तृप्ती देसाई मराठी बायोग्राफी || Trupti Desai Biography in Marathi

 तृप्ती देसाई मराठी बायोग्राफी || Trupti Desai Biography in Marathi 

तृप्ती देसाई यांची ओळख – Trupti Desai Introduction 

आज आपण बिग बॉसच्या घरातील अशा सदस्या विषयी जाणून घेणार आहोत की ज्यांचं नाव आपल्या कुणालाच नवीन नाही. ज्यांचं नाव कायम कुठे ना कुठे चर्चेत असतं. जो सदस्य बिग बॉसच्या घरात अत्यंत शांत वाटतो तो बाहेर त्याच्या दहापट आक्रमक आहे ती व्यक्ती म्हणजे महिलांच्या बाबतीत कोणतीही समस्या असो ,महिलांवर कुठे अन्याय होत असो ,महिलांच्या न्याय हक्काचा प्रश्न असो, महिलांचा छळ होत असो ,या सर्व बाबतीत आपल्याला कुठे ना कुठे कानावर एक नाव पडतं ते म्हणजे तृप्ती ताई देसाई.
आज आपण तृप्ती ताई देसाई यांचे बायोग्राफी जाणून घेणार आहोत तसेच कुठले ना कुठले कॉन्ट्रोवर्सी मध्ये तृप्ती त्यांची नाव आपल्याला दिसत असते. आत्ताच बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी  हेमांगी कवी यांच्या सोबत तृप्ती ताई यांची कॉन्ट्रोवर्सी झालेली होती. तेव्हा देखील ते प्रकरण देखील फार चर्चेत होतं.

 तृप्ती ताई त्यांच्या आयुष्यात भरपूर असे कठीण प्रसंग आले. अगदी बालपणीपासून ते आत्तापर्यंत त्यांच्यावर जेवढे जेवढे संकटे आले त्या संकटांचा त्यांनी अत्यंत खंबीरपणे आणि अत्यंत ठामपणे त्या संकटांना तोंड दिले. आजच्या आपल्यासारख्या तरुण पिढीला तरुणांना, तरुणांईना तसेच समाजाला देखील त्यांच्याकडून घेण्यासारखे भरपूर काही गोष्टी आहेत त्या आपण नक्कीच त्यांच्याकडून घेतल्या पाहिजे. तृप्ती ताई त्यांच्या डेरिंगला एकदम सलाम आहे.आज आपण जाणून घेणार आहोत ज्या की एक राजकारणी आहेत, एक समाजसेविका आहेत, तसेच त्या एक आंदोलन कर देखील आहेत अशा आपल्या तृप्ती देसाई यांच्या विषयी.
 तृप्ती ताई देसाई यांच्या संपूर्ण बाल पासून बालपणापासून ते आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरात जाण्यापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. तृप्ती ताई च आयुष हे भरपूर अशा आंदोलनांनी भरलेलं होतं त्यापैकी काही आंदोलनांवर आपण छाप टाकणार आहोत, जे पूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर देखील गाजलेले आहेत.

तृप्ती देसाई   मराठी बायोग्राफी || Trupti Desai Biography in Marathi

तृप्ती देसाई यांचा जन्म आणि शिक्षण – Birth and Education of Trupti Desai 

तृप्ती देसाई यांचा जन्म 12 डिसेंबर 1985 रोजी कर्नाटक राज्यातील निपाणी या तालुक्यात झाला. निपाणी हा तालुका महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या बॉर्डर वर आहे. तसेच तृप्ती देसाई यांच्या वडिलांचे नाव हे दत्तात्रय नरसिंह शिंदे असे आहे, व त्यांच्या आईचे नाव हे संजीवनी शिंदे आहे. तृप्ती यांना छोटी बहीण देखील आहे व तिचं नाव तेजश्री शिंदे असे आहे. तृप्ती ताई या अवग्या आठ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या संपूर्ण परिवाराने कर्नाटकातील निपाणी हे गाव सोडून कोल्हापुरात स्थायिक होण्याचे ठरवले.
 आपले शालेय शिक्षण हे कोल्हापुरात पूर्ण केल्यानंतर तृप्ती ताईंनी होम सायन्स चे शिक्षण हे पुण्यातील श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरे वुमन्स युनिव्हर्सिटी मध्ये दाखला घेतला. परंतु आपल्या पारिवारिक समस्यांमुळे त्यांनी आपले शिक्षण हे मधूनच अर्धवट सोडले.

तृप्ती देसाई यांचे लग्न - Marriage of Tripti Desai

तृप्ती देसाई यांनी 2006 झाले प्रशांत देसाई यांच्याशी लग्न गाठ बांधली. प्रशांत आणि तृप्ती यांना एक मुलगा देखील आहे व त्यांचे नाव योगीराज देसाई असे आहे. तृप्ती व त्यांचा परिवार हे अध्यात्मिक गुरु गगनगिरी महाराज कोल्हापूर यांचे अत्यंत निस्सीम भक्त आहेत व त्यांचे साधक आहेत.

तृप्ती देसाई यांची सामाजिक कार्याची सुरुवात - The beginning of Tripti Desai's social work

तृप्ती ताई या 2003 सालापासून म्हणजेच जेव्हा त्या शाळेत दहावीला होता तेव्हापासूनच सामाजिक चळवळीचा एक भाग आहेत व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असत.त्या तेव्हा क्रांतिवीर झोपडी विकास संघ यांच्यामार्फत समाजसेवा करत होत्या. दुर्गम झोपडपट्टी भागात व दुर्गम लोक भागात जाऊन तेथील नागरिकांना रेशन कार्ड पुरवणे ,बेरोजगारी विषयी मार्गदर्शन करणे, पोलीस केस असो किंवा इतर वेगवेगळ्या लीगल गोष्टी असो याविषयी मदत करणे व मार्गदर्शन करणे, एवढे सामाजिक कार्य ते त्यावेळी पासून करत होत्या.

तृप्ती देसाई यांचे अजित को-ऑपरेटिव्ह बँक आंदोलन - Tripti Desai's Ajit Co-operative Bank Movement

तृप्ती ताई या खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात तेव्हा आल्या जेव्हा त्यांनी 2007 साले अजित को-ऑपरेटिव्ह बँक आणि त्यातील चेअरमन विरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन केले .या बँकेत सुमारे 35 हजार लोकांच्या ठेवी होत्या आणि या ठेवींची टोटल अमाऊंट ही 50 कोटी रुपये एवढी होती. जेव्हा ती बुडीत झालेली होती. आणि याच भ्रष्टाचाराविरुद्ध तृप्ती देसाई यांनी अजित बँक संघर्ष समितीची स्थापना केली होती.जवळजवळ चार वर्षाच्या संघर्षानंतर तृप्ती ताईंनी कोर्टामार्फत 29000 लोकांचे पैसे मिळवून दिले होते. त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रभर पाठिंबा मिळत होता आणि त्यांच्या या आंदोलनाला जेव्हा विजयाचे रूप प्राप्त झाले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. 

अजित बँकच्या यशस्वी आंदोलनं नंतर भरपूर स्तरातून लोक तृप्ती  ताईंना जोडत गेले. व यानंतर 2010 साली तृप्ती देसाई यांनी भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशन ची स्थापना केली. आज जवळजवळ पाच ते सात हजार लोक या संस्थेचे ऍक्टिव्ह सदस्य आहेत .तृप्ती ताई यांच्यातील नेतृत्व कौशल्य तत्कालीन काँग्रेसच्या मंत्र्यांनी ओळखले व 2012 साली तृप्ती ताईंना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची ऑफर दिली. तृप्ती ताईंनी बालाजी नगर वार्ड मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला.

तृप्ती देसाई यांचे शनिशिंगणापूर चे आंदोलन - Tripti Desai's agitation of Shanishinganapur

 2016 सालचे तृप्ती देसाई चे शनिशिंगणापूरचे आंदोलन हे खूप गाजले होते .शनि देवाचे पूजेचा मान हा फक्त पुरुषांनाच का महिलांना का नाही समाजा त सर्वांना समान वागणूक द्यावी म्हणून त्यांनी तीव्र आंदोलन केले होते. संपूर्ण देशातून याचे पडसाद उमटत होते आणि अखेर तृप्ती ताईंनी शतकांची ही परंपरा मोडीत काढली व तृप्ती ताई व आंदोलकांनी शनी महाराजांच्या चौठर्यावर चढून त्यांचा तेलाने अभिषेक केला. तसेच तृप्ती ताईनवर या आंदोलनाच्या वेळी प्रश्न उपस्थित केले गेले, की एवढा प्रमाणात आंदोलक आणण्यासाठी बसेस तृप्ती ताईंनी कुठून उपलब्ध केल्या व एवढा खर्च कसा केला. 
तर कोल्हापुरातील छत्रपती ग्रुपने या सर्व बसेसचा खर्च उचलला होता असे त्यांनी सांगितले. शनी शिंगणापूर नंतर तृप्ती ताईंनी कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात पूजा करायची ठरवले.मंदिर प्रशासनाने याला दुजोरा दिला व तृप्ती देसाई यांना मंदिरात प्रवेश दिला .परंतु तेथील काही पुजाऱ्यानी याला विरोध केला व तृप्ती ताई व पुजारी यांच्यामध्ये थोडा वाद विवाद व धक्काबुक्की झाली. यानंतर पाच पुजारी व दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले. तृप्ती देसाई यांचे हे प्रकरण देखील संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले होते.

तृप्ती देसाई यांचे मुंबईतील हजी दर्गा आंदोलन - Tripti Desai's Haji Dargah Movement in Mumbai

यानंतर तृप्ती देसाई यांनी आपला मोर्चा हा मुंबई हाजी अली दर्ग्याकडे वळवला. दर्गेत जाण्यासाठी महिलांना मनाई होती म्हणून तृप्ती देसाई त्या ठिकाणी आंदोलकांना घेऊन गेल्या. परंतु तेथे फार गर्दी असताना त्यांच्या गाडीवर लाथा बुक्क्या मारण्यात आल्या आणि खूप जोरजोराने घोषणा देण्यात आले गो बॅक देसाई, गो बॅक देसाई. त्यानंतर तृप्ती देसाईंना अज्ञात सूत्रांकडून कळाले की त्यांच्यावर एक लाखांचा इनाम जाहीर केला आहे.मग तृप्ती देसाई तेथून माघारी गेल्या. परंतु पुन्हा दोन महिन्यांनी तृप्ती यांनी त्या दर्ग्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, यावेळी संपूर्ण सेक्युरिटी फोर्स सह त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांना त्या भागात प्रवेश दिलाच नाही जेथे महिलांना जाण्यास मनाई होती. 

तृप्ती देसाई यांचे केरळचे आंदोलन - Tripti Desai's Kerala Movement

2018 साली तृप्ती देसाई यांनी केरळच्या शबरीमाला मंदिरात प्रवेश करायचे ठरवले. तृप्ती या केरळ येथे पोहोचल्या परंतु कोची विमानतळावर एवढी गर्दी होती की त्यांना एक पाऊल देखील पुढे टाकता येऊ शकत नव्हते. शेवटी 14 तास वाट पाहिल्यानंतर तेथील गर्दी कनभर देखील कमी झाली नाही व तृप्ती देसाई यांना पुन्हा कोल्हापूरला जावे लागले. 2019 मधे तृप्ती देसाई सब्रीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुन्हा आल्या यावेळी त्यांच्यासोबत विंदू अमिनी नावाची आणखीन एक सोशल ॲक्टीव्हीस्ट होती.

तृप्ती देसाई यांची बिग बॉसच्या घरातील एन्ट्री - Tripti Desai's entry in the Bigg Boss house

तृप्ती देसाई यांना 2016 साली हिंदी बिग बॉसच्या सीजन दहा मध्ये प्रवेश करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. परंतु बिग बॉसचा आवाज हा महिलेचा नसल्याने त्यांनी त्या शोमध्ये जाण्याचे साफ मना केले. तृप्ती ताई आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत 2021 मध्ये आलेल्या बिग बॉस मराठी सीजन थ्री मुळे. बिग बॉसच्या घरात तृप्ती ताईंनी प्रवेश केला आहे आणि अत्यंत सीताफिदेने तिथे खेळत आहेत. तृप्ती ताई या बिग बॉसच्या घरात सर्वांच्या लाडक्या असून त्या प्रत्येक टास्क हा महत्त्वकांक्षिणे खेळतात. 
चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर बोलण्याची त्यांची ताकद पण आहे. तृप्ती ताईचे बिग बॉसचे घरातील खेळ खेळणं, त्यांचा प्रवास हा प्रेक्षकांना फार आवडत आहे आणि त्या सध्या प्रेक्षकांच्या सर्वात फेवरेट कंटेस्टंट आहेत. तृप्ती ताई या आपल्या बोलण्याने अत्यंत रोखठोक असल्यामुळे त्यांचा स्वभाव आणि त्यांचे खेळणं सर्वांना खूप आवडत आहे.आता आपण पाहणार आहोत की तृप्ती ताई कुठपर्यंत मजल मारतिल. तृप्ती ताईंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी तसेच त्यांच्या पुढील कार्यांसाठी दीपस्तंभ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.

तर असा होता एक राजकारणी ,एक समाजसेविका तसेच समाजाच्या विविध प्रश्नांवर आणून आंदोलन करणाऱ्या तृप्ती ताई देसाई यांचा खडतर प्रवास. तृप्ती  ताई च्या आयुष्यात कितीतरी वेगवेगळे प्रसंग आले, वेगवेगळ्या आंदोलन आले, त्यांना धमक्या आल्या परंतु कुठेही त्यात खचून गेल्या नाहीत अत्यंत ठामपणे त्या कठीण परिस्थितीत उभ्या राहिल्या. 
,याच गोष्टी आपल्यासारख्या तरुण वर्गणी घेण्यासारख्या आहेत. तसेच बिग बॉसच्या घरात देखील तृप्ती ताई या फायनल मध्ये आपल्याला दिसतील अशी आशा व्यक्त करू कारण त्यांचा खेळ देखील बाहेरच्या प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि अत्यंत नीतिमत्तेने ते प्रत्येक खेळ खेळत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने