवा असा प्रोग्रॅम असून यातून तुम्हाला खूप अनुभव मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे आणि त्यासोबत महिन्याला काही मानधन देखील मिळणार आहे. तुम्हाला पगार देखील मिळतो आहे त्यामुळे ज्या कोणाला पुढे जाऊन मोठ्या कंपनी सोबत काम करायचे आहे ते लोक या संधीचा नक्कीच फायदा घेऊ शकता. 

Google Free Learn & Earn Program || गुगलचा कमवा आणि शिका प्रोग्रॅम

ही एक इंटर्नशिप नसून कदाचित तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट देखील बनून जाईल. त्यामुळे तुम्हाला ही इंटर्नशिप मिळाली तर खूप काही बदलून जाईल. 

इतक्या वेळेचा मी तुम्हाला इंटर्नशिप म्हणतोय पण ही गुगलने apperenticeships म्हणून लाँच केली आहे. यात वरच तुम्हाला लिहिलेले दिसेल की हा गुगल कडून तुम्हाला दिला जाणार स्टडी आणि अर्निंग साठी प्रोग्रॅम आहे. 

आपल्याकडे विद्यार्थी त्या प्रकारे शिक्षण घेत नाहीयेत परंतु तुमच्याकडे कोणतीही पदवी म्हणजे बीए, बीकॉम, बीएससी, एमबीए किंवा इतरही असेल तरी देखील तुम्ही इथे apply करू शकता. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी फ्री कोर्सेस देखील मिळतात त्यांचा देखील उपयोग तुम्ही इथे करून घेऊ शकता. 

मागील दोन वर्षांपासून हा प्रोग्रॅम सुरू असून याला भारतातून अनेक मुलं apply करत असतात. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल आणि दिलेल्या FAQ विभागात तुमच्या प्रश्नांची देखील उत्तरे मिळतील. 


Eligibility Criteria-

तुमचे कुठल्याही क्षेत्रातून पदवी झालेली असेल तरी तुम्ही इथे apply करू शकता.

तुमचा अकॅडमीक परफॉर्मन्स हा स्ट्रॉंग असेल तरी देखील तुम्ही इथे apply करू शकता. 

तुम्हाला इंग्रजी लिहिता आणि वाचता यायला हवे. त्या देशात इंग्रजी नसेल तर तुम्हाला लोकल भाषा आली पाहिजे. 


How to Apply?

तुम्हाला वेबसाईटवर जाऊन resume अपलोड करायचा आहे. प्रोफेशनल बायोडाटा कसा बनवावा यावर आम्ही एक लेख लवकरच घेऊन येतो आहे. प्रोफेशनल बायोडाटा ही सध्या काळाची गरज आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा बायोडाटा बनवणे खूप गरजेचे आहे.


Post through Google Apprenticeship

तुम्हाला इथे दोन प्रकारच्या पोस्ट मिळताय,


प्रोजेक्ट् मॅनेजमेंट Apprenticeship - 

सुरुवात सप्टेंबर मध्ये 


LAst Date -

14 जुलै पर्यंत तुम्ही Apply करू शकता.

Minimum Qualification-

कोणतीही डिग्री

प्रोजेक्ट् मॅनेजमेंट चा अनुभव


Data Analytics Apprenticeship- 

सुरुवात सप्टेंबर पासून होणार असून ही हैद्राबाद मध्ये आहे.

data science मध्ये भविष्यात फार मोठ्या संधी आहेत त्यामुळे तुम्हाला त्याविषयी निगडित फ्री कोर्सेस देखील आम्ही घेऊन येणार आहोत. गुगल मध्ये तुम्हाला संधी जर मिळत असेल ना मग ती कुठेही असो लगेच तयार व्हा कारण याशिवाय मोठी आणि सुवर्णसंधी कोणतीही नाहीये.


Last Date of Application-

14 जुलै 2021 च्या आधी तुम्हाला यासाठी apply करायचे आहे. 

Minimum Qualification- (Special For Data Analysis) 

तुम्हाला त्या क्षेत्राशी निगडित डिग्री किंवा त्या क्षेत्राशी निगडित अनुभव असायला हवा.

एक वर्षापेक्षा कमी Data Analytics मध्ये अनुभव असायला हवा.

स्प्रेडशीट्स आणि इतर टूल्स मध्ये अनुभव असायला हवा.


Click Here To Apply for Google Apprenticeship

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने