जानकी पाठक मराठी बायोग्राफी || Janki Pathak Biography in Marathi

जानकी पाठक मराठी बायोग्राफी || Janki Pathak Biography in Marathi 

जानकी पाठक यांची ओळख – Janki Pathak Introduction 

आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमधे ऐक से बढकर एक ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्री आहेत. त्या मधील काही अशा अभिनेत्री अहेत की ज्यांना पाहता क्षणी आपण त्यांच्या प्रेमात पडतो किंवा त्यांनी ऐक नजर बघितली तरी आपण सगळे घायाळ होऊन जातो.त्या पैकीच एक असलेले आज महाराष्ट्रामध्ये सर्व त्या अभिनेत्रीचा विषय काढत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या अभिनेत्रीची चर्चा चालू आहे.तिने आपल्या जोरावर स्वतःचा ऐक चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. परंतू तिच्या क्यूट लूक्स ची सद्या सगळीकडे आजकाल चर्चा चाललेली आहे. ऐक प्राणी मित्र आहे, ऐक पेंटर आहे, ऐक कवी देखील आहे आणि आपल्या फावल्या वेळेत ती मुसिकॅल इन्स्ट्रुमेंट देखील वाजवते. ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या झोंबिवली चित्रपटापासून महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेली जानकी पाठक. आज आपण जानकी पाठक यांची संपूर्ण biography पाहणार आहोत. जानकी पाठक यांचं श्वान प्रेम म्हणजे प्राणी प्रेम हे सर्वश्रुत आहे.

जानकी पाठक मराठी बायोग्राफी || Janki Pathak Biography in Marathi

जानकी पाठक यांचा जन्म आणि शिक्षण – Birth and Education of  Janki Pathak 

जानकी पाठक यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील ठाणे या शहरात 24 फेब्रुवारी 1998 रोजी झाला.जानकी यांनी आपले शालेय शिक्षण हे आर्या कांब्रिज इंटरनॅशनल स्कूल येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी आपले कॉलेज चे शिक्षण वी जी वाजे केळकर कॉलेज मुलुंड येथून पूर्ण केले. जानकी यांच्या वडिलांचे नाव हे गिरीश विश्वनाथ पाठक असून ते ऐक लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

तसेच त्यांच्या आईचे नाव मनीषा पाठक असून त्या डॉक्टर की क्षेत्रात कार्यरत आहेत. जानकी सांगतात की त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या अक्टिंग करियर साठी खूप सपोर्ट केला म्हणूनच त्या आज ऐक यशस्वी अभिनेत्री म्हणून उभ्या आहेत.त्यांच्या अक्टिंग च्या करियर मधे त्यांच्या आई वडिलांचा खारीचा वाटा आहे असे ते सांगतात.आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे जेवढ्या लवकर कळते त्या व्यक्तीची प्रगती कधी थांबत नाही असे त्या म्हणतात. जानकी च्या बाबतीत देखील तसेच झाले.

जानकी पाठक यांची अभिनय कारकिर्दीची सुरुवात - The beginning of Janaki Pathak's acting career

जानकी यांचे आयुष्य बाबतचे सर्व व्हिजन हे अत्यंत क्लिअर होत. अगदीच वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी ठरवले होते की आपल्याला अभिनय क्षेत्रात करियर करायचे आहे.जानकी या शाळेमध्ये असतानाच वेगवेगळ्या बाल नाटकात कामे करू लागली तसेच शाळेत होणाऱ्या स्नेसंमेलन कार्यक्रमात देखील ती भाग घेत असे.तसेच अनेक नाट्य शिबिरामध्ये देखील तिने भाग घेतलेला होता. जसे की आपल्या सर्वांना माहिती होत की जानकीच अक्टिंग विषाईच व्हिजन फार क्लिअर होत त्यामुळे तिने आपल्या करियर ची वाटचाल देखील त्याच दृष्टिकोनाने केली.आणि आपले 10 वी चे शिक्षण पूर्ण होताच जानकी ने अनुपम खेर यांच्या अनुपम खेर ॲक्टर prepares या अक्टिंग स्कूल मधून dimploma पूर्ण केला. विशेष बाब म्हणजे त्या अक्टिंग स्कूल मधे जानकी सोबतचे सर्व विद्यार्थी हे 20 वर्षा वरीलच होते. आणि जानकी ही एकटीच जेम तेम 15 वर्षाची होती. अगदीच जिद्दीने ,मेहनतीने तिने आणि चिकाटीने तिने अक्टिंग चा डिप्लोमा पूर्ण केला आणि त्या वर्षी तेथून passout होणारी सर्वात तरुण विद्यार्थी ठरली. 

जानकी पाठक यांचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण - Janaki Pathak debut in film industry

अगदीच 12 वी मधे असताना जानकी ला आपल्या करियर चा पहिला चित्रपट भेटला तो म्हणजे 2018 साली आलेला व्हॅनिला स्टोबेरी अँड चॉकलेट या चित्रपटा पासून अभिनय क्षेत्रात जानकी ने दमदार पदार्पण केले आणि आपल्या अभिनय कारकिर्दीला जोरदार प्रारंभ केला.यात तिने तेजू ची भूमिका साकारली होती. आणि व्हॅनिला नावाच्या एका श्वान सोबतची तिची निखळ मैत्री आणि निस्वार्थ प्रेमाची गोष्ट या चित्रपटात दाखवलेली आहे. 

जानकी पाठक यांचे प्राणीप्रेम - Animal Love by Janaki Pathak

जानकीचे श्वान प्रेम हे चित्रपटा पुरतेच मर्यादित नाहीये. जानकीला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. आणि तिला प्राण्यांचा प्रचंड लळा आहे. जानकी म्हणजते की प्रत्येक प्राण्याला त्यांच्या भावना असतात आणि सर्व पशू पक्षी प्राण्याना जगण्याचा संपूर्ण हक्क आहे.त्यांच्या याच भावनेने आपण त्यांना मदत केली पाहिजे आणि निस्वार्थ पने त्यांना प्रेम दिले पाहिजे व त्यांचा सांभाळ केला पाहिजे. जानकी लहानाची मोठी श्वाना सोबत झाली आहे. तिच्या जन्माच्या आधीपासून च त्यांच्या घरात ऐक doberman प्रजातीचा डॉग होता.

 जानकी ने तिला ताई चा दर्जा दिला होता कारण ते डॉग जानकी पेक्षा 1 वर्षाने मोठे होते म्हणून जानकी तिला डॉगी ताई असेल बोलवत असे. आजही जानकी कडे 3 श्वान आहेत त्यांची नावे कास्पर,बडी आणि गब्बर अशी आहेत. जानकी त्यांना तिच्या जीव पेक्षा जास्त जपते. आणि घरातील प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक सण उत्सवात त्यांचा समावेश असतो. जानकी त्यांच्या सोबत भाऊबीज आणि रक्षा बंधन हे सण आवर्जून साजरे करते.

 जानकी ही ओरिजनल आणि हडताडाची प्राणी प्रेमी आहे. तसेच ती दरवर्षी पाल या प्राण्यांच्या संस्थेला चारिटी म्हणून काही ना काही दान करत असते. जानकी कधी कुठे बाहेर जात असताना,रस्त्यावर, किंव्हा तिच्या शूट च्या ठिकाणी किंव्हा शूट ल जात असताना तिला रस्त्यात देखील कुठलाही प्राणी अवघडलेल्या स्थितीत आढळला  तर  तात्याळ ती त्यांची मदत करते तसेच त्यांना मायेने जवळ घेते आणि त्यांना खायला प्यायला घातल्या शिवाय ती पुढे जात नाही. यालाच म्हणतात प्राण्या विषयीच निखळ आणि निस्वार्थ प्रेम. तसेच जानकी यांचे प्रेम कुत्रा आणि मांजरी पुरते मर्यादित नाही तर आजकाल भरपूर लोकांना वाटत की प्राणी प्रेम म्हणजे कुत्रा अनी मांजर यांच्यावर प्रेम तर जानकी त्या गणतेत येत नाही. जानकी यांचे प्राणी प्रेम हे सर्व प्राण्यांवर आहे. 

जानकी ला सर्वात जास्त डायनासोर आणि फुलपाखरे देखील आवडतात. एकूण थोड वेगळं वाटेल पण जानकी ही डायनासोर लवर् देखील आहे.तिच्या वाढदवसानिमित्त तिचे मित्र मैत्रिणी डायनासोर ची वेशभूषा करून तिचा केक कपण्या साठी येत असे. जानकी ने डायनासोर आणि फुलपाखरू यांचा एकत्रित टॅटू त्यांनी आपल्या खांद्यावर काढलेला आहे. डायनासोर चा टॅटू काढणारी आजवरील पहिलीच मराठीतील अभिनेत्री असल्याचा मान जानकी पाठक यांना भेटलेला आहे.

जानकी यांनी आपला 2रा चित्रपट 2020 आलेल्या झी टॉकीज च्या बॅनर खालचा हाझरी या सिनेमात काम केलेले आहे. तसेच जानकी ने स्टार प्रवाह वरील स्पेशल फाईव या मालिकेत देखील भूमिका केलेली आहे. 


जानकी  ही फिटनेस प्रेमी असून शाळेत असतानाच आगदी बालपण पासूनच ती जिमनेस्तिक मधे भाग घेत असे. आणि तिने आजवर तीच प्रथा तिने जिमच्या माध्यमातून चालू ठेवलेली आहे. तेवढी च ती फिटनेसच्या

बाबतीत जागृत देखील आहे. जानकी फावल्या वेळेत चित्र काढण्याचा, मुसीक इन्स्ट्रुमेंट वाजवण्याचा आणि कविता करण्याचा देखील छंद आहे.तसेच तिला वाचनाची देखील फार आवड आहे. 

जानकी पाठक यांना भेटलेले अवॉर्ड - Award given to Janaki Pathak

जानकी ला अंबरनाथ फिल्म फेस्टिवल 2018 चा बेस्ट अक्टरेस इन चिल्ड्रन्स कॅटेगरी चा पुरस्कार देखील भेटला आहे. तसेच दादा साहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड चा बेस्ट अक्टरिस हा पुरस्कार देखील भेटला आहे. हे दोन्ही अवॉर्ड तिला तिच्या व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट या तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी भेटलेले आहेत. जानकी कडे climber नावाची स्वतःची blue car देखील आहे.

जानकी पाठक यांचे सोशल मीडिया वरील फॅन्स - Janaki Pathak's fans on social media

जानकी ही सोशल मीडिया साइटवर फार ॲक्टिव असते.आणि तिला Instragram या साईड वर 30के म्हणजेच 30 हजार followers आहेत. सध्या जानकी पाठक हे नाव महाराष्ट्रात घराघरात आणि कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे.ते म्हणजे सद्या चालू असलेल्या झोंबिवळी या सिनेमातील भूमिकेमुळे.यात तिने पत्रकार अंजली म्हात्रे ही भूमिका साकारली आहे आणि तिच्या या भूमिकेचं प्रेक्षकांकडून फार कौतुक देखिल होत आहे.यात तिने दमदार आणि ड्याशिंग भूमिका साकारली आहे. जानकी ने तिच्या सुंदरता च्या आणि अभिनयाच्या जोरावर स्वतःचा ऐक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. 

जानकी ही नेहमी सांगते की या इंडस्ट्री मधे येण्यासाठी तिने फार मेहनत केलेली आहे आणि फार लहान पणी च ठरवले होते की तिला अभिनय क्षेत्रात यायचे आहे.यासाठी तिने खूप पेशन्स ठेवले आणि खूप मेहनत केली. या industry मधे कोणी नवीन येत असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात कोणाला जायचे असेल तर वयाच्या कोणत्याही वर्षी तुम्ही निर्णय घेऊ शकता परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल,खूप अभ्यास करावा लागेल आणि त्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल. आयुष्यात खूप उतार चढव येतील, खूप खस्ता खव्या लागतील परंतु तुमचे कष्ट त्या गोष्टी साठी थांबू देऊ नका किंवा कुठल्याही प्रकारचे कष्ट तुम्ही थांबाऊ देऊ नका तुम्ही त्या क्षेत्रात यशस्वी नक्की व्याल हे जानकी पाठक नेहमी सांगतात. खरच जानकी तुमच्या या मुल मंत्रातून आजकालच्या तरुणाईला किंव्हा आजकालच्या लोकांना भरपूर बोध घेण्यासारख्या गोष्टी कळल्या.जानकी पाठक यांचा पुढील वाटचालीसाठी दीपस्तंभ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा.

यांच्या अभिनय वरून कळते की येनारा संपूर्ण काळच जानकी यांचे नाव सर्वत्र दुमदुमणार आहे.अशी होती ऐक अभिनेत्री, ऐक चित्रकार,ऐक कवी आणि ओरिजनल हाडकाडाची कट्टर प्राणीप्रेमी जानकी पाठक यांची biography.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने