गुगल जेमिनी एआय काय आहे ? What is Google Gemini AI in Marathi

गुगल जेमिनी एआय काय आहे ? What is Google Gemini AI in Marathi

What is Google Gemini AI : काही काळापूर्वी गुगल ने आपले पाऊल हे bard च्या माध्यमातून Artificial Intelligence क्षेत्रात टाकले होते. आता त्याला अधिक बळकटी देण्यासाठी गुगलने Gemini AI देखील लाँच केले आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण सविस्तर पणे जाणून घेणार आहोत की Google Gemini AI नक्की काय आहे आणि Google Gemini AI हे ChatGPT साठी कशा प्रकारे प्रतिस्पर्धी बनू शकते. 

Google Gemini AI in marathi

Google Gemini AI हे असे AI वर आधारित मॉडेल आहे जे अशा प्रकारे ट्रेन केले गेलेले आहे की जेणेकरून ते पूर्णपणे माणसासारख वागू शकेल. गुगल ने आता सध्या हे Gemini AI हे 3 वेगवेगळ्या प्रकाराने लाँच केले आहे. हे 3 व्हर्जन Advanced Language Processing वर आधारित आहेत. 

Google Gemini AI चे Pro व्हर्जन (संस्करण) हे Google च्या Bard या chatbot सोबत integrated आहे. तुम्हाला हे गुगल च्या लेटेस्ट pixel फोन मध्ये वापरता येते. 

Google ने Bard नंतर लगेचच Gemini AI लाँच करत हे सांगून दिले आहे की AI हे असे क्षेत्र आहे ज्यात जर आपण मागे राहिलो तर कायमच मागे असू. गुगल ला देखील हे कळून चुकले आहे की पुढील येणारा काळ हा पूर्णपणे आर्टिफिशिल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा असणार आहे. तुम्हाला याशिवाय गुगल जेमिनी एआय विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख नक्की वाचा.

Gemini AI काय आहे? What is Google Gemini AI?

GEMINI AI हे गुगल ने स्वतः लाँच केलेले एक सक्षम आणि बलवान असे Artificial Intelligence मॉडेल आहे. इतर AI मॉडेल्स च्या तुलनेत गुगल जेमिनी एआय हे खूप जास्त सक्षम असे मॉडेल असून यात फक्त text नाही तर images, videos आणि audios समजून त्यावर प्रतिक्रिया देण्याची क्षमता आहे.

Gemini AI हे फक्त text वर आधारित मॉडेल नसल्याने यामधे multimodal talent आहे. त्यामुळे हे अधिकाधिक कॉम्प्लेक्स गोष्टी देखील अगदी सहज पूर्ण करू शकते. यामध्ये अनेक व्हिडिओ मध्ये असे दिसते की जेमिनी ai हे कठीण गणिताचे प्रश्न सहजपणे सोडवत आहे. यासोबतच Gemini AI ची समजून घेण्याची क्षमता ही अधिक तीव्र आहे आणि त्यामुळे कठीण प्रोग्रामिंग भाषांमध्ये देखील हे सहजपणे कोड लिहू शकते. Gemini AI जो कोड लिहून देते तो कोड एक high quality कोड असतो. 

Google Gemini AI आणि इतर AI टूल्स (Google Gemini AI vs Other AI tools)

इतर अनेक AI models आपण पाहिले तर त्यांमध्ये आपल्याला खूप लिमिटेड फीचर्स मिळतातं म्हणजे जर आपण टेक्स्ट bot सोबत बोलत असू आणि आपल्याला image साठी काहीतरी हवं आहे तर तो textbot आपल्याला ते देऊ शकत नाही. अशाच प्रकारे कोणताही AI tool हा multimodal नाहीये. मात्र आज Google Gemini AI हे नवीन multimodal AI tool बाजारात आले असून Text, Image , video आणि audio हे सर्व एकाच ठिकाणी आता करता येणार आहे. 

जेव्हा सर्व काही एका ठिकाणी integrated असते तेव्हा आपल्याला अधिकाधिक human behaviour मिळण्याची शक्यता असते. 

Google ने स्वतः जारी केलेल्या व्हिडिओ मध्ये असे म्हणाले आहे की Google Gemini AI हे इतर AI मॉडेल्स च्या तुलनेत Understanding, Summarising, Reasoning आणि coding planning या बाबतीत अग्रेसर आहे. Gemini AI हे सध्या गुगल पिक्सेल 8 सोबत आणि गुगल bard chatbot सोबत integrate केलेले आहे.

तुम्हाला Gemini AI लवकरच इतरही गुगल सर्व्हिस सोबत बघायला मिळेल. 

Gemini AI कोणी बनवले? Who Created Gemini AI?

Google आणि alphabet यांनी मिळून जेमिनी ai बनविले आहे. Alphabet विषयी तुम्हाला जर माहिती नसेल तर ही गुगल ची पालक कंपनी आहे. 

Google मध्ये Google Deepmind नावाने एक विभाग आहे. याच विभागाचे Gemini AI प्रोजेक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात योगदान आहे. 

Google Deepmind काय आहे? What is Google Deepmind in Marathi?

Google Deepmind ही गुगल मधील एक छोटी कंपनी आहे. देमिस हसाबिस (Demis Hassabis) हे google Deepmind चे co Founder आणि CEO आहेत. ही गुगलची शाखा पूर्णपणे AI वर फोकस करत असून त्याविषयी त्यांच्याकडून नवनवीन आयडिया बाहेर येत आहेत.

Gemini AI चे विविध version - Different Version Of Gemini AI

गुगल च्या अनुसार जेमिनी एआय हे असे मॉडेल आहे जे कुठल्याही प्लॅटफॉर्म वर चालू शकेल. त्यासाठी मग तुमच्याकडे गुगल डिव्हाईस हवा ही अट नाही. 

सर्व प्लॅटफॉर्म वर गुगल जेमिनी एआय चालावे यासाठी गुगल जेमिनी एआय हे विविध version मध्ये लाँच करण्यात आलेले आहे. त्याविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे,

1. Gemini AI Nano

Gemini AI Nano हे version डिझाईन केले गेले आहे स्मार्टफोन्स वर चालण्यासाठी. सध्या मुख्यतः Google pixel 8 वर जेमिनी ai चालण्यासाठी हे version काढलेले आहे. On device कार्य पूर्ण करण्यासाठी या version ला अधिक efficient बनविण्यात आलेले आहे. 

या version द्वारे आपण आपण कोणत्याही प्रकारे बाहेरील सर्व्हर सोबत कनेक्ट न करता सरळ काही कार्य करू शकतो जसे की text summarize करणे किंवा chat मध्येच reply सुचविणे. 

2. Gemini Pro

Gemini Pro हे version गुगल च्या आधीच्या ai tool Bard Chatbot ला अधिक सक्षम बनविण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. हे version गुगल data centers ला चालते. जलद गतीने कार्य करण्यासाठी आणि अधिकाधिक अवघड आणि गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यासाठी हे पूर्णपणे सक्षम आहे.

3. Gemini Ultra

Gemini Ultra हे version अजून उपलब्ध झालेले नाही. आशा आहे की नवीन वर्षात हे आपल्यासाठी उपलब्ध असेल. गुगल अनुसार gemini ultra हे आजपर्यंतचे सर्वात जास्त कार्यशील आणि बेस्ट मॉडेल असेल. Ultra टेस्ट होत असताना त्याने अनेक आधी असलेले बेंचमार्क तोडले आहेत. हे बेंचमार्क तुम्हाला llm म्हणजेच Large Language Model साठी रिसर्च करत असताना उपयोगात आणले जातात.

Gemini Ultra अधिकाधिक गुंतागुंतीचे कार्य करण्यासाठी बनविण्यात आलेले आहे. शेवटी फायनल रिलीज करण्याधी गुगल कडून अनेक चेक्स केले जात आहेत. 

आपण Gemini AI वापरू शकतो का? Can we use Gemini AI?

GEMINI AI हे आपण सध्या वापरू शकतो. तुम्हाला हे  Gemini AI Google च्या काही प्रोडक्ट मध्ये उपलब्ध आहे.. आपण Bard Chatbot मध्ये gemini AI वापरू शकतो. गुगल पुढील काळात गुगलच्या इतर काही product मध्ये gemini AI वापरण्याचा प्रयत्न करत आहे.

Developer साठी Gemini AI API कुठे मिळेल? Where to get Gemini AI API for Developers?

डिसेंबर 2023 पासून गुगल Gemini AI साठी तुम्हाला गुगल क्लाउड आणि व्हर्टेक्स ai वर Gemini AI साठी api मिळेल. Developers तिथून api वापरू शकतात.

अँड्रॉइड developers साठी सध्या Gemini nano via aicore इथे API उपलब्ध आहेत. 

GEMINI PRO ACCESS कसे करणार? How to access Gemini Pro Ai?

Gemini Pro हे सध्या bard chatbot द्वारे मोफत मध्ये सर्वांना accessible आहे. सर्व लोक त्याचा वापर करू शकतात. त्याचा वापर सध्या फक्त chat करताना अनुभव अधिकाधिक चांगला करण्यासाठी केला जातो आहे. 

Gemini AI integrated with bard Chatbot वापरण्यासाठी खालील स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील,

Step 1: सर्वात आधी तुमच्या ब्राऊझर मध्ये bard च्या वेबसाईट वर तुम्हाला जावे लागेल. 

Step 2: गुगल अकाऊंट च्या माध्यमातून तुम्हाला bard वेबसाईट वर login करायचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे गुगल खाते असणे आवश्यक आहे.

Step 3: एकदा तुम्ही लॉगिन केले की मग bard मध्येच तुम्हाला Gemini AI चा अनुभव घेता येईल. आता तुम्हाला जुन्या bard पेक्षा अधिकाधिक चांगले निर्णय समोर बघता येतील. 

Gemini AI किती देशांमध्ये उपलब्ध आहे? Gemini AI is available in how many countries?

सध्या गुगल ने gemini AI जवळपास 170 हून अधिक देशांमध्ये लाँच केले आहे. सध्या हे अशाच देशांमध्ये उपलब्ध आहे जिथे इंग्रजी भाषेचा वापर केला जातो.

FAQ

GEMINI AI हे मोफत वापरता येते का?

हो, जेमिनी AI हे आपल्याला मोफत वापरता येते. त्यासाठी सध्या कुठल्याही प्रकारे गुगल चार्ज लावत नाही.

GEMINI AI हे कोणी बनविले आहे?

GEMINI AI हे गुगल ने बनविलेले टूल असून त्यातील Google Deepmind या कंपनीचे योगदान मोलाचे आहे.

निष्कर्ष

तुम्हाला हे समजले असेल की Google Gemini AI नक्की काय आहे आणि याचा वापर आपण कशाप्रकारे करू शकतो. Gemini AI हे वापरण्यासाठी मोफत असल्याने त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने