तेजस्वी प्रकाश मराठी बायोग्राफी || Tejasvi Prakash Biography in Marathi

तेजस्वी प्रकाश मराठी बायोग्राफी || Tejasvi Prakash Biography in Marathi 

तेजस्वी प्रकाश यांची ओळख – Tejasvi Prakash Introduction 

आत्ताच हिंदी बिग बॉस चा पंधरावा सीजन संपला आणि आपल्याला त्यातून एक विजेता देखील भेटलेला आहे आणि विशेष म्हणजे हा विजेता एक मराठी चेहरा आहे. भरपूर जणांना त्यांचं नाव ऐकून त्या साउथ कडील वाटत होत्या परंतु त्यांचं नाव तेजस्वी प्रकाश असले तरी त्या आपले आडनाव वापरत नाहीत. त्यांचे संपूर्ण नाव हे तेजस्वी प्रकाश वयांगकर असून त्या एक मराठी आहेत. आपल्याला बिग बॉस मराठी च्या पंधरावी सीजन चा विजेता तेजस्वी प्रकाश यांची संपूर्ण बायोग्राफी आज आपण पाहणार आहोत.

तेजस्वी प्रकाश मराठी बायोग्राफी || Tejasvi Prakash Biography in Marathi

तेजस्वी प्रकाश यांचा जन्म आणि शिक्षण – Birth and Education of  Tejasvi Prakash

तेजस्वी प्रकाश यांचा जन्म 11 जून 1993 रोजी सौदी अरेबिया या देशातील जेदा या शहरात एका हिंदू मराठी भाशिक परिवारात झाला.त्यांच्या जन्मच्या काही वर्षातच त्यांचा परिवार त्यांच्या मूळ देशी म्हणजेच भारतामध्ये स्थायिक झाला. तेजस्वि हिने आपल्या कॉलेज शिक्षण हे राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथून पूर्ण केले. तेजस्वी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉमिनिकेशन मधून इंजिनिअरिंग ची डिग्री घेतलेली आहे .तेजस्वी च्या वडिलांचे नाव प्रकाश वयांगकर असून ते एक गीतकार आहेत.तसेच तेजस्वी ला एक भाऊ देखील आहे आणि त्याचं नाव प्रतीक वयांगकर असून तो यूएसए मध्ये जॉब करतो.

तेजस्वी प्रकाश यांनी केलेल्या मालिका - A series by Tejashwi Prakash 

आपल्या कॉलेजच्या दिवसापासूनच तेजस्वी वेगवेगळ्या कॉलेजचे फेस्टिवल मध्ये भाग येत असे. ज्यात डान्स कॉम्पिटिशन, सिंगिंग कॉम्पिटिशन चा समावेश होता.अशाच प्रकारे एकदा कॉलेजमध्ये झालेल्या ब्युटी कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये तेजस्वी ने भाग घेतला आणि ती कॉम्पिटिशन तेजस्वी यशस्वीरित्या जिंकली.त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेजस्वी चा फोटो पेपरामध्ये छापून आला आणि तिचा पेपरातील फोटो बघून एका प्रोडक्शन हाऊस ने तिला फोन केला आणि त्यांच्या आगामी सिरीयल साठी तिला ऑडिशन देण्यासाठी सांगितले.

 तेजस्वी आज पर्यंत कुठल्याच कंपनीच्या ऑडिशनसाठी किंवा साध्या ऑडिशनसाठी देखील तेजस्वी गेली नव्हते.आणि तेजस्वी एक सहज एक ट्राय म्हणून किंवा ऑडिशन कशी असते हे बघण्यासाठी ऑडिशन आपण देऊन पाहू यासाठी त्या गेल्या आणि त्यात तिचा सिलेक्शन झालं.लाईफ ओके या चॅनेलवर येणारी 26 12 ही तिची 2012 सालची पहिली मालिका, आणि याच मालिकेतून तेजस्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तेजस्वी मालिका क्षेत्रात टीव्हीवर आपले अधिरज गाजवले. आणि एक वेगळाच ठसा सगळीकडे उमटवला.

 तेजस्विनी आजपर्यंत संस्कार, धरोहर अपनोंकी, स्वरागिनी,जोडे रिष्टो के स्वर,पहरेदार प्यार के, रिश्ता लिखेंगे हम नया, स्विस वाले दुल्हनिया ले जायेंगे टू , कर्म संगिनी, शादी हो तो ऐसे, लेडीज वर्सेस जेंटल मन या मालिकांमध्ये कामे केलेली आहेत. तसेच 2022 मध्ये नागिन चा सहावा सीजन आला आणि या सीजनमध्ये देखील तेजस्विनीने काम केलेले आहे. 


2020 मध्ये आलेला खत्रोन के खिलाडी च्या दहाव्या सीजन मध्ये देखील तेजस्वी आपल्याला दिसली होती.  तसेच 2021 मध्ये झी कॉमेडी शो मध्ये तेजस्विनी अभिनय करताना आपल्याला दिसली होती. तिला खरी लोकप्रियता भेटली ती बिग बॉसच्या पंधराव्या सीजन पासून आणि या सीजनमध्ये तेजस्वी विजय देखील ठरली होती. तेजस्वी ने तिचा डिजिटल क्षेत्रातील डेब्यू हा 2019 साली आलेल्या सिलसिला बदलते रिश्तों का या वुट वरील सिरीज मधून तिने ओटीपी क्षेत्रात पदार्पण केले.तेजस्वी स्कूल कॉलेज आणि लाईफ या मराठी चित्रपटात देखील काम केलेले आहे. परंतु अजून हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तसेच तेजस्विनी सुप्रसिद्ध मराठी शो चला हवा येऊ द्या यात देखील हजेरी लावलेली आहे. झी कॉमेडी शो च्या प्रमोशनच्या वेळेस संकेत भोसले, सुगंधा भोसले, अली अजगर आणि फरा खान यांच्यासोबत तिने हजेरी लावली होती.

तेजस्वी प्रकाश यांचे म्युझिकल व्हिडिओ - Music video by Tejashwi Prakash

 तेजस्वी वेगवेगळ्या म्युझिकल व्हिडिओज मध्ये काम केलेले आहे .2020 साली रॅपर एक्का त्यांच्यासोबत त्यांचा इंतजार हे पहिले म्युझिक व्हिडिओ आला होता .त्यानंतर सुन जरा, ए मेरे दिल, कलाकार ,फकीरा,ये मेरा पहिला प्यार आणि 2022 मध्ये विनीत सिंग यांच्यासोबत देखील एक गाणे येणार आहे. तेजस्वी प्रकाश यांना तेजा भाई आणि तेजू या टोपण नावाने सगळे हाक मारतात. तसेच तेजस्वी ने चार वर्ष शास्त्रीय शिक्षणाचे प्रशिक्षण देखील घेतलेले आहे. तेजस्वी चा आवडता अभिनेता रणवीर कपूर रणवीर सिंह आणि आदित्य रॉय कपूर ही आहे. तसेच तेजस्वी आवडती अभिनेत्री प्रियंका चोपडा,दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट आहे. तेजस्वी प्रकाश यांना युरोप खंडात फिरायला फार आवडते.तसेच त्यांना मुंबईतील स्ट्रीट फूड खायला देखील फार आवडते. तेजस्वी प्रकाश या श्री परमनी ज्वेलर्सच्या ब्रँड अँबेसिडर देखील असून, त्या त्यांच्या वेगवेगळ्या एड्स मध्ये आणि फोटोशूट मध्ये दिसत असतात .

तेजस्वी प्रकाश यांचे यूट्यूब चॅनल - Tejashwi Prakash's YouTube Channel

तेजस्वी प्रकाश या एक युट्युब वर देखील आहेत तिचा तेजस्वी प्रकाश या नावाने youtube चैनल असून त्या चैनल ला आत्तापर्यंत 5.53 लाख सबस्क्राइबर्स आहेत. व त्या चॅनेलवर आजवर 56 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत,असून त्यांना टोटल 3 कोटी 52 लाख इतके views आलेले आहेत.

तेजस्वी प्रकाश सोशल मीडिया आणि फॅन्स - Tejashwi Prakash social media and fans

तेजस्वी ही सोशल मीडिया साइटवर प्रचंड ऍक्टिव्ह असते.तिला इंस्टाग्राम वर 4.6 मिलियन म्हणजे 46 लाख फॉलोवर्स आहेत. तर फेसबुक वर तिला 5.3 मिलियन म्हणजे 53 लाख फॉलोवर्स आहेत.

सध्या तेजस्वी च्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगत असून तिचाच बिग बॉसच्या सीजन 15 चा स्पर्धक करन कुंद्रासोबत तिचे नाव जोडले जात आहे आणि ते लवकरच लग्न देखील करणार आहेत अशा अफवा देखील उठत आहेत .आता वेळ आल्यावरच कळेल की ते खरे आहे की खोटे. तेजस्वी प्रकाश वयांगकर या मराठी चेहऱ्याने आज बिग बॉस सीजन 15 जिंकून आपल्या सर्वांची मान गर्वाने उंच केलेली आहे. तेजस्वी च्या पुढील वाटचालीसाठी दीपस्तंभ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि तिच्या आगामी कारकिर्दीसाठी खूप सदिच्छा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने