देवबाग महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ | Devbag Tarkarli Tourist Place Marathi

देवबाग महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ | Devbag Tarkarli Tourist Place Marathi

देवबाग हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. देवबाग ही महाराष्ट्राच्या कोकण परिसरातील एक छोटेसे गाव असून खाडी आणि समुद्राच्या अगदी मधोमध वसलेले आहे. निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेले हे ठिकाण महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असते. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.

Devbag Tarkarli Tourist Place Marathi

आज आपण या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील देवबाग या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया.

देवबाग तारकर्ली पर्यटन स्थळ माहिती (Devbag Tourist Place information in Marathi)

मित्रांनो देवबाग हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पश्चिम किनारपट्टीवर वसलेले एक गाव आहे. देवबाग या ठिकाणाला देवाची भूमी म्हणूनही ओळखले जाते. तारकर्ली येथील मच्छीमार समाजाचे गाव हे देवबागच आहे. हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारकर्ली जवळ आहे. 

पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असलेला देवबाग हा समुद्रकिनारा एक लोकप्रिय बीच म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील अनेक पर्यटक वारंवार या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. देवबाग हे महाराष्ट्रातील असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्याला सुट्टीचा मनसोक्त आनंद घेता येईल. 

देवबाग पक्षी निरीक्षण स्थळ (Devbag Bird Watching Place)

त्याचबरोबर येथे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये स्थलांतरित आणि स्थानिक पक्षांचे कळप येथे येत असल्याने देवबाग हे ठिकाण पक्षी निरीक्षणासाठी ही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असणारे स्वादिष्ट सी फूड आणि स्थानिक रेस्टॉरंट हे देखील देवबागची आणखी शोभा वाढवतात. देवबाग हे ठिकाण त्याच्या निर्मळ आणि मूळ नैसर्गिकते सह लांब समुद्रकिनाऱ्यासाठी ही प्रसिद्ध आहे. 

देवबाग मधील प्रसिद्ध स्थळे (Devbag Tourist Places to visit)

देवबाग जवळील समुद्र सफारी मध्ये आपण डॉल्फिन पॉईंट, गोल्डन रॉक, संगम आणि सुनामी आयर्लंड हे ठिकाण पाहू शकतो. 

संगम पॉईंट या ठिकाणी करली नदी आणि अरबी समुद्राचा संगम होतो. म्हणूनच याला संगम पॉईंट असे नाव देण्यात आले आहे. डॉल्फिन पॉईंट या ठिकाणी आपल्याला सहसा डॉल्फिनचे दर्शन घडतेच. गोल्डन रॉक हे ठिकाण संगम पोइंटच्या अगदी जवळ आहे. या ठिकाणी सूर्यप्रकाश पडल्यावर ते गोल्डन दिसतात म्हणून याला गोल्डन रॉक असे म्हटले जाते. 

देवबाग ला कसे पोहोचाल? (How to reach Devbag in Marathi?)

मित्रांनो मुंबई पुणे आणि इतर अनेक शहरांपासून देवबाग या ठिकाणी ट्रेनने किंवा रस्त्याने पोहोचता येते. मुंबईवरून पनवेल कोलाड माणगाव महाड चिपळूण रत्नागिरी राजापूर कणकवली मालवण या मार्गाने देवबागला पोहोचता येते. तर पुण्यावरून वाई सातारा कराड कोल्हापूर कणकवली मालवणी या मार्गाने देवबागला पोहोचता येते. देवबागला जाण्यासाठी कुडाळ हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. कुडाळपासून देवबाग हे अंतर सुमारे 34 किलोमीटर इतकी आहे.

देवबाग हे ठिकाण पुणे शहरापासून 395 किलोमीटर तर मुंबईपासून 515 किलोमीटर इतके अंतरावर आहे. तर मित्रांनो आज आपण देवबाग या ठिकाणची माहिती जाणून घेतलेली आहे. देवबाग या ठिकाणाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने