तन्वी मुंडले मराठी बायोग्राफी || Tanvi Mundale Biography in Marathi

तन्वी मुंडले   मराठी बायोग्राफी || Tanvi Mundale Biography in Marathi 

तन्वी मुंडले यांची ओळख – Tanvi Mundale Introduction

आज आपण जाणून घेणार आहोत अल्पावधितच प्रसिद्ध झालेल्या आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशा अभिनेत्री विषयी जिने आपल्या पहिल्या मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली ती म्हणजे तुमची आमची सर्वांची लाडकी चानक्ष आणि चतुरस्त्र अभिनेत्री तर तन्वी मुंडले.आज आपण तन्वी मुंडले यांच्या आयुष्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यांच्या आवडीनवडी,त्यांना काय आवडते या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.तनवी या हाडाकाडाच्या थेटर आर्टिस्ट आहेत त्यांच्या गोड एक्सप्रेशन आणि तेवढेच ताकदीच्या अभिनयामुळे त्यांनी मराठी चंदेरी दुनियेत आपला वेगळाच चाहता वर्ग निर्माण केलेला आहे.
तन्वी मुंडले   मराठी बायोग्राफी || Tanvi Mundale Biography in Marathi


तन्वी मुंडले यांचा जन्म आणि शिक्षण – Birth and Education of  Tanvi Mundale

तन्वी मुंडले यांचा जन्म 9 मार्च 1997 रोजी महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या गावात झाला. तन्वी यांच्या वडिलांच्या नाव आहे प्रकाश मुंडले आहे. तन्वीला ऑक्टोंबर 2021 मध्ये पितृशोक झाला. तन्वी च तिच्या बाबांवर जीवापाड प्रेम होतं. तन्वीला अगदी बालपणापासून अभिनयाची फार आवड होती तन्वीने आपले शालेय शिक्षण आणि जूनियर कॉलेजचे शिक्षण हे कुडाळ हायस्कूल येथून पूर्ण केले होते.

तन्वी मुंडले यांची अभिनयाची सुरवात - Tanvi Mundle's acting debut

कॉलेजमध्ये असताना तन्वी ने कुडाळ मध्ये बाबा वर्धम थेटर्स येथून अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केले. तन्वी ही उच्चशिक्षित असून तिने बीएससी फिजिक्स मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.आपल्या अभिनयाची आवड तिला पुण्यातील सुप्रसिद्ध अक्टिंग गुरुकुल असलेले ललित कला केंद्र येथे घेऊन आले. तनवीने अभिनयाचे सर्व धडे हे ललित कला केंद्र येथे घेतले. 

तन्वी मुंडले यांनी केलेली नाटके,मालिका आणि पिक्चर - Dramas, Serials and Pictures by Tanvi Mundle

आपले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तन्वी ने रंगभूमीवरील वेगवेगळ्या गाजलेल्या नाटकांमध्ये कामे केलेले आहेत.तनवीने आत्तापर्यंत मॅकबे,कुणाला कुणाचा मेळ नाही, नागमंडळ, सदा सर्वदा पूर्वापार या नाटकात कामे केले आहेत. तसेच तन्वी ने आपल्या मालिका क्षेत्रातील पदार्पण हे झी मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका पाहिले न मी तुला या मालिकेतून केला. तन्वीची ही पहिलीच मालिका होती आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील तिचा हा डेब्युट फार धमाकेदार ठरला. या मालीके  मध्ये तिच्यासोबत शशांक केतकर आणि आशय कुलकर्णी हे देखील होते.तन्वीची पहिलीच भूमिका ही प्रचंड गाजली आणि आपल्या पहिल्याच मालिकेतून तन्वी मुंडले हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आणि घराघरात लोकप्रिय झाले. लवकरच तनवीचा मराठी चित्रपट सृष्ष्टीत देखील दमदार पदार्पण होणार आहे. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्या कलरफुल या चित्रपटात तन्वी वर्णी लागलेली आहे.तन्वी चा हा चित्रपट दोन जुलै रोजी प्रदर्शित होणार आहेत. कलरफुल या चित्रपटात तन्वीची काय भूमिका असणार हे आता तरी गुलदस्तात आहे. 

तन्वी मुंडले यांच्या आवडी निवडी - Favorites of Tanvi Mundle

तन्वीला वाचनाशी देखील प्रचंड आवड आहे. द लास्ट गर्ल, वासु नाका आणि द अल्क केमिस्ट्री ही प्रचंड आवडते पुस्तके आहेत. तसेच तनवी ला आमरस पुरी, गुलाब जामुन, रसमलाई आणि पाणीपुरी, भेलपुरी चाट हे देखील फार आवडतात .तन्वीही फिटनेस प्रेमी देखील आहे ते रेगुलर जिम करते आणि त्याचप्रमाणे योगा देखील करते. 

तन्वी तिच्या बाबांवर खूप प्रेम होतं हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तन्वी बारावी पास झाल्यानंतर तन्वीला तिच्या बाबांनी एक डायमंड रिंग गिफ्ट केलेली होती. ती रिंग आज देखील तन्वी मुंडले यांच्या हातात आहे आणि त्या रिंगला त्या कधीच आपल्या हातातून काढत नाहीत. तन्वीला वाचनासोबतच चित्र काढण्याची आणि हँड क्राफ्ट बनवण्याची आवड आहे .फावल्या वेळेत तनवी हे देखील कामे करते. तन्वी नेहमीच म्हणते की माणसाने नेहमी होनेस्ट,जेण्यून आणि हार्ड वर्किंग असले पाहिजे. तसेच चांगले खावं आणि वेळेत खावं हे देखील तनवी सांगते. तन्वीला सायकल हा मराठी चित्रपट फार आवडतो .तसेच आखो देखी हा हिंदी चित्रपट तिच्या विशेष आवडीचा आहे आणि मराठीतील आनंदी गोपाळ या चित्रपटातील गाणे तिला आवडतात. तन्वी च्या दिल खेच स्माईल आणि क्युट लुक्समुळे आज सर्व तरुणाई तिच्यावर फिदा आहे. 

तन्वी मुंडले यांना मिळालेले अवॉर्डस् - Awards received by Tanvi Mundle

तन्वीला आपली पहिलीच मालिका पाहिन मी तुला यातील अभिनयासाठी झी मराठीचा विशेष लक्षवेधी चेहरा हा प्रतिष्ठित पुरस्कार आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून मानाची भेट वस्तू देखील भेटलेली आहे. तनवीने वेगवेगळ्या मध्ये देखील कामे केलेले आहेत आणि वेगवेगळ्या ब्रँड साठी फोटोशूट देखील केलेले आहे. 

तन्वी मुंडले यांचे सोशल मीडिया आणि फॅन्स - Tanvi Mundle's Social Media and Fans 

तन्वी मुंडले या सोशल मीडिया साईट इंस्टाग्राम वर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. त्यांना instagram वर 66 के म्हणजे 66 हजार फॉलोवर्स आहेत,तर फेसबुक वर तन्वीला 12000 फॉलोवर्स आहेत .

तन्वी मुंडले यांची सध्या भाग्य दिले तू मला ही कलर्स मराठी वरील मालिका प्रचंड चालत आहे. आणि सगळीकडे तन्वी मुंडले यांच्या अभिनयाची चर्चा देखील होत आहे .या मालिकेत तन्वी यांच्यासोबत निवेदिता सराफ आणि विवेक सांगळे हे देखील आहेत .तन्वी मुंडले यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने