जान्हवी किल्लेकर मराठी बायोग्राफी || Janhvhi Killekar Biography in Marathi

जान्हवी किल्लेकर मराठी बायोग्राफी || Janhvhi Killekar Biography in Marathi 


जान्हवी किल्लेकर यांची ओळख - Janhvhi Killekar Introduction

आज आपण मराठीतील अशा एका अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या घायाळ करणाऱ्या घारे डोळे आणि तितक्याच घायाळ करणाऱ्या अभिनयाने आपल्या प्रेक्षकांच्या मनात एक आढळ स्थान निर्माण केलेले आहे, त्या म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या जानवी किरण किल्लेकर. जानवी जेवढा ऑन स्क्रीन उत्कृष्ट दिसतात तेवढ्या त्या ऑफ स्क्रीन बोर्ड आणि ब्यूटीफुल देखील आहेत. आज आपण जान्हवी यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत. कसा होता जान्हवी यांचा एक टीचर ते मिसेस रायगड ते एक आज यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास.
जान्हवी किल्लेकर मराठी बायोग्राफी || Janhvhi Killekar Biography in Marathi


जान्हवी किल्लेकर यांची माहिती - Janhvhi Killekar information

जन्म नाव (Born Name)

जान्हवी किल्लेकर

जन्म(born)

11 ऑक्टोंबर 1994

जन्मस्थान( birthplace)

ठाणे, महाराष्ट्र

वय(age)

29

नाटक 

-

चित्रपट (Film)

-

मालिका(serial)

भाग्य दिले तू मला

वैवाहिक स्थिती 

विवाहित

कार्यक्षेत्र

डान्सर, अभिनेत्री

म्युझिकल व्हिडिओ 

वाजले बारा, गोल्डीची हळद ,आई एकविरा, कोळीवाडा झिंगला ,गणपती आईला घरी, धाव आई धाव, कारल्याची तुषान


जान्हवी किल्लेकर यांचा जन्म - Birth of Janhvhi Killekar


जान्हवी किल्लेकर यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहरात 11 ऑक्टोंबर 1994 रोजी झाला. फार कमी लोकांना माहिती आहे की याची जान्हवी या विवाहित आहेत.जान्हवी यांच्या लग्नाआधीचे नाव भावना गायकवाड होते.

जान्हवी किल्लेकर यांची डान्स ची आवड - Janhvhi Killekar dance lover


भावनांच्या म्हणजे जान्हवी च्या अभिनय कारकीर्दीसाठी त्यांच्या आई-बाबांचा पूर्ण पाठिंबा होता.जानवी यांना देखील अभिनयाची प्रचंड आवड होती. विशेष करून नृत्य करायला त्यांना फार आवडत होते. जान्हवी कॉलेजमध्ये असताना त्यांची मैत्रीण मराठी बाणा या सुप्रसिद्ध कार्यक्रमासाठी डान्सर म्हणून काम करत होती.त्या मुलीला बघून सर्वांना फार कौतुक वाटत असे.जान्हवी ला देखील आपल्यात असणाऱ्या डान्स चकलागुणांना आपण वाव द्यावा असे वाटले आणि काही दिवसांनीच प्रदीप धवन यांच्या शिवबा या नाटकासाठी ऑडिशनची नोटीशी कॉलेजमध्ये लागली आणि त्या नाटकांमध्ये जान्हवी ने ऐका गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि बघता बघता बॅकग्राऊंड डान्सर असणाऱ्या जान्हवी याच नाटकात लीड डान्सर म्हणून काम करू लागल्या. इथून जान्हवी किल्लेकर यांचा कॉन्फिडन्स हा प्रचंड वाढला. त्यानंतर जान्हवी यांनी एक डान्स ग्रुप जॉईन केला आणि या डान्स ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी असंख्य कार्यक्रम केले आणि आपल्या डान्सचे कौशल्य देखील दाखवले.

जान्हवी किल्लेकर यांची अभिनय कारकीर्दीची सुरुवात - Janhvhi Killekar acting career


त्यानंतर जान्हवी ने आपला मोर्चा हा अभिनय क्षेत्राकडे वळवला.त्यांनी एका तीन अंकी नाटकांमध्ये काम देखील केलेले आहे. या नाटकाचे वेगवेगळ्या गावोगावी, खेडोपाडी जाऊन असंख्य प्रयोग देखील झाले. जान्हवी ने आपल्या अभिनय कारकीर्दशी सुरुवात ही 2014 साली आलेल्या स्टार प्रवाह मालिका रुंजी यातून मराठी मालिका क्षेत्रात डेब्युट केला.यातील त्यांची भूमिका छोटी असल्याकारणाने प्रेक्षकांच्या ती फार लक्षात राहिली नाही. 

जान्हवी किल्लेकर यांनी केलेले म्युझिकल व्हिडिओ - janvhi killekar musical video


वाजले बारा
गोल्डीची हळद 
आई एकविरा
कोळीवाडा झिंगला 
गणपती आईला घरी
धाव आई धाव
कारल्याची तुषान

त्यानंतर जान्हवी किल्लेकर यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा नृत्याकडे वळवला. जान्हवी किल्लेकर यांनी अनेक म्युझिकल व्हिडिओ मधून आपल्या डान्स ची अदाकारी दाखवलेली आहे.जान्हवी चे आत्ताच 2022 मध्ये दर्या ची मासोळी हे देखील गाणे आलेले आहे. त्याचप्रमाणे वाजले बारा, गोल्डीची हळद ,आई एकविरा, कोळीवाडा झिंगला ,गणपती आईला घरी, धाव आई धाव, कारल्याची तुषान या विविध म्युझिक व्हिडिओमध्ये जान्हवी झळकली आहे. 2016साली आलेल्या कारल्याची तुषान ही हे त्यांचे पहिले म्युझिक व्हिडिओ होते.त्यानंतर 2019 मध्ये आलेल्या कोळीवाड्या जिंकला या गाण्याने जानवी किल्लेकर यांना अफाट प्रसिद्धी मिळवून दिली,त्या रातोरात स्टार झाल्या.तसेच त्यांचे गोल्डीची हळद हे गाणे मराठीतील पहिले असे गाणे ठरले की त्याने एका दिवसात एक मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत.

शिवानी किल्लेकर यांनी केलेल्या मालिका - shivani Killekar serial


श्री गुरुदेव दत्त
आई माझी काळुबाई
जय जय स्वामी समर्थ
भाग्य दिले तू मला

जान्हवी यांची प्रसिद्धी ही दिवसागणित वाढतच चालली होती.तसेच त्यांनी एक पाककृती शोचे अँकरिंग देखील केलेले होते. जान्हवी किल्लेकर यांनी स्टार प्रवाह वरील श्री गुरुदेव दत्त या 2019 साली आलेल्या मालिकेतून आपला मराठी मालिका क्षेत्रात कमबॅक केला आणि त्यांचं हे कमबॅक यशस्वी ठरले. यात त्यांनी लक्ष्मी मातेची भूमिका साकारली होती.

आपल्या केलेल्या कमबॅक नंतर लगेचच 2020 आली आलेल्या सोनी मराठी वरील आई माझी काळुबाई या मालिकेतून त्यांनी प्रथमच लीड विलनचे व्यक्तिरेखा साकारली. या त्यांनी मालती हे ठसकेबाज पात्र साकारले होते.यातील त्यांचे मालती हे पात्र खूप गाजले होते आणि यामुळे जानवी यांचा सेपरेट फॅनबेस देखील तयार झाला होता.तसेच त्यांनी जय जय स्वामी समर्थ या मालिकेत राधाची भूमिका देखील साकारली होती. जान्हवी किल्लेकर सध्या कलर्स मराठी वरील भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये सानिया हे पात्र साकारत आहे.यातील त्यांचे सानिया हे पात्र देखील खलनायिकेचेच आहे.आपल्या कौशल्यपूर्ण अभिनय ते यातून दाखवत आहेत. भाग्य दिले तू मला ही मालिका अल्पावधीतच प्रसिद्ध झाली, त्यामुळे जान्हवी किल्लेकर यांचे देखील महाराष्ट्रात घराघरात सध्या नाव पोचलेले आहे.

जान्हवी किल्लेकर यांचे पर्सनल आयुष्य - Janhvi Killekar Peraonal life


आता जाणून घेऊया जान्हवी यांच्या पर्सनल आयुष्याविषयी काही माहिती. खूप कमी लोकांना माहिती आहे की जान्हवी या विवाहित आहेत.तसे त्यांच्याकडे बघून वाटतही नाही की त्या विवाहित असतील. त्यांनी 27 एप्रिल 2013 रोजी आपली लग्न गाठ किरण किल्लेकर यांच्याशी बांधली.किरण हे एक प्रोडूसर असून त्यांचे के के डान्स अकॅडमी यांनी के के इंटरटेनमेंट नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. जान्हवी आणि किरण किल्लेकर यांना ईशान नावाचा गोंडस मुलगा देखील आहे.

जान्हवी किल्लेकर यांनी 2014 साली आलेल्या मिसेस रायगड या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेच्या त्या विजेता देखील ठरल्या होत्या. अभिनय क्षेत्रात यायच्या आधी जान्हवी या अबॅकस च्या टीचर म्हणून काम करत होत्या. तसेच त्या अभिनय क्षेत्रात आल्या नसत्या तर डान्स कोरिओग्राफर झाल्या असत्या असे ते आवर्जून सांगतात. जान्हवी या त्यांच्या प्रेग्नेंसी च्या दरम्यान मृत्यूच्या दारात जाऊन आल्या होत्या. त्यांचा तो काळ खूप कठीण आणि खूप अवघड होता. त्यानंतर त्यांनी फार कठीण परिश्रम करून स्वतःलाच स्टेबल केले आणि एक यशस्वी आई आणि एक यशस्वी अभिनेत्री बनवून दाखवल.

जान्हवी किल्लेकर सोशल मिडिया - janhvi Killekar social media


जान्हवी किल्लेकर या सोशल मीडिया साइटवर प्रचंड ऍक्टिव्ह असतात.विशेष करून इंस्टाग्राम वर त्यांचे reels हे आवडीने बघितले जातात. जान्हवी यांना इंस्टाग्राम वर एक 183 के म्हणजे 1 लाख 83 हजार फॉलोवर्स आहेत.अशा या सौंदर्यवती, हरहुन्नरी, गुणवान अभिनेत्रीला आपला दीपस्तंभ परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने